Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कोलेस्टेरॉल वाढलं म्हणून टेंशन घेऊन घाबरु नका, तज्ज्ञ सांगतात ५ सोपे उपाय-रिपोर्ट येईल नॉर्मल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:25 IST

Heart Health : तुम्हीही टेस्ट केली असेल आणि कोलेस्टेरॉल वाढलेलं असेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं.

Heart Health : शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढणं ही एक गंभीर समस्या बनली आहे. कोलेस्टेरॉल वाढलं की, वेगवेगळ्या हृदयरोगांचा आणि हार्ट अ‍ॅटॅकचाही धोका वाढतो. अशात कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागतात आणि आहारातही मोठा बदल करावा लागतो. तुम्हीही टेस्ट केली असेल आणि कोलेस्टेरॉल वाढलेलं असेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. अशाच काही गोष्टींबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

न्यूट्रिशनिस्टनुसार, तुमच्या घरात कुणालाही हाय कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर खालील पाच गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करू नका. कारण या गोष्टींमुळे हृदय निरोगी ठेवण्यास मदत मिळते.

तूप अधिक खा

हाय कोलेस्टेरॉल मॅनेज करण्यासाठी तूप अधिक खाण्याचा सल्ला एक्सपर्ट देतात. हेल्थ एक्सपर्ट सोम्या गुप्ता सांगतात की, तूप ही अशी गोष्ट आहे जी हृदयात ब्लॉकेजची समस्या होऊ देत नाही आणि शरीरात कोलेस्टेरॉलही कमी करते.

नट्स खा

तसेच काजू, शेंगदाणे आणि खोबरं यांसारखे नट्सही नियमित खायला हवेत. या गोष्टी हृदयासाठी खूप फायदेशीर असतात आणि कोलेस्टेरॉल कमी करतात.

पॅकेज्ड फूड टाळा

कोणत्याही प्रकारचे पॅकेज्ड फूड खाणं टाळा. कारण यात पाम तेल किंवा वनस्पती तेल असेल जे हृदयासाठी अजिबात चांगलं नसतं.

दारू टाळा

तुम्ही नेहमीच दारू पित असाल तर कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका अधिक असतो. दारूमुळे लिव्हर खराब होतं आणि यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल अधिक वाढतं.

स्ट्रेंथ ट्रेनिंग करा

हार्ट ब्लॉकेज रोखण्यासाटी आठवड्यातून कमीत कमी २ दिवस वेट ट्रेनिंग नक्की करा. यानं हृदयाचे स्नायू मजबूत होतात.

टॅग्स : हृदयरोगहृदयविकाराचा झटकाहेल्थ टिप्स