Sour Burp Home Remedy : हल्ली गॅस, पोट फुगणं, आंबट ढेकर आणि अॅसिडिटीचा त्रास फारच कॉमन झाला आहे. बदलती लाइफस्टाईल, चुकीची खाणं-पिणं, रात्री उशीरा जेवणं आणि तणाव ही या समस्यांची कारणं सांगता येतील. बऱ्याचदा तर असं होतं की, लोक दिवसभर चांगले राहतात, पण रात्री जेवणानंतर पोट जड वाटतं, गॅस होतो आणि अनेकदा आंबट ढेकरही येतात. आंबट ढेकरींमुळे ना धड झोप लागत ना कशात लक्ष. अशात ही समस्या दूर करण्यासाठी रोज जेवणानंतर आणि झोपण्याआधी काही सोप्या सवयी फॉलो करू शकता. या सवयी आंबट ढेकरीची समस्या बऱ्यापैकी कमी करू शकतात. या सवयी नेमक्या कोणत्या हे पाहुयात.
रात्री जड जेवण टाळा
रात्री जास्त जड अन्न खाल्ल्याने पोटाला ते पचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे आंबट ढेकर, गॅस, अॅसिडिटी आणि अस्वस्थता अशा समस्या होतात. त्यामुळे प्रयत्न करा की, रात्रीचं जेवण झोपण्याच्या साधारण २ ते ३ आधी करावं. तसेच जेवणात हिरव्या पालेभाज्या, सूप, डाळ आणि सलाद अशा हलक्या गोष्टी असाव्यात.
जेवल्यावर लगेच झोपू नका
बऱ्याच लोकांना जेवण केल्या केल्या लगेच सोफ्यावर किंवा बेडवर झोपण्याची सवय असते. पण ही सवय फारच चुकीची आहे. असं केल्यास अन्न व्यवस्थित होत नाही. जेवण केल्यानंतर ५ ते १० मिनिटं हलका वॉक करायला हवा. वॉक केल्यास अन्न पचन होतं आणि गॅस होण्याचा धोकाही कमी होतो.
आल्याचं पाणी
आल्याने पचनशक्ती मजबूत होते आणि पोटाला थंडावा देखील मिळतो. त्यामुळे जेवण झाल्यावर झोपण्याआधी एक कप गरम पाण्यात थोडं आलं किसून घाला आणि सोबतच एक चमचा मध घालून प्या. या उपायाने गॅस, अॅसिडिटी आणि आंबट ढेकरीची समस्या होणार नाही.
त्रिफळा चूर्ण
त्रिफळा हा एक जुना आणि प्रभावी आयुर्वेद उपाय आहे. रोज रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट पाण्यात १ चमचा त्रिफळा चूर्ण घालून प्यायल्यास पोट साफ राहतं. गॅस दूर होईल आणि आंबट ढेकरी सुद्धा येणार नाहीत.
झोपण्याआधी एक ग्लास कोमट पाणी
झोपण्याआधी एक ग्लास कोमट पाणी पिणं देखील खूप फायदेशीर असतं. याने पोट आतून साफ होतं आणि पचनक्रियाही चांगली होते. सोबतच शरीरातील विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत मिळते.
रात्रीच्या जेवणात जर आपण जास्त मसालेदार, तळलेले किंवा बाहेरचे पदार्थ खात असाल तर याने पोटाचं नुकसान होतं. या गोष्टींमुळे आंबट ढेकर, गॅस आणि अॅसिडिटीच्या समस्या अधिक वाढू शकतात. त्यामुळे रात्री हलकं आणि साधं जेवण करावं.
Web Summary : Avoid heavy dinners, late meals, and lying down immediately after eating. Ginger water, Triphala, and warm water before bed can ease digestion, prevent gas, acidity, and sour burps. Eat light, simple meals.
Web Summary : भारी भोजन, देर रात का खाना और खाने के तुरंत बाद लेटने से बचें। सोने से पहले अदरक का पानी, त्रिफला और गर्म पानी पाचन को आसान बनाते हैं, गैस, एसिडिटी और खट्टी डकार को रोकते हैं। हल्का भोजन करें।