Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हातापायाला मुंग्या का येतात ? फक्त तात्पुरता त्रास की कोणत्या गंभीर आजाराची शक्यता ? ४ कारणे

हातापायाला मुंग्या का येतात ? फक्त तात्पुरता त्रास की कोणत्या गंभीर आजाराची शक्यता ? ४ कारणे

Tingling in the limbs? Is it just a temporary problem or is it a sign of a serious illness? learn about 4 reasons : हातापायाला सारख्या मुंग्या येतात तर त्यामागे काही वेगळी कारणे असू शकतात का? जाणून घ्या नक्की काय होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2025 08:35 IST2025-08-13T08:30:00+5:302025-08-13T08:35:01+5:30

Tingling in the limbs? Is it just a temporary problem or is it a sign of a serious illness? learn about 4 reasons : हातापायाला सारख्या मुंग्या येतात तर त्यामागे काही वेगळी कारणे असू शकतात का? जाणून घ्या नक्की काय होते.

Tingling in the limbs? Is it just a temporary problem or is it a sign of a serious illness? learn about 4 reasons | हातापायाला मुंग्या का येतात ? फक्त तात्पुरता त्रास की कोणत्या गंभीर आजाराची शक्यता ? ४ कारणे

हातापायाला मुंग्या का येतात ? फक्त तात्पुरता त्रास की कोणत्या गंभीर आजाराची शक्यता ? ४ कारणे

हातापायाला मुंग्या येणे म्हणजे त्या भागातील नसांवर किंवा रक्तपुरवठ्यावर काही तरी परिणाम होणे. विविध प्रक्रिया घडतात. (Tingling in the limbs? Is it just a temporary problem or is it a sign of a serious illness? learn about 4 reasons)अर्थात हा प्रकार वेदनादायी नसतो त्यामुळे लक्ष दिले जात नाही. मुंग्या येणे तसे फार काळजी करण्याचे कारणही नाही. मात्र जर कायम असे होत असेल सतत काहीही कारण नसताना मुंग्या येत असतील तर नक्कीच विचार करण्याची गोष्ट आहे.

१. साधारणपणे आपण एखाद्या स्थितीत खूप वेळ बसलो किंवा झोपलो की असे होते. शरीराला जास्त स्तब्धता मिळाली की नसांवर परिणाम होतो. त्यामुळे त्या भागातील नसांवर किंवा रक्तवाहिन्यांवर दाब येतो. तेव्हा रक्तप्रवाह कमी होतो आणि नसांमधील संवेदना तात्पुरती कमी होते. त्यामुळे मुंग्या येतात किंवा झिणझिण्या येतात. हा परिणाम तात्पुरता असतो आणि दाब कमी झाल्यावर हळूहळू सगळे पुन्हा सुरळीत होते. परंतु जर सतत हातापायाला मुंग्या येत असतील किंवा वारंवार होत असतील, तर त्यामागे काही वैद्यकीय कारण असू शकते. 

२. मधुमेहामुळे नसांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांना असा त्रास होतो. मात्र जर शुगरचा त्रास नसताना असे वारंवार होत असेल तर एकदा तापासणी करुन या.  जीवनसत्त्व 'बी१२' सारख्या आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता असेल तरी झिणझिण्या येतात.

३. हायपोथायरॉईडीझम सारखे त्रास असल्यावरही असा त्रास होतो. मान किंवा पाठदुखीशी संबंधित नसांवर ताण येणे, सतत हातपायावर दाब येत असेल किंवा रक्तवाहिन्यांमधील अडथळा अशा कारणांमुळे हे लक्षण टिकून राहू शकते. 

४. काही वेळा हे मज्जासंस्थेशी संबंधित आजारांचे प्राथमिक लक्षण असू शकते. त्यामुळे मुंग्या येण्याचा त्रास वारंवार होत असेल, तर तो फक्त थकवा किंवा झोपेच्या स्थितीमुळे नसतो. यासाठी वैद्यकीय सल्ला घेऊन रक्ततपासणी, न्युरोलॉजिकल तपासणी किंवा इतर चाचण्या करून मूळ कारण शोधणे महत्त्वाचे ठरते. योग्य वेळी उपचार केल्यास मोठ्या आजारांचा धोका टाळता येतो. 

Web Title: Tingling in the limbs? Is it just a temporary problem or is it a sign of a serious illness? learn about 4 reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.