दात आणि हिरड्या मजबूत असणे हे केवळ सौंदर्यासाठीच नाही तर एकूण आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा दात किडणे, हिरड्यांतून रक्त येणे, सूज येणे किंवा दात हलायला लागणे या तक्रारी दुर्लक्षित केल्या जातात, पण वेळेवर काळजी न घेतल्यास दात खिळखिळे होण्यापर्यंत परिस्थिती जाऊ शकते. योग्य सवयी आणि थोडीशी काळजी घेतली तर दात-हिरड्या दीर्घकाळ निरोगी ठेवता येतात. दात मजबूत राहण्यासाठी नियमित आणि योग्य पद्धतीने स्वच्छता करणे सर्वात महत्त्वाचे आहे. (These things can damage your teeth , don't do these mistakes , see what to avoid )दिवसातून किमान दोन वेळा, सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे आवश्यक आहे. फार कडक ब्रश वापरल्यास हिरड्यांना इजा होऊ शकते, त्यामुळे मध्यम मऊ ब्रश वापरणे चांगले. दात घासताना फक्त दातच नाही तर हिरड्यांची कडही हळूवारपणे स्वच्छ करावी. अनेक जण फक्त पुढचे दात घासतात, पण मागचे दात आणि आतल्या बाजूची स्वच्छता तितकीच गरजेची असते.
हिरड्या मजबूत ठेवण्यासाठी तोंडाची स्वच्छता नीट करणे गरजेचे असते. दातांमध्ये अडकलेले अन्न वेळेवर काढले नाही तर त्यातून जंतुसंसर्ग होऊन हिरड्यांना सूज येते. जेवणानंतर साध्या पाण्याने खळखळून चूळ भरणे, कधी कधी कोमट मीठ पाण्याने गुळण्या करणे हे हिरड्यांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे जंतू कमी होतात आणि सूज कमी होण्यास मदत मिळते. आहाराचाही दात आणि हिरड्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डी हे घटक दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक असतात. दूध, दही, ताक, तीळ, हिरव्या पालेभाज्या, बदाम यांचा आहारात समावेश केल्यास दात मजबूत राहतात. जास्त साखरयुक्त पदार्थ, चिकट पदार्थ, कोल्ड्रिंक्स किंवा सतत चहा-कॉफी पिण्याची सवय दातांसाठी हानिकारक ठरु शकते, कारण यामुळे दातांवर थर साचतो आणि किड लागते.
दात खिळखिळे होण्यामागे हिरड्यांचे आजार हे मोठे कारण असते. हिरड्यांतून रक्त येणे, सूज, दुर्गंधी येणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. अशा वेळी घरगुती उपायांसोबतच दंतवैद्याचा सल्ला घेणे महत्त्वाचे असते. वेळेवर उपचार केल्यास दात खराब होण्याची आणि त्यावर काही प्रक्रिया करुन घेण्याची वेळ येत नाही. काही सवयी दातांच्या आरोग्यासाठी घातक ठरतात. तंबाखू, गुटखा, पानमसाला यांचा वापर केल्यास हिरड्या कमकुवत होतात आणि दात किडण्याचा धोका वाढतो. फार थंड किंवा फार गरम पदार्थ वारंवार खाल्ल्यानेही दातांची संवेदनशीलता वाढते. दातांनी खूप कडक पदार्थ फोडण्याची सवय असल्यास दात तुटण्याची किंवा कमकुवत होण्याची शक्यता असते. वयानुसार दातांची आणि हिरड्यांची काळजी आणखी महत्त्वाची ठरते. दातांची काळजी घेणे तसे फार कठीण नाही. काही ठराविक नियम लक्षात ठेवा नित्य नियमाने करा म्हणजे डॉक्टरांकडे जायची वेळ येणारच नाही.
Web Summary : Strong teeth are vital for overall health. Neglecting oral hygiene leads to decay and gum problems. Regular brushing, flossing, and a balanced diet rich in calcium and vitamins are crucial. Avoid sugary foods, tobacco, and extreme temperatures. See a dentist promptly for any issues.
Web Summary : मजबूत दांत समग्र स्वास्थ्य के लिए महत्वपूर्ण हैं। मौखिक स्वच्छता की उपेक्षा से क्षय और मसूड़ों की समस्या होती है। कैल्शियम और विटामिन से भरपूर नियमित ब्रशिंग, फ्लॉसिंग और संतुलित आहार महत्वपूर्ण हैं। शर्करा युक्त खाद्य पदार्थों, तंबाकू और अत्यधिक तापमान से बचें। किसी भी समस्या के लिए तुरंत दंत चिकित्सक से मिलें।