Bad Cholesterol : कोलेस्टेरॉलनं आजकाल अनेकांची झोप उडवली आहे. कारण शरीरात जर कोलेस्टेरॉल वाढलं तर हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. अशात नसांमध्ये घट्ट चिकटून बसलेलं जीवघेणं कोलेस्टेरॉल कमी करणं खूप गरजेचं ठरतं. यासाठी वेगवेगळी औषधंही आहेत. पण सोबतच काही नॅचरल उपाय करूनही वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करता येऊ शकतं. काही अशी फळं आहेत जी कोलेस्टेरॉल कंट्रोल करण्यास मदत करतात. सोबतच या फळांचे इतरही अनेक फायदे मिळतात. चला तर पाहुया कोणती आहेत ही फळं.
आंबट फळं
लिंबू, संत्री, मोसंबी आणि द्राक्ष यांसारख्या आंबट फळंमध्ये व्हिटामिन सी आणि फायबर भरपूर असतं. व्हिटामिन सी एक शक्तीशाली अॅंटी-ऑक्सीडेंट आहे, जे नसांची सफाई करण्यास मदत करतं. तर फायबरमुळे नसांमधील बॅड कोलेस्टेरॉल शरीरातून बाहेर निघतं. संत्र्यातील स्टेरोल्सनं सुद्धा कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत मिळते.
सफरचंद
'रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरकडे जाणं विसरा' असं अनेकदा म्हटलं जातं. सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचं फायबर असतं. जे बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं. यानं धमण्यांमध्ये जमा प्लाकही दूर होतं आणि हृदय निरोगी राहतं.
अॅवोकाडो
अॅवोकाडोला तर सुपरफूड मानलं जातं. कारण यात अनेक गुणकारी तत्व सतात. यात ऑलिव अॅसिड भरपूर असतं, ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल बाहेर पडतं आणि गुड कोलेस्टेरॉल वाढतं. तसेच यातील फायबरनं कोलेस्टेरॉलचं प्रमाण संतुलित राहतं.
केळ
केळींमध्ये फायबर आणि पोटॅशिअम असतं, जे कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. यातील डायटरी फायबर शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करतं.
बेरीज
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरीमध्ये अॅंटी-ऑक्सीडेंट आणि फायबर भरपूर असतं. यानं सूज कमी होते आणि गुड कोलेस्टेरॉल वाढण्यास व ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
टोमॅटो
टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचं तत्व असतं. जे रक्तवाहिन्या ब्लॉक करणारं कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवतं आणि रक्तवाहिन्यांना आराम देतं.