Join us

तुम्ही जास्त गोड खात असल्याची ५ लक्षणं, मनाचा लगाम खेचा नाहीतर शरीर होईल आजारांचा अड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:05 IST

Health Tips : गोड कमी खायला हवं हे अजूनही अनेकांच्या लक्षात येत नाहीये. पण आपण जेवढं जास्त गोड खाऊ तेवढा आजारांचा धोका अधिक वाढतो.

Health Tips : लठ्ठपणा वाढण्यासाठी साखर सगळ्यात जास्त कारणीभूत ठरते हे एक्सपर्ट ओरडून ओरडून सांगतात, मग ती कोणत्याही माध्यमातून का असेना. पण लोक जिभेला आणि मनाला काही आवर घालू शकत नाहीत. काही होत नाही, जे होईल ते बघू...असा विचार करून सतत दुर्लक्ष केलं जातं. गोड कमी खायला हवं हे अजूनही अनेकांच्या लक्षात येत नाहीये. पण आपण जेवढं जास्त गोड खाऊ तेवढा आजारांचा धोका अधिक वाढतो.

आजकाल तर प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड फूडच्या माध्यमातूनही भरपूर साखर खात आहेत. यामुळे टाइप २ डायबिटीसचा धोका तर वाढतोच, सोबतच लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग, स्ट्रोक, डिमेंशिया, अल्झायमर, फॅटी लिव्हर आणि आर्थरायटिस यांसारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. चिंतेची बाब म्हणजे अनेकांना तर हे माहीतही नसतं की, ते खूप जास्त प्रमाणात साखर किंवा गोड खात आहेत. त्यामुळे आज अशाच ५ संकेतांबाबत आपण बघणार आहोत, ज्याद्वारे समजतं की, आपण प्रमाणापेक्षा जास्त साखर खात आहात.

जास्त साखरेचे संकेत

वेट लॉस कोच सुमन बागरिया यानी अलिकडेच इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करून याबाबत माहिती दिली. त्यात त्यानी आपण जास्त साखर खात असल्याचे ५ संकेत सांगितले आहेत.

पुन्हा पुन्हा लघवी लागणे

जर आपल्याला पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागत असेल तर हा आपल्या शरीरात शुगर वाढल्याचा संकेत असू शकतो. शरीरात शुगर वाढल्यावर ती बाहेर काढण्यासाठी किडनीला जास्त जोर लावावा लागतो. अशात पुन्हा पुन्हा लघवी लागत असेल तर तहानही जास्त लागेल.

भूक जास्त लागणे

एकदा जेवण केल्यावर पुन्हा पुन्हा भूक लागत असेल, सतत काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल तर हा अधिक शुगर इनटेक करत असल्याचा संकेत असू शकतो. सुमन सांगतात की, जेवढ्या वेगानं शुगर वाढते, तेवढ्या वेगानं कमी सुद्धा होते. त्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा भूक लागते. 

ब्रेन फॉग किंवा फोकस न करू शकणे

जास्त साखर खाल्ल्यानं ब्रेन फॉग किंवा लक्ष केंद्रीत करण्याची समस्या होऊ शकते. ब्रेन फॉग एक अशी स्थिती आहे ज्यात व्यक्तीची विचार करण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि एकाग्रता प्रभावित होते. अशात कन्फ्यूजनही खूपदा होतं.

त्वचेत बदल

त्याशिवाय शरीरात जास्त शुगर असल्याचे काही संकेत त्वचेवरही दिसतात. जसे की, त्वचेवर पिगमेंटेशन, घशाजवळ डार्क पॅचेस किंवा स्किन टॅग्स. या गोष्टी दर्शवतात की, आपण जास्त साखर खात आहात.

टॅग्स : हेल्थ टिप्समधुमेहहृदयरोग