Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > झोपण्याच्या 'या' ५ चुकीच्या पद्धतींमुळे बिघडतं तुमचं आरोग्य! तज्ज्ञांचा सल्ला - छोटं कारण पडतं महागात...

झोपण्याच्या 'या' ५ चुकीच्या पद्धतींमुळे बिघडतं तुमचं आरोग्य! तज्ज्ञांचा सल्ला - छोटं कारण पडतं महागात...

these 5 common night habits look harmless : harmless night habits that harm health : common bedtime habits to avoid : अनेकदा आपण नकळत काही चुका करतो, ज्यामुळे फक्त झोपच खराब होत नाही तर आरोग्यावरही त्याचे गंभीर परिणाम होतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2026 18:35 IST2026-01-12T18:31:58+5:302026-01-12T18:35:19+5:30

these 5 common night habits look harmless : harmless night habits that harm health : common bedtime habits to avoid : अनेकदा आपण नकळत काही चुका करतो, ज्यामुळे फक्त झोपच खराब होत नाही तर आरोग्यावरही त्याचे गंभीर परिणाम होतात.

these 5 common night habits look harmless harmless night habits that harm health common bedtime habits to avoid | झोपण्याच्या 'या' ५ चुकीच्या पद्धतींमुळे बिघडतं तुमचं आरोग्य! तज्ज्ञांचा सल्ला - छोटं कारण पडतं महागात...

झोपण्याच्या 'या' ५ चुकीच्या पद्धतींमुळे बिघडतं तुमचं आरोग्य! तज्ज्ञांचा सल्ला - छोटं कारण पडतं महागात...

दिवसभराच्या थकव्यांनंतर झोप ही शरीरासाठी सर्वात आवश्यक आणि आरामदायी प्रक्रिया मानली जाते. मात्र झोपेची वेळ, झोपण्याची पद्धत आणि झोपण्यापूर्वीच्या सवयी यांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. अनेकदा नकळतपणे आपण झोपताना काही अशा चुका करतो, ज्या हळूहळू शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण करतात. पाठदुखी, मानदुखी, पचनाचे विकार, ताणतणाव, झोप न लागणे किंवा थकवा कायम राहणे यामागे झोपेच्या चुकीच्या सवयी कारणीभूत असू शकतात. विशेष म्हणजे या चुका रोजच्या रोज घडत असल्यामुळे आपण त्याकडे फारसे लक्ष देत नाही(these 5 common night habits look harmless).

उत्तम आरोग्यासाठी पुरेशी आणि शांत झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. झोप म्हणजे केवळ विश्रांती नव्हे, तर ती शरीराची 'रिपेअरिंग' आणि 'हिलिंग' करण्याची वेळ असते. अशा परिस्थितीत झोपण्याची योग्य पद्धत माहीत असणे खूप गरजेचे आहे. मात्र, अनेकदा आपण नकळत काही अशा चुका करतो, ज्यामुळे केवळ झोपच खराब होत नाही तर आरोग्यावरही त्याचे गंभीर परिणाम होतात. सुप्रसिद्ध आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी अशाच ५ सामान्य चुकांबद्दल माहिती (harmless night habits that harm health) दिली आहे. त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्यांनी सांगितले आहे की, झोपताना कोणत्या ५ चुका टाळणे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. झोपताना आपण नेहमी करत असलेल्या अशा ५ मोठ्या चुका कोणत्या आहेत (common bedtime habits to avoid) आणि त्या टाळल्या नाहीत तर कोणत्या शारीरिक समस्या उद्भवू शकतात ते पाहूयात... 

झोपताना कोणत्या ५ चुका अजिबात करू नयेत... 

चूक १ :- पोटावर (पालथे) झोपणे :- अनेक लोकांना पोटावर किंवा पालथे झोपण्याची सवय असते, परंतु आरोग्याच्या दृष्टीने ही पद्धत अजिबात योग्य मानली जात नाही. श्वेता शाह यांच्या मते, पोटावर झोपल्यामुळे आपल्या श्वसननलिकेवर अनावश्यक दबाव येतो. यामुळे श्वास घेताना अडथळे येऊ शकतात आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. या स्थितीमुळे मानदुखी, पाठदुखी आणि मणक्यावर ताण येण्याची शक्यता असते. पोटावर झोपणे टाळावे. त्याऐवजी डाव्या कुशीवर झोपणे सर्वात उत्तम मानले जाते. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे हृदय आणि श्वसनसंस्थेवर कमीत कमी ताण येतो, पचन सुधारते आणि शांत झोप लागण्यास मदत होते.

मुलांना प्रेमानं विचारा ६ प्रश्न, कळेल त्यांच्या मनात काय चाललंय-त्यांनाही वाटेल आईबाबांचा आदर...

चूक २ :- वारंवार झोपेच्या गोळ्या घेणे :- झोप येत नाही म्हणून किंवा अपुऱ्या झोपेमुळे अनेकजण स्वतःच्या मनाने झोपेच्या गोळ्या घेण्यास सुरुवात करतात. पण असे करणे आरोग्यासाठी अत्यंत धोक्याचे ठरू शकते. न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांच्या मते, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेच्या गोळ्या घेण्याची सवय तुमच्या श्वसन प्रक्रियेवर परिणाम करू शकते. या गोळ्यांचा चुकीच्या पद्धतीने किंवा वारंवार वापर केल्यास शरीराचे इतर अवयव निकामी होण्याचा किंवा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असतो. यामुळे शरीराला या गोळ्यांचे व्यसन लागते आणि नैसर्गिक झोप येणे कठीण होते. कधीही स्वतःच्या मनाने मेडिकलमधून झोपेची औषधे विकत घेऊ नका. जर तुम्हाला झोपेची गंभीर समस्या असेल, तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणेच फायद्याचे ठरेल.

पाठ-कंबर दुखीपासून हवाय कायमचा आराम? अभिनेत्री भाग्यश्रीचे हे ५ घरगुती उपाय तुम्हाला देतील इन्स्टंट रिलीफ... 

चूक ३ :- खूप उशिरा आणि खूप जास्त हेव्ही जेवण जेवणे :- रात्री उशिरा जेवणे आणि आहारात जड पदार्थांचा समावेश करणे, या दोन्ही सवयी तुमच्या झोपेचे सर्वात मोठे शत्रू आहेत. न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह सांगतात की, जेव्हा आपण रात्री उशिरा किंवा खूप हेव्ही जेवण करतो, तेव्हा शरीराला ते पचवण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करावी लागते आणि अधिक कष्ट घ्यावे लागतात. यामुळे शरीर 'रेस्ट मोड'मध्ये जाण्याऐवजी 'डायजेशन मोड'मध्ये राहते. पचनक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे तुम्हाला वारंवार जाग येऊ शकते किंवा झोप पूर्ण होऊनही सकाळी उठल्यावर थकवा जाणवू शकतो. ॲसिडिटी आणि अपचनामुळे शांत व गाढ झोप लागण्यात अडथळे येतात. नेहमी हलका आणि संतुलीत आहार घ्या. प्रयत्न करा की, झोपण्यापूर्वी किमान २ ते ३ तास आधी तुमचे जेवण पूर्ण झालेले असेल. यामुळे शरीराला पचनासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि आपल्याला शांत झोप लागते.

चूक ४ :- उशाशी मोबाईल ठेवून झोपणे :- आजकल अनेकांना मोबाईल बघता बघता झोपण्याची सवय लागली आहे आणि झोप लागल्यावर फोन उशाशी किंवा उशीखालीच ठेवून दिला जातो. ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांच्या मते, फोन डोक्याजवळ ठेवून झोपल्यामुळे त्यातून निघणारे 'रेडिएशन' आणि स्क्रीनची 'ब्लू लाईट' तुमच्या मेंदूवर परिणाम करते. यामुळे शरीरातील मेलाटोनिन (झोपेसाठी आवश्यक हार्मोन) कमी होते आणि झोप खराब होते. मोबाईल जवळ असल्यामुळे मानसिक तणाव आणि अस्वस्थता वाढू शकते. तसेच, रात्री वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे तुमची गाढ झोप मोडते, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी चिडचिड आणि थकवा जाणवतो. झोपताना मोबाईल नेहमी स्वतःपासून दूर ठेवा. शक्य असल्यास झोपण्यापूर्वी अर्धा तास आधीच मोबाईलचा वापर थांबवा आणि फोन सायलेंट मोड वर ठेवून दुसऱ्या खोलीत किंवा लांब असलेल्या टेबलवर ठेवा.

चूक ५ :- टीव्ही चालू ठेवून झोपणे :- अनेकजणांना रात्री टीव्ही पाहत झोपण्याची सवय असते आणि तशातच टीव्ही रात्रभर सुरू राहतो. ही सवय तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर अत्यंत वाईट परिणाम करू शकते. स्क्रीनचा प्रकाश आणि टीव्हीचा आवाज तुमच्या मेंदूला पूर्णपणे 'रिलॅक्स' होऊ देत नाही. झोपेत असतानाही आपला मेंदू त्या आवाजावर प्रतिक्रिया देत असतो, ज्यामुळे गाढ झोप लागत नाही.टीव्हीच्या आवाजाचा आणि प्रकाशाचा परिणाम तुमच्या हृदयाचे ठोके, श्वसनक्रिया आणि एकूणच झोपेच्या दर्जावर होतो. यामुळे सकाळी उठल्यावर फ्रेश वाटण्याऐवजी डोकं जड वाटू शकतं. झोपण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी टीव्ही बंद करा. झोपताना खोलीत शांतता आणि शक्य तितका गडद अंधार ठेवा, ज्यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या झोप लागण्यास मदत होईल.

आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह म्हणतात की, "झोप हे आपल्या आरोग्यासाठी एक अत्यंत मौल्यवान रत्न आहे. जर आपण झोपण्याच्या या छोट्या-छोट्या सवयी सुधारल्या, तर आपली झोप अधिक चांगली होईल. यामुळे शरीर अधिक सुदृढ राहील आणि दिवसभर काम करण्यासाठी आपली ऊर्जा देखील वाढेल."


Web Title : सोते समय की 5 गलतियाँ जो आपकी सेहत बिगाड़ रहीं हैं, विशेषज्ञ सलाह!

Web Summary : पोषण विशेषज्ञ श्वेता शाह के अनुसार, सोने की गलत आदतें स्वास्थ्य को प्रभावित करती हैं। पेट के बल सोना, नींद की गोलियां लेना, देर रात भारी भोजन, फोन या टीवी से बचें। कुशल क्षेम के लिए नींद को प्राथमिकता दें।

Web Title : 5 sleep mistakes ruining your health, expert advice: small cause, big cost!

Web Summary : Poor sleep habits impact health, says nutritionist Shweta Shah. Avoid sleeping on your stomach, taking sleeping pills, late heavy meals, phones, or TV. Prioritize sleep hygiene for well-being.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.