Join us

डोळ्यांमध्ये पिवळे-लाल ठिपके दिसतात, सूजही आहे? उठा आणि लगेच करा कोलेस्टेरॉलची टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 10:37 IST

High Cholesterol Sign In Eye : अनहेल्दी फूड्स खाणे, तासंतास एकाच जागी बसून काम करमे आणि तणाव या कारणांमुळे लोकांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल वाढत आहे. मात्र, बरेच लोक काही होत नाही म्हणून याकडे दुर्लक्ष करतात.

High Cholesterol Sign In Eye : कोलेस्टेरॉल...कोलेस्टेरॉल...कोलेस्टेरॉल आरोग्यासंबंधी विषय निघाला की, जिकडे-तिकडे हाच शब्द ऐकायला किंवा वाचायला मिळतो. आधी माहितही नसलेला हा शब्द आज लोकांना तोंडपाठ झाला आहे. कोलेस्टेरॉल म्हटलं की, लोकांच्या मनात धडकीच भरते. कारणही तसंच आहे. जर शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं तर हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोकचा धोका असतो. अनहेल्दी फूड्स खाणे, तासंतास एकाच जागी बसून काम करमे आणि तणाव या कारणांमुळे लोकांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल वाढत आहे. मात्र, बरेच लोक काही होत नाही म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. पण ही चूक तुम्हाला मोठा झटका देऊ शकते. त्यामुळे हाय कोलेस्टेरॉल असल्यावर शरीरात दिसणाऱ्या काही लक्षणांकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. 

कोलेस्टेरॉल वाढल्यावर हृदयाचं नुकसान होतं हे तुम्हाला माहीत आहेच, पण अनेकांना हे माहीत नसतं की, हाय कोलेस्टेरॉलमुळे डोळ्यांचं देखील मोठं नुकसान होतं. कोलेस्टेरॉल वाढल्यावर डोळ्यांमध्ये काही लक्षणं दिसतात. आज या लेखात आम्ही त्याबाबत तुम्हाला सांगणार आहोत.  

डोळ्यांजवळ सूज

जर तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला सूज आली असेल आणि जास्त दिवस राहत असेल वेळीच सावध होण्याची गरज आहे. हा कोलेस्टेरॉल हाय झाल्याचा संकेत असू शकतो. वेळीच डॉक्टरांना दाखवा आणि योग्य ते उपचार घ्या.

कॉर्नियावर पिवळा ठिपका 

जेव्हा शरीरात कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू लागतं, तेव्हा डोळ्याच्या कॉर्नियावर पांढरा किंवा हलक्या पिवळ्या रंगाचा ठिपका दिसू शकतो. अनेकदा लोक याला डोळ्यांची समस्या मानतात. पण हा हाय कोलेस्टेरॉलचा संकेत आहे.

पिवळे डाग दिसणे

जर डोळ्यांच्या पापण्यांवर किंवा डोळ्यांच्या आसपास पिवळे डाग दिसत असतील तर ते हाय कोलेस्टेरॉलचे संकेत असू शकतात. 

डोळ्यात जळजळ होणे

जर डोळ्यांमध्ये नेहमीच जळजळ किंवा खाज येत असेल तर हे हाय कोलेस्टेरॉलचं लक्षण असू शकतं. कोलेस्टेरॉल वाढल्यावर रक्तात हळूहळू खराब फॅट वाढू लागतं, ज्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ किंवा खाज होते.

हाय कोलेस्टेरॉलची इतर लक्षणं

सतत थकवा जाणवणे

अस्वस्थ वाटणे

त्वचेवर पिवळ्या रंगाची गाठ

हात आणि पायांवर सूज

हात-पाय थंड पडणे

छातीत वेदना

श्वास घेण्यास त्रास

ब्लड प्रेशर वाढणं

टॅग्स : हृदयरोगहृदयविकाराचा झटकाहेल्थ टिप्स