लवंगतेल म्हणजे सुगंधी व औषधी गुणधर्मांनी भरलेले तेल. आयुर्वेदात आणि घरगुती उपचारांमध्ये फार पूर्वीपासून वापरले जाते. लवंगेत असलेले युजेनॉल हे घटक याला वेदनाशामक, जंतुनाशक आणि दाहशामक गुण देतात. (There should be a small bottle of clove oil in the house! From toothache to joint pain, see how to use the medicine.)म्हणूनच लवंगतेल केवळ सुगंधासाठीच नाही, तर आरोग्याच्या अनेक तक्रारींवर उपयुक्त ठरते.
सर्वात प्रभावी आणि वर्षानुवर्षे केला जाणारा उपयोग म्हणजे दातदुखीवर उपाय म्हणून. दात किंवा हिरडीत कळा येत असतील, सूज किंवा दाह जाणवत असेल तर थोडेसे लवंगतेल कापसाच्या बोळ्यावर घेऊन दुखणाऱ्या ठिकाणी लावल्यास तात्काळ आराम मिळतो. लवंगतेलातील जंतुनाशक गुण तोंडातील जंतू कमी करतात आणि वेदना शांत करतात. त्यामुळेच अनेक टूथपेस्ट आणि माउथवॉशमध्येही लवंग वापरली जाते.
सर्दी, खोकला आणि घसा दुखणे यासाठीही लवंगतेल उपयुक्त मानले जाते. कोमट पाण्यात एक-दोन थेंब लवंगतेल घालून गुळण्या केल्यास घशातील जंतुसंसर्ग कमी होण्यास मदत होते. छातीत कफ साचला असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर लवंगतेलाचा वास घेणे किंवा लवंगतेल घातलेल्या गरम पाण्याची वाफ घेणे फायद्याचे ठरते. त्यामुळे श्वासमार्ग मोकळे होतात आणि श्वसनाला आराम मिळतो. पचनाच्या तक्रारींवर लवंगतेल फायदेशीर ठरते. गॅस, पोटदुखी, अपचन किंवा पोटात जडपणा जाणवत असेल तर लवंगतेल फायद्याचेच ठरते. त्यामुळे दातांना लावल्यावर ते पोटात गेले म्हणून त्याचा काही त्रास होणार नाही. उलट फायदाच होईल.
डोकेदुखी, स्नायू दुखणे किंवा सांधेदुखीमध्येही लवंगतेल उपयोगी ठरते. नारळ किंवा तीळ तेलात लवंगतेल मिसळून हलक्या हाताने मालीश केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि वेदना कमी होतात. थंडीच्या दिवसांत अंग दुखणे किंवा आखडणे जाणवत असेल तर हा उपाय विशेष आराम देणारा ठरतो. लवंगतेलाचा उपयोग मानसिक ताण आणि थकवा कमी करण्यासाठीही केला जातो. त्याचा सुगंध मन शांत करतो, एकाग्रता वाढवतो आणि थकवा कमी करण्यास मदत करतो. म्हणूनच अरोमाथेरपीमध्येही लवंगतेलाचा वापर केला जातो. एकूणच लवंगतेल हे घरोघरी असावे कारण ते बहुगुणी तेल आहे.
