Join us

सतत स्मार्ट फोन स्क्रोल करकरुन अंधूक दिसू लागले? ४ व्हिटॅमिन्सचा डोस वाढवा, नजर राहील शाबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2023 19:29 IST

The Top 4 Best Vitamins for Eye Health आपली नजर चांगली राहण्यासाठी आवश्यक जीवनसत्व मिळावी म्हणून आहारात करा बदल

डोळ्यांमुळे सृष्टीतील सौंदर्य अनुभवता येते. डोळा हा शरीरातील सर्वात नाजूक भागांपैकी एक आहे. त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या स्मार्टफोनचा वापर वाढत चालला आहे. स्क्रीन टायमिंग वाढल्यामुळे कमी वयात लहान मुलांना चष्मा लागत आहे. अनेकदा शरीरातील पौष्टीक घटकांच्या कमतरतेमुळे देखील डोळ्यांची दृष्टी कमी होत चालली आहे. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहारात जीवनसत्त्वांचा समावेश असायला हवा. कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे डोळ्यांची दृष्टी कमी होते, हे पाहूयात(The Top 4 Best Vitamins for Eye Health).

व्हिटॅमिन ए

हेल्थलाइन या वेबसाईटनुसार, डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए सर्वात महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे दृष्टी कमी होते.  आहारातून व्हिटॅमिन ए मिळवण्यासाठी पालक, गाजर, बीटरूट यांसारख्या हिरव्या पालेभाज्या खा.

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे स्वयंपाकघरातले ४ जिन्नस, स्वस्तात मस्त नैसर्गिक उपाय

व्हिटॅमिन ई

डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटॅमिन ई खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे डोळ्यांच्या पेशींना नुकसान पोहचते. यासाठी आहारात बदाम, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलाच्या बिया, किवी, आंबा इत्यादींचा समावेश करा.

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. मुख्य म्हणजे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते. याच्या सेवनाने दृष्टी सुधारते. यासाठी आहारात संत्री, किवी, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, टोमॅटो इत्यादींचा समावेश करा.

बिपाशा बसूच्या लेकीला असलेला हृदयाचा आजार नेमका काय आहे? तो कशाने होतो, टाळायचा कसा?

व्हिटॅमिन बी6, बी9 आणि बी12

व्हिटॅमिन बी6 आणि व्हिटॅमिन बी9 आणि बी12 डोळ्यांचे आरोग्य सुधारतात. दूध, केळी, सूर्यफुलाच्या बिया खा. याशिवाय डोळ्यांच्या आरोग्यासाठी ल्युटीन, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, थायामिन आणि रिबोफ्लेविन यांसारखे पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स आवश्यक असतात. यांचा देखील आहारात समावेश करा.

टॅग्स : डोळ्यांची निगाहेल्थ टिप्सआरोग्य