Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > महिलांच्या दंडावर आणि मांड्यांवर चरबी जास्त साठते त्याचे कारण अगदी साधेच, जाणून घ्या नक्की काय घडते

महिलांच्या दंडावर आणि मांड्यांवर चरबी जास्त साठते त्याचे कारण अगदी साधेच, जाणून घ्या नक्की काय घडते

The reason why women accumulate more fat on their arms and thighs is very simple, know exactly what happens : मांडी आणि दंड जास्त जाड दिसण्याचे कारण पाहा आणि उपाय करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2026 16:23 IST2026-03-30T16:22:20+5:302026-03-30T16:23:50+5:30

The reason why women accumulate more fat on their arms and thighs is very simple, know exactly what happens : मांडी आणि दंड जास्त जाड दिसण्याचे कारण पाहा आणि उपाय करा.

The reason why women accumulate more fat on their arms and thighs is very simple, know exactly what happens | महिलांच्या दंडावर आणि मांड्यांवर चरबी जास्त साठते त्याचे कारण अगदी साधेच, जाणून घ्या नक्की काय घडते

महिलांच्या दंडावर आणि मांड्यांवर चरबी जास्त साठते त्याचे कारण अगदी साधेच, जाणून घ्या नक्की काय घडते

महिलांच्या शरीरात दंड आणि मांडीच्या भागात फॅट्स जमा होणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. अनेक महिलांना हा त्रास वाटतो आणि तो केवळ दिसण्यापुरता मर्यादित नसून आत्मविश्वासावरही परिणाम करतो. (The reason why women accumulate more fat on their arms and thighs is very simple, know exactly what happens)पण यामागे केवळ आहार किंवा व्यायामाचा अभाव नसतो, तर काही ठोस शास्त्रीय कारणेही असतात. त्यामुळे स्वतः बद्दल वाईट न वाटून घेता कारणे ओळखा. 

महिलांच्या शरीररचनेत हार्मोन्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. विशेषतः इस्ट्रोजेन हा हार्मोन शरीरात फॅट कुठे साठवले जाईल हे ठरवतो. महिलांमध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरात फॅट्स कंबरेखालील भागात म्हणजेच मांडी, नितंब आणि हातांमध्ये जास्त प्रमाणात साठतात. हे जैविकदृष्ट्या नैसर्गिक आहे, कारण शरीर भविष्यातील ऊर्जा साठवण्यासाठी आणि प्रजननासाठी ही रचना तयार ठेवते.

याशिवाय, महिलांच्या शरीरात स्नायूंचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आणि फॅट टक्केवारी जास्त असते. स्नायू जितके कमी तितका मेटाबॉलिझम कमी असतो, त्यामुळे शरीरात जास्त कॅलरीज फॅटच्या स्वरूपात साठवल्या जातात. यामुळे विशेषतः दंड आणि मांडीच्या भागात चरबी लवकर वाढते. वयानुसारही हा बदल अधिक जाणवतो, कारण वय वाढल्यावर मेटाबॉलिझम मंदावतो आणि हार्मोनल बदल होतात.

तसेच, दीर्घकाळ बसून राहणे, हालचालींचा अभाव आणि चुकीचा आहार हेही महत्त्वाचे कारण ठरतात. जास्त तेलकट, गोड किंवा प्रोसेस्ड फूड खाल्ल्यास शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतात. त्या लगेच वापरल्या जात नाहीत आणि त्या विशिष्ट भागांमध्ये साठतात. विशेषतः मांडी आणि हातांमध्ये फॅट जमा होण्याची प्रवृत्ती अधिक असते.

या समस्येवर उपाय म्हणून सर्वप्रथम नियमित व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. केवळ चालणे पुरेसे नसून स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे महत्त्वाचे आहे. हातांसाठी पुश-अप्स, ट्रायसेप डिप्स, डंबेल एक्सरसाइज यांचा समावेश करावा. मांडीसाठी स्क्वॅट्स, लंजेस, लेग रेजेस यांसारख्या व्यायामांचा फायदा होतो. हे व्यायाम स्नायू मजबूत करतात आणि फॅट कमी करण्यास मदत करतात.

आहारातही बदल करणे गरजेचे आहे. प्रथिनयुक्त आहार घेतल्यास स्नायू वाढण्यास मदत होते आणि मेटाबॉलिझम सुधारतो. डाळी, कडधान्ये, दूध यांचा आहारात समावेश करावा. साखर आणि मैद्याचे पदार्थ कमी करणे आवश्यक आहे. तसेच भरपूर पाणी पिणेही महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि फॅट कमी होण्यास मदत होते. त्यामुळे या गोष्टी अगदी सामान्य आहेत. प्रत्येकीच्या शरीराची रचना वेगळी असते. 

Web Title : महिलाओं की बांहों और जांघों पर चर्बी जमा होने के कारण: जानिए।

Web Summary : एस्ट्रोजन, कम मांसपेशियां और आहार महिलाओं की बांहों और जांघों में चर्बी जमा करते हैं। व्यायाम और प्रोटीन युक्त आहार इसे कम करने में मदद कर सकते हैं। नियमित व्यायाम जरूरी है।

Web Title : Why women store more fat on arms and thighs: reasons.

Web Summary : Estrogen, lower muscle mass, and diet cause fat accumulation in women's arms and thighs. Exercise and a protein-rich diet can help reduce it. Regular exercise is essential.