Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Teeth Whitening : घरगुती औषधी घटक वापरुन करता येतं हर्बल दंतमंजन, केमिकलवाल्या टूथपेस्टपेक्षा भारी आणि दातांसाठी चांगले...

Teeth Whitening : घरगुती औषधी घटक वापरुन करता येतं हर्बल दंतमंजन, केमिकलवाल्या टूथपेस्टपेक्षा भारी आणि दातांसाठी चांगले...

Teeth Whitening with Homemade Herbal Tooth Powder : Herbal Tooth Powder Nature Secret For Oral Health : Make Your Own Natural, Whitening Tooth Powder : Simple homemade ayurvedic powder for teeth whitening : दात चांगले राहावे असे वाटत असतील तर दातांची योग्य निगा राखायलाच हवी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2025 17:25 IST2025-05-22T17:14:21+5:302025-05-22T17:25:00+5:30

Teeth Whitening with Homemade Herbal Tooth Powder : Herbal Tooth Powder Nature Secret For Oral Health : Make Your Own Natural, Whitening Tooth Powder : Simple homemade ayurvedic powder for teeth whitening : दात चांगले राहावे असे वाटत असतील तर दातांची योग्य निगा राखायलाच हवी.

Teeth Whitening with Homemade Herbal Tooth Powder Simple homemade ayurvedic powder for teeth whitening Herbal Tooth Powder Nature Secret For Oral Health | Teeth Whitening : घरगुती औषधी घटक वापरुन करता येतं हर्बल दंतमंजन, केमिकलवाल्या टूथपेस्टपेक्षा भारी आणि दातांसाठी चांगले...

Teeth Whitening : घरगुती औषधी घटक वापरुन करता येतं हर्बल दंतमंजन, केमिकलवाल्या टूथपेस्टपेक्षा भारी आणि दातांसाठी चांगले...

आपले दात आणि एकूणच ओरल हेल्थची काळजी घेण्यासाठी, आपण रोज सकाळी ब्रश करतो. आपण सगळेच दात घासण्यासाठी टूथपेस्टचा वापर करतो. असे असले तरीही आजकाल बाजारात मिळणाऱ्या टूथपेस्टमध्ये (Teeth Whitening with Homemade Herbal Tooth Powder) केमिकल्सचं प्रमाण वाढत चाललं आहे, जे दात आणि हिरड्यांच्या (Herbal Tooth Powder Nature Secret For Oral Health) आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकत. यासाठीच (Make Your Own Natural, Whitening Tooth Powder) आजकाल बहुतेकजण, केमिकल्सयुक्त टूथपेस्ट वापरण्यापेक्षा घरगुती आणि नैसर्गिक उपायांवर अधिक जास्त भर देत आहेत(Simple homemade ayurvedic powder for teeth whitening).

केमिकल्स आणि हानिकारक रसायनयुक्त टूथपेस्ट वापरण्यापेक्षा दातांसाठी घरगुती आणि नैसर्गिक उपाय करणे केव्हाव्ही उत्तमच. दातांसाठी टूथपेस्टऐवजी काही घरगुती पदार्थांपासून आपण औषधी अशी टूथ पावडर तयार करु शकतो. आजीबाईच्या बटव्यातील सैंधव मीठ, हळद, लवंग, कडुनिंब, पेरूची पाने यांचा वापर करून सहज घरगुती टूथपेस्ट पावडर तयार करता येते. ही पावडर केवळ दातांची स्वच्छता राखत नाही, तर हिरड्यांची मजबुती, तोंडातील दुर्गंधी दूर करणं, आणि दातदुखीपासून आराम मिळवणं यासारखे अनेक फायदे देते. ही घरगुती व नैसर्गिक टूथपावडर कशी तयार करायची ते पाहूयात.    

साहित्य :- 

१. सैंधव मीठ - १/२ कप 
२. हळद - १/२ कप 
३. कोळशाची पूड - १/२ कप 
४. दालचिनीच्या काड्या किंवा पावडर - २ काड्या 
५. लवंग - २० ते २५ लवंग काड्या 
६. पेरूच्या झाडांची पानं - ३ ते ४ पानं 
७. कडुलिंबाची पाने - २० ते ३० पाने 

लघवीतले ‘हे’ ४ बदल सांगतात किडनीच्या आजाराची लक्षणं, पाहा तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना...


रात्री वारंवार लघवीला उठावे लागते, झोपमोड होते ? डॉक्टर सांगतात ४ उपाय, झोप लागेल शांत...

कृती :-  

सगळ्यात आधी मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात सैंधव मीठ, हळद, कोळशाची पूड, दालचिनीच्या काड्या किंवा पावडर, लवंग घालावी. त्यानंतर २ ते ३ दिवस उन्हात व्यवस्थित सुकवून घेतलेली पेरूच्या झाडांची पानं आणि कडुलिंबाची पाने यात घालावीत. आता सगळे जिन्नस एकत्रित मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक  पावडर तयार करून घ्यावी. तयार पावडर एका हवाबंद डब्यांत स्टोअर करून ठेवावी. आपण नेहमीच्या वापरासाठी टूथपेस्ट ऐवजी या घरगुती आयुर्वेदिक पावडरने दात घासून स्वच्छ करु शकता.     

स्वयंपाकघरात तासंतास उभं राहून पाय दुखतात? ३ सोप्या गोष्टी, पाय-टाचा-कंबर दुखणार नाही...

टूथपेस्ट ऐवजी या आयुर्वेदिक पावडरने दात घासण्याचे फायदे... 

१. सैंधव मीठ :- तोंडातील जंतूंना नष्ट करून दात आणि हिरड्यांची स्वच्छता करण्यासाठी फायदेशीर. 
२. हळद :- हिरड्यांची सूज कमी करते, आणि तोंडातील छोट्या जखमा भरून काढते. 
३. कोळसा :- दातांवरील डाग, पिवळसरपणा दूर करून नैसर्गिक पांढरेपणा वाढवतो.
४. दालचिनी :- तोंडातील दुर्गंधी दूर करते आणि ताजं, फ्रेश फील देते.
५. लवंग :- दातदुखी कमी करते आणि हिरड्यांना आराम देते.
६. पेरूची पाने :- हिरड्यांना मजबुती देण्यासाठी उपयुक्त. याचबरोबर, हिरड्यातील रक्तस्राव कमी करतात आणि बॅक्टेरिया मारतात.
७. कडुनिंबाची पाने :- तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून संसर्ग टाळतात आणि एकूणच ओरल हेल्थची काळजी घेतात.

Web Title: Teeth Whitening with Homemade Herbal Tooth Powder Simple homemade ayurvedic powder for teeth whitening Herbal Tooth Powder Nature Secret For Oral Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.