Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दात व हिरड्यांच्या समस्यांवर आजीबाईच्या बटव्यातील उपाय! वापरा घरगुती औषधी दंतमंजन-दात सांभाळा...

दात व हिरड्यांच्या समस्यांवर आजीबाईच्या बटव्यातील उपाय! वापरा घरगुती औषधी दंतमंजन-दात सांभाळा...

Teeth Whitening with Homemade Herbal Tooth Powder : Herbal Tooth Powder Nature Secret For Oral Health : Make Your Own Natural, Whitening Tooth Powder : Simple homemade ayurvedic powder for teeth whitening : ओरल हेल्थची काळजी घेताना, किमान एकदा तरी करुन पाहावा असा आजीबाईच्या बटव्यातील उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 15:08 IST2025-06-13T14:57:14+5:302025-06-13T15:08:45+5:30

Teeth Whitening with Homemade Herbal Tooth Powder : Herbal Tooth Powder Nature Secret For Oral Health : Make Your Own Natural, Whitening Tooth Powder : Simple homemade ayurvedic powder for teeth whitening : ओरल हेल्थची काळजी घेताना, किमान एकदा तरी करुन पाहावा असा आजीबाईच्या बटव्यातील उपाय...

Teeth Whitening with Homemade Herbal Tooth Powder Herbal Tooth Powder Nature Secret For Oral Health Make Your Own Natural, Whitening Tooth Powder Simple homemade ayurvedic powder for teeth whitening | दात व हिरड्यांच्या समस्यांवर आजीबाईच्या बटव्यातील उपाय! वापरा घरगुती औषधी दंतमंजन-दात सांभाळा...

दात व हिरड्यांच्या समस्यांवर आजीबाईच्या बटव्यातील उपाय! वापरा घरगुती औषधी दंतमंजन-दात सांभाळा...

दात, हिरड्यांसोबतच संपूर्ण ओरल हेल्थच्या स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. बरेचदा आपल्यापैकी अनेकांना दात आणि हिरड्यांच्या अनेक समस्या वरचेवर (Teeth Whitening with Homemade Herbal Tooth Powder) त्रास देतात. ओरल हेल्थ खराब असली की त्याचा थेट परिणाम हा दात आणि हिरड्यांवर ( Herbal Tooth Powder Nature Secret For Oral Health) देखील दिसून येतो. काहीवेळा दातांना कीड लागणे, हिरड्यांना सूज येणे, रक्तस्त्राव होणे, तोंडातून दुर्गंधी येणे अशा एक ना (Make Your Own Natural, Whitening Tooth Powder) अनेक समस्या असतात. या सगळ्याच ओरल हेल्थच्या (Oral Health) समस्या कमी करण्यासाठी ओरल हेल्थकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. ओरल हेल्थची काळजी घेताना केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सपेक्षा घरगुती उपाय हेच उत्तम ठरतात(Simple homemade ayurvedic powder for teeth whitening).

दातांसाठी टूथपेस्टऐवजी काही घरगुती पदार्थांपासून आपण औषधी असे दंतमंजन घरच्याघरीच तयार करु शकतो. आजीबाईच्या बटव्यातील कडुलिंबाच्या पानांची पावडर, लवंग पावडर, सैंधव मीठ, हळद, बेकिंग सोडा यांचा वापर करून सहज घरगुती दंतमंजन पावडर तयार करता येते. ही पावडर केवळ दातांची स्वच्छता राखत नाही, तर हिरड्यांची मजबुती, तोंडातील दुर्गंधी दूर करणं, आणि दातदुखीपासून आराम मिळवणं यासारखे अनेक फायदे देते. ही घरगुती व नैसर्गिक दंतमंजन पावडर कशी तयार करायची ते पाहूयात.       

साहित्य :- 

१. कडुलिंबाच्या पानांची पावडर - ५० ग्रॅम 
२. लवंग पावडर - २५ ग्रॅम 
३. हळद - २५ ग्रॅम
४. सैंधव मीठ - २५ ग्रॅम 
५. बेकिंग सोडा - २५ ग्रॅम   

कृती :- 

दातांसाठी घरच्याघरीच दंतमंजन तयार करण्यासाठी, एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात कडुलिंबाच्या पानांची पावडर, लवंग पावडर, हळद, सैंधव मीठ, बेकिंग सोडा असे सगळे जिन्नस एकत्रित घ्यावेत. आता हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये एकत्रित वाटून घ्यावेत आणि त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी. हे तयार दंतमंजन एका काचेच्या एअर टाईट कंटेनरमध्ये काढून स्टोअर करून ठेवावे. 

काळवंडलेले ओठ होतील गुलाबी सुंदर! करून पाहा घरगुती लीप मास्कची जादू - सोपा घरगुती उपाय...

याचा वापर कसा करावा ? 

दररोज सकाळी दात घासण्यासाठी टूथपेस्ट वापरण्याऐवजी आपण या घरगुती दंतमंजनाचा वापर करु शकतो. यासाठी, चमचाभर दंतमंजन हातावर घेऊन ते बोटांच्या किंवा ब्रशच्या मदतीने दातांवर लावावे. बोटांच्या मदतीने दात आणि हिरड्यांवर हे दंतमंजन लावून ३ ते ५ मिनिटे चोळून मसाज करून घ्यावा. त्यानंतर ५ ते १० मिनिटांनी चूळ भरून तोंड स्वच्छ धुवून घ्यावे. 

स्तनांचा आकार वाढवण्यासाठी घरच्याघरी उपाय करताय? ५ टिप्स- सुडौल बेस्ट साईजसाठी फायद्याचे...

या दंतमंजनाच्या वापरामुळे होणारे फायदे... 

घरगुती दंतमंजनामध्ये असलेले नैसर्गिक घटक दातांवरील पिवळसरपणा कमी करुन दात अधिक स्वच्छ व चमकदार करण्यास मदत करतात. दातांतील वेदना व दातांच्या मुळांतील सूज कमी होते. यातील औषधी घटकांमुळे हिरड्यांची सूज, रक्तस्राव आणि इतर त्रास देखील कमी होतो. घरगुती दंतमंजन वापरल्याने दातांवर नैसर्गिक चमक येते आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्समुळे होणारे नुकसान अगदी सहज टाळता येते. थोडक्यात, दात व हिरड्यांच्या अनेक समस्यांवर घरगुती दंतमंजन हा सुरक्षित, किफायतशीर व उत्तम पर्याय ठरतो.

Web Title: Teeth Whitening with Homemade Herbal Tooth Powder Herbal Tooth Powder Nature Secret For Oral Health Make Your Own Natural, Whitening Tooth Powder Simple homemade ayurvedic powder for teeth whitening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.