Join us

दातांच्या पिवळेपणामुळे हसताना संकोच वाटतो? दात दिसतील स्वच्छ आणि चवदार, फक्त ६ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2025 12:25 IST

Teeth whitening peel: Best teeth whitening peel: How to use teeth whitening peel: Whitening peel for teeth: Natural teeth whitening peel: Teeth whitening home remedies: Natural teeth whitening remedies: Best home remedies for teeth whitening: Whitening teeth naturally at home: How to whiten teeth at home: Teeth whitening tips home remedies: घरगुती पदार्थ वापरल्याने दातांवरील पिवळसरपणा कमी होईल तसेच दात मोत्यासारखे चमकण्यास मदत होईल.

आ... आई ग.. माझा दात दुखतोय... कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा थंड पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याही दातात झिणझिणत्या येतात किंवा दात दुखू लागतो. (Teeth whitening peel) दिवसभर जंक फूड खाल्ल्याने आपले दात पिवळे किंवा काळपट दिसू लागतात. बरेचदा हसताना किंवा बोलताना आपली गल्लतच होते. सगळेजण आपल्याकडे पाहायचं सोडून आपल्या दातांकडे पाहात राहात. (Best home remedies for teeth whitening) दातांवर पिवळा थर किंवा काळे डाग दिसू लागले की, आपल्याला नेमकं काय करावं सुचत नाही. दात दुखणे, काळे पडणे, हिरड्या सुजणे, दातांवर पिवळा थर जमा होणे, तोंडाची दुर्गंधी येणे ही सध्या सामान्य समस्या झाली आहे. (Whitening teeth naturally at home) अनेकदा महागडे टूथपेस्ट लावूनही दातांचा पिवळेपणा जात नाही. परंतु, यावर काही घरगुती उपाय केल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो. घरातील काही पदार्थ वापरल्याने दातांवरील पिवळसरपणा कमी होईल तसेच दात मोत्यासारखे चमकण्यास मदत होईल. 

५ चुकीच्या सवयी, आरोग्यासाठी घातक! भरभर वाढतं ब्लड प्रेशर- हृदयविकाराचा धोकाही

ही फळे खा 

दातांवरील पिवळसरपणा घालवण्यासाठी आपण सफरचंदाचा वापर करु शकतो. यामध्ये नैसर्गिक आम्लयुक्त घटक असतात. यामुळे तोंडातील लाळेचे उत्पादन वाढते. ही लाळ आम्ल निष्क्रिय करण्यास मदत करते. जर आपल्या दातांवर पिवळसरपणा आला असेल तर रोज एक तरी सफरचंद खायला हवा. आपल्या आहारात आपण काजू-बदाम, अननस, लिंबूवर्गीय फळे, गाजर आणि स्ट्ऱॉबेरी सारखी फळे खायला हवी. ज्यामुळे दातांवरील घाण, दातांचे कमकुवत होणे किंवा दातांना किड लागणे यांसारख्या समस्यांपासून आराम मिळेल. 

दात चमकवण्यासाठी उपाय 

1. बेकिंग सोडा आणि लिंबाची पेस्ट एकत्र करुन हळुवारपणे ब्रश करा. असे आठवड्यातून १ ते २ वेळा केल्यास आपले दात चमकण्यास मदत होईल. 

2. स्ट्रॉबेरी मॅश करुन त्यात थोडे मीठ घाला आणि दातांवर घासा. यामुळे तुमचे दात चमकण्यास मदत होईल. दातातील पिवळसरपणा कमी करण्यासाठी दिवसातून दोनदा सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा. फ्लेराईड असलेले टूथपेस्ट वापरा. 

3. फ्लॉसिंगमुळे आपल्या दातांमधील प्लेक आणि पिवळेपणा कमी होण्यास मदत होते. तसेच दातात असलेले बॅक्टेरिया कमी करण्यासाठी माउथवॉशचा वापर करा. यामुळे दातांमध्ये फरक दिसेल. 

4. गोडाचे पदार्थ, थंड पेय आणि सॉसमुळे दातांवर चिकटपणाचा थर तयार होतो. यामुळे दात पिवळे होतात. तसेच दात काळे पडणे, दात दुखणे या समस्या सुरु होतात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स