Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येते? डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय, दातांच्या समस्या होतील कमी

ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येते? डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय, दातांच्या समस्या होतील कमी

Causes of tooth cavity: Why do gums bleed when brushing: Tooth decay causes: ब्रश करताना अचानक हिरड्यांमधून रक्त का येते? अशावेळी काय करायला हवे? डॉक्टरांकडे कधी जावे? जाणून घेऊया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2025 09:05 IST2025-05-30T09:00:00+5:302025-05-30T09:05:02+5:30

Causes of tooth cavity: Why do gums bleed when brushing: Tooth decay causes: ब्रश करताना अचानक हिरड्यांमधून रक्त का येते? अशावेळी काय करायला हवे? डॉक्टरांकडे कधी जावे? जाणून घेऊया.

teeth cavity issue bleeding gums while brushing teeth causes and preventaion simple teehth cleaning tips | ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येते? डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय, दातांच्या समस्या होतील कमी

ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येते? डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय, दातांच्या समस्या होतील कमी

आपण नेहमीच सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दोन वेळा ब्रश करतो.(Causes of tooth cavity) दातांमध्ये घाण साचू नये, दातांना किड लागू नये किंवा हिरड्या मजबूत ठेवण्यासाठी आपण दातांची काळजी घेतो. (Why do gums bleed when brushing)अनेकदा ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येते. हा त्रास लहान मुलांनाच नाही तर कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. (Tooth decay causes)
ब्रश करताना हिरड्या दुखू लागतात. त्यातून रक्तस्त्राव सुरु होतो. कधीकधी हे रक्त कमी असते तर कधी जास्त प्रमाणात.(Gum disease symptoms) पण ब्रश करताना अचानक हिरड्यांमधून रक्त का येते? अशावेळी काय करायला हवे? डॉक्टरांकडे कधी जावे? जाणून घेऊया. (How to prevent cavities)

PCOS मुळे महिलांना होतात गंभीर आजार, रिसर्चचा धक्कादायक खुलासा-स्वत:ची तब्येत आधी सांभाळा

दातांच्या डॉक्टर चेतना जोशींनी सांगितले की, हिरड्या खूप नाजूक असतात. जर आपण वापरत असलेला ब्रश योग्य असेल किंवा जोरजोरात दातांवर घासला नाही तर हिरड्यांमधून रक्त येणार नाही. जर दात आणि हिरड्यांमध्ये खूप घाण साचली असेल तर रक्तस्त्राव सुरु होतो. हिरड्या सुजल्या असतील किंवा दात सैल झाले असतील तर रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. तंबाखू खाल्ल्याने आणि दातांवर किंवा हिरड्यांना घासल्याने दात आणि हिरड्या कमकुवत होतात. यामुळे पायोरिया आणि ब्रश करताना तोंडातून रक्त येण्याची समस्या वाढते. तसेच गर्भधारणेसारख्या हार्मोनल बदलांदरम्यान देखील हिरड्यांमधून रक्त येऊ शते. मधुमेहाच्या रुग्णांना हिरड्यांमधून रक्त येणे किंवा पायरिया सारख्या समस्या देखील असू शकतात. 

डॉक्टरांना कधी भेटावे? 

आपण काही कडक किंवा सफरचंद, नाशपतीसारखी फळे खाल्ल्यावर दातांमधून रक्त येऊ लागते. दात अचानक हलतात,  हिरड्यांमध्ये काही तरी अडकल्यासारखे वाटणे अशावेळी टूथपिकचा वापर करतो. हिरड्या सुजलेल्या किंवा लाल झाल्या असतील तर... यांसारख्या अनेक समस्या जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांना भेटा. 

शुद्ध तुपाचं घरगुती काजळ, डोळे दिसतील सुंदर आणि केमिकल असलेले धोकादायक काजळ वापरणं बंद

दात घासताना काळजी घ्या 

हिरड्यांमध्ये पायोरिया झाला असेल किंवा ब्रश करताना रक्त येत असेल तर मऊ किंवा अल्ट्रा सॉफ्ट ब्रश वापरा. जर तुमचे दात किंवा हिरड्या निरोगी आणि स्वच्छ असतील तर मध्यम आकाराच्या ब्रशचा वापर करु शकता. ब्रशचा स्पर्श मऊ वाटत असेल, तर तो मऊ ब्रिस्टल्स असलेला ब्रश आहे. जर ब्रशचा स्पर्श कठीण वाटत असेल, तर तो कडक ब्रिस्टल्स असलेला ब्रश आहे. दातांसाठी कोणता ब्रश निवडायला हवा हे देखील आपण डॉक्टरांना विचारू शकतो.  

Web Title: teeth cavity issue bleeding gums while brushing teeth causes and preventaion simple teehth cleaning tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.