वाढत्या वयानुसार किंवा व्यायामाच्या अभावामुळे सध्या सांधेदुखी आणि गुडघेदुखीच्या समस्या घरोघरी पाहायला मिळत आहे. अनेकांना सकाळी उठल्यानंतर सांध्यांमध्ये जडपणा जाणवणे, गुडघ्यांमधून कटकट आवाज येमे किंवा स्नायूंना सूज येणे अशा त्रासांचा सामना करावा लागतो.(Gudghe dukhnyavar ayurvedic aushadh) या वेदना कमी करण्यासाठी आपण अनेकदा पेनकिलर्स घेतो, पण याचे परिणाम हे तात्पुरता असतात. पण यावर काही घरगुती किंवा आयुर्वेदिक उपाय केल्यास फायदा होईल. (Sandhe dukhi ani suja kami karnyache upay) केरळमधील चिंचादी लवण स्वेदम ही आयुर्वेदिक उपचार पद्धत वरदान ठरु शकते. केरळमधल्या पारंपरिक वैद्यांकडून पिढ्यानुपिढ्या वापरली जाणारी पोटली मसाज थेरपी.(Ayurvedic potli massage kasa karaycha) यामध्ये काही नैसर्गिक घटक वापरुन त्याचा शेक दिला जातो. ज्यामुळे दुखण्यापासून आपल्याला आराम मिळतो. घरच्या घरी ही आयुर्वेदिक पोटली कशी बनवायची पाहूया.
दिसायला फ्रेश पण चवीला कडू? काकडी खरेदी करताना ४ गोष्टी पाहा; निवडा गोड चवीची काकडी
पोटली बनवण्यासाठी लागणारे साहित्य
चिंच (बिया नसलेली)- ५०० ग्रॅम सैंधव मीठ - २५० ग्रॅम लिंबू - २ ते ३ बारीक तुकडे लसूण - १८ ते २० पाकळ्या हळद पावडर - २ मोठे चमचे सुती कापड - पोटली बांधण्यासाठी
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला पॅनमध्ये चिंच, सैंधव मीठ, लिंबाचे तुकडे, लसूण आणि हळद एकत्र करा.
2. हे सर्व मिश्रण मंद आचेवर गरम करा. या मिश्रणाचा छान सुगंध येऊ लागेल. आणि ते व्यवस्थित गरम होईल, तेव्हा गॅस बंद करा.
3. या मिश्रणाचे समान चार भाग करा आणि सुती कापडाच्या तुकड्यांमध्ये ठेवून त्यांच्या घट्ट गाठी बांधा. हर्बल पोटली तयार होईल.
उपचार पद्धती
या थेरपीमध्ये एकाच वेळी दोन पोटली वापरल्या जातात. दोन पोटली तव्यावर किंवा कढईत गरम करण्यासाठी ठेवा. त्या गरम झाल्या की वेदना होत असलेल्या भागावर ३० ते ४० सेकंद हलक्या हाताने दाबत शेक द्या. या पोटली थंड होऊ लागल्या की त्या जागी दुसऱ्या दोन गरम पोटली वापरा. अशा प्रकारे सतत उष्णता मिळेल याची काळजी घ्या. ही प्रक्रिया साधारण २० ते ३० मिनिटे सुरू ठेवावी. या पोटली शेकमुळे त्या भागातील रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे हालचाल करणे सोपे होते.
Web Summary : Soothe knee pain and joint stiffness with a homemade Ayurvedic potli massage. This traditional therapy uses a heated poultice of tamarind, salt, lemon, garlic, and turmeric to reduce inflammation and improve blood flow for easier movement.
Web Summary : घर पर आयुर्वेदिक पोटली मसाज से घुटने के दर्द और जोड़ों के अकड़न को शांत करें। इस पारंपरिक चिकित्सा में इमली, नमक, नींबू, लहसुन और हल्दी के गर्म पुल्टिस का उपयोग करके सूजन को कम किया जाता है और आसान गति के लिए रक्त प्रवाह में सुधार होता है।