एरंडेल तेल म्हणजेच कॅस्टर ऑइल हे आपल्या घरगुती उपचारांमध्ये पूर्वीपासून वापरले जाणारे एक प्रभावी तेल आहे. विशेषतः पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता, जडपणा, गॅस यांसारख्या तक्रारींवर एरंडेल तेल उपयोगी ठरते. मात्र तेल पिणे हा विचार आला की अनेकांना त्याची चव, वास या विचारानेच पोटात ढवळते. (Take castor oil this way, it won't taste bitter! Grandma's traditional remedy will keep your digestion strong)एरंडेल तेल फार चिकट असते आणि त्याची चवही विचित्र असते. योग्य पद्धतीने आहारात घेतले तर एरंडेल तेलाची चवही त्रासदायक लागत नाही आणि पोटही नैसर्गिकरीत्या साफ होते. मात्र हे तेल रात्री झोपतानाच घ्या आणि त्यानंतर पुढचा दिवस घरीच थांबा. पोट साफ व्हायला मध्यरात्रीच सुरवात होते.
एरंडेल तेलात रिसिनोलेइक अॅसिड हा घटक असतो, जे आतड्यांच्या हालचाली सक्रिय करते. त्यामुळे मल मऊ होतो आणि पोट सहज साफ होते. हे कोणतेही रासायनिक जुलाब नसून नैसर्गिक असल्यामुळे योग्य प्रमाणात घेतल्यास शरीराला अपाय करत नाही. मात्र पद्धत चुकीची असेल तर उलट त्रास होऊ शकतो, म्हणून योग्य रीतीने सेवन करणे महत्त्वाचे आहे. एरंडेल तेल थेट चमच्याने घेणे टाळावे, कारण त्यामुळे त्याची तीव्र चव आणि वास जाणवतो. च्याची चव झेपली नाही तर उलटी होते. त्याऐवजी कोमट दुधासोबत एरंडेल तेल घेणे ही सर्वात सोपी आणि परिणामकारक पद्धत आहे. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा कप कोमट दूध घ्यावे आणि त्यात एक छोटा चमचा एरंडेल तेल मिसळावे. दूध तेलाची चव आणि वास दडपून टाकते, त्यामुळे ते सहज पचते आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत होते.
ज्यांना दूध चालत नाही, त्यांनी कोमट पाण्यासोबत एरंडेल तेल घ्या. पाण्यात थोडा गूळ किंवा मध मिसळल्यास चव अजून सौम्य होते. काही लोक लिंबाचा रस घालूनही ते घेतात, त्यामुळे मळमळ जाणवत नाही. ही पद्धत विशेषतः सतत बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरते.
आहारात एरंडेल तेल घेण्याची आणखी एक चांगली पद्धत म्हणजे चपातीच्या पिठात अगदी कमी प्रमाणात वापरणे. रोज नाही, पण आठवड्यातून एखाद्या दिवशी अर्धा चमचा एरंडेल तेल पिठात घातल्यास पचनसंस्था सौम्यपणे सक्रिय होते. अशा प्रकारे घेतल्यास तेलाची वेगळी चव जाणवत नाही आणि शरीरावर त्याचा परिणाम हळूवारपणे होतो.
एरंडेल तेल घेताना प्रमाण खूप महत्त्वाचे असते. जास्त प्रमाणात घेतल्यास पोटात कळ येणे, अतिसार किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे लहान मुलांनी, गरोदर महिलांनी आणि पचनसंस्थेचे आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय एरंडेल तेल घेऊ नये. प्रौढ व्यक्तींनीही सलग अनेक दिवस हे तेल घेणे टाळावे. तज्ज्ञांच्या सल्यानेच घ्या. तेल घशाशी येत असेल तर लवंग खा. म्हणजे त्याची चव जाणवत नाही. तसेच दात घासणेही फायद्याचे ठरते. त्यामुळे तोंडात तेलाचे कण राहत नाहीत.
