Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ताहिरा कश्यपसारखं एकदा बरा झाल्यानंतरही पुन्हा कॅन्सर का होतो? बघा कारणं आणि उपाय

ताहिरा कश्यपसारखं एकदा बरा झाल्यानंतरही पुन्हा कॅन्सर का होतो? बघा कारणं आणि उपाय

Why Some Cancers Come Back?: अभिनेता आयुषमान खुराणा याची पत्नी तसेच निर्माती, लेखिका ताहिरा कश्यप हिला ७ वर्षांनंतर पुन्हा एकदा कॅन्सर झाला आणि ही बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.. असं होण्यामागे नेमकं काय कारण असतं?(Tahira Kashyap faces cancer again)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2025 18:13 IST2025-04-10T18:13:00+5:302025-04-10T18:13:56+5:30

Why Some Cancers Come Back?: अभिनेता आयुषमान खुराणा याची पत्नी तसेच निर्माती, लेखिका ताहिरा कश्यप हिला ७ वर्षांनंतर पुन्हा एकदा कॅन्सर झाला आणि ही बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.. असं होण्यामागे नेमकं काय कारण असतं?(Tahira Kashyap faces cancer again)

tahira kashyap faces cancer again, why the cancer returns and how to prevent it, Why some cancers come back  | ताहिरा कश्यपसारखं एकदा बरा झाल्यानंतरही पुन्हा कॅन्सर का होतो? बघा कारणं आणि उपाय

ताहिरा कश्यपसारखं एकदा बरा झाल्यानंतरही पुन्हा कॅन्सर का होतो? बघा कारणं आणि उपाय

Highlightsआजारातून बरं झाल्यानंतरही नियमितपणे चाचण्या करत राहाव्या.. पहिल्या दोन वर्षांत दर ३ महिन्यांनी फॉलोअप घ्यायला विसरू नये. 

कॅन्सर हा असा एक आजार आहे ज्याची भीती अजूनही सर्वसामान्यांच्या मनात आहे. आपण आपल्या आजुबाजुला आता असे अनेक लोक पाहातो ज्यांना कॅन्सर झाला होता. पण ते योग्य ते उपचार घेऊन त्यातून पुर्णपणे बरे झालेले आहेत. आणि आता सगळ्यांसारखंच नॉर्मल आयुष्य जगत आहेत. ताहिरा कश्यपही तशीच.. २०१८ मध्ये तिला झीरो स्टेज ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. त्यातुन ती पुर्णपणे बाहेरही पडली. पण आता पुन्हा एकदा तिला कॅन्सर झाला असल्याचं निदर्शनास आलं आहे (Tahira Kashyap faces cancer again). यामुळे खरंतर तिच्याप्रमाणेच तिचे कित्येक चाहतेही हादरून गेले आहेत. एकदा बरं होऊन कॅन्सरमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा तो का होतो, काय आहेत त्यामागची कारणं, कोणाला याचा जास्त धोका असतो असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत.. बघा त्याविषयीच तज्ज्ञांनी दिलेली खास माहिती...(Why Some Cancers Come Back?)

 

एकदा बरा झाल्यानंतर पुन्हा कॅन्सर का होतो?

कॅन्सर पुन्हा का होतो याविषयी डॉ. वैशाली जामरे यांनी दिलेली माहिती जागरण डॉट कॉमने प्रकाशित केली आहे.

कॅफेस्टाईल कोल्ड कॉफीची झकास रेसिपी!! विकतची महागडी कॉफी पिण्याची गरजच वाटणार नाही.. 

यामध्ये डाॅक्टरांनी असं सांगितलं आहे की तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा कॅन्सर झाला होता तेव्हा तो कोणत्या स्टेजमध्ये होता, त्याचा ग्रेड कोणता होता, उपचारांदरम्यान रुग्णांकडून कसा प्रतिसाद होता, रुग्णांची सहनशीलता या सगळ्या गोष्टी कॅन्सर पुन्हा होण्यासाठी कारणीभूत असतात. इसोफेगस, पेंक्रियाज, पित्ताशय हे कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका जास्त असतो. 

 

ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात सांगायचं झाल्यास जे ब्रेस्ट कॅन्सर ट्रिपल निगेटीव्ह किंवा एचईआर २ पॉझिटीव्ह या प्रकारचे असतात अशा रुग्णांना ते पुन्हा होण्याची शक्यता असते. यापैकी हार्मोन रिसेप्टर पॉझिटीव्ह ब्रेस्ट कॅन्सर बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा होऊ शकतात.

तक्कू, लोणचं असे तेच ते पदार्थ सोडा- कैरीच्या या एकदम वेगळ्या ५ रेसिपी ट्राय करा...

तसेच हा कॅन्सर हाडांमध्ये आढळून येतो.  कॅन्सरचं निदान जेवढं लवकर होईल तेवढा त्याचा पुन्हा होण्याचा धोका कमी असतो. तसेच निदान झाल्यानंतर वेळेत योग्य उपचार मिळणंही गरजेचं असतं. याशिवाय आजारातून बरं झाल्यानंतरही नियमितपणे चाचण्या करत राहाव्या.. पहिल्या दोन वर्षांत दर ३ महिन्यांनी फॉलोअप घ्यायला विसरू नये. 
 

Web Title: tahira kashyap faces cancer again, why the cancer returns and how to prevent it, Why some cancers come back 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.