निरोगी शरीरासाठी व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळणं खूप गरजेचं आहे. पण भारतात बहुतांश लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता दिसून येते. त्यातही महिलांचे प्रमाण खूप जास्त आहे. शरीरातलं व्हिटॅमिन डी कमी झालं की हाडांचं दुखणं वाढू लागतं. थकवा, अशक्तपणा जाणवतो. मूड स्विंग्सचाही त्रास होतो. ही काही लक्षणं अगदी सामान्य असून ती बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहेत. पण व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे इतरही काही त्रास होतात जे बहुतांश लोकांना माहितीच नाहीत. त्यामुळे आपल्याला होणारा हा त्रास व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचं एक लक्षण आहे, हे समजतच नाही (how to get rid of vitamin D deficiency?). असे नेमके कोणते त्रास आहेत ते पाहा (symptoms of vitamin D deficiency) आणि तुम्हालाही तशा शारिरीक तक्रारी जाणवत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.(home hacks to improve vitamin D level in body)
व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणं
१. पाठ, कंबर आणि गुडघे वारंवार दुखत असतील तर व्हिटॅमिन डी तपासून घ्या.
२. याशिवाय स्नायूंमध्ये त्रास होणं, स्नायू आखडल्यासारखं होणं हे देखील व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचं एक लक्षण आहे.
३. वारंवार सर्दी, खोकल्याचा त्रास होणे. कोणतीही ॲलर्जी खूप लवकर होणे.
४. चिडचिडेपणा वाढणे, उदास वाटून नैराश्य येणे.
५. केस गळण्याचं प्रमाण खूप वाढणे.
६. रात्री शांत झोप न येणे. अस्वस्थता वाढणे, बराच वेळ झोप न येणे.
व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढावी?
व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी लवकरात लवकर डाॅक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स सुरू करणे खूप गरजेचे आहे.
फक्त १ चमचा चहा पावडरची कमाल! केस खूप पटापट वाढतील- काही दिवसांतच दाट, लांब होतील
याशिवाय सकाळी ७ ते ९ यावेळेत कमीतकमी १५ ते २० मिनिटांसाठी सुर्यप्रकाशात जाणे, दूध, दही, पनीर, मशरूम, फोर्टीफाईड डेअर प्रोडक्ट्स पुरेशा प्रमाणात खाणे हे उपायही तुम्ही करू शकता.
