Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > घामाची दुर्गंधी इतकी की लोक नाकाला रुमाल लावतात? ५ घरगुती उपाय, दुर्गंधी आणि खाज गायब

घामाची दुर्गंधी इतकी की लोक नाकाला रुमाल लावतात? ५ घरगुती उपाय, दुर्गंधी आणि खाज गायब

Sweat smells so bad? 5 home remedies to get rid of bad smell and itching : घामाचा वास आणि घामामुळे येणारी खाज कमी करण्यासाठी उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2025 14:02 IST2025-09-10T14:01:01+5:302025-09-10T14:02:06+5:30

Sweat smells so bad? 5 home remedies to get rid of bad smell and itching : घामाचा वास आणि घामामुळे येणारी खाज कमी करण्यासाठी उपाय.

Sweat smells so bad? 5 home remedies to get rid of bad smell and itching | घामाची दुर्गंधी इतकी की लोक नाकाला रुमाल लावतात? ५ घरगुती उपाय, दुर्गंधी आणि खाज गायब

घामाची दुर्गंधी इतकी की लोक नाकाला रुमाल लावतात? ५ घरगुती उपाय, दुर्गंधी आणि खाज गायब

घाम येणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु अनेकदा घामाला दुर्गंधी येते किंवा घामामुळे खाज सुटते. साधारणपणे घामाला वास नसतो, पण त्वचेवर असलेल्या जीवाणूंशी तो मिसळला की तीव्र दुर्गंधी निर्माण होते. (Sweat smells so bad? 5 home remedies to get rid of bad smell and itching)यामागे आहार, स्वच्छतेची कमतरता, ताणतणाव, हार्मोन्सचे बदल आणि काही वेळा औषधांचे दुष्परिणामही कारणीभूत असतात. मसालेदार, जास्त तेलकट किंवा कांदा-लसूणयुक्त आहार घेतल्यावरही घामाला वास येण्याची शक्यता वाढते. वारंवार घाम येऊन त्वचा ओली राहत असल्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होऊन खाज येते.

१. बेकिंग सोडा आणि लिंबाचा लेप
अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि थोडा लिंबाचा रस मिसळून लेप तयार करा. हा लेप काखेत लावल्यास जीवाणू कमी होतात, वास नाहीसा होतो. पण लिंबामुळे कधीकधी जळजळ होऊ शकते, त्यामुळे खूप वेळ लावून ठेवू नका. त्वचा फारच संवेदनशील असेल तर लिंबू वापरु नका. 

२. कडूलिंब पावडर
कडूलिंब बॅक्टेरिया कमी करण्यात अगदी फायद्याचे असते. त्यामुळे कडूलिंबाची पाने सुकवून त्याची पूड तयार करा. त्यात पूडमध्ये थोडे पाणी घालून लेप तयार करा आणि तो काखेत लावा. नक्कीच फायदा होईल. मात्र आठवड्यातून किमान दोनदा तरी लेप लावा. 

३) चंदन पावडर आणि हळद
चंदन पावडरमध्ये थोडी हळद आणि थंड दूध घालून लेप तयार करा. हा लेप सुगंधी असून थंडावा देतो आणि घामाचा वास बराच आटोक्यात आणतो.

४) खोबरेल तेल 
थोड्या खोबरेल तेलाने रोज शरीराच्या घाम जास्त येणार्‍या ठिकाणी मसाज करणे फार फायद्याचे ठरते. तेलामुळे त्वचा मऊ होते आणि काही त्वचेचे रोग किंवा त्रास असतील तर ते कमी होतात.  

५) तुळशीचा लेप
तुळस सर्वगुण संपन्न अशी गोष्ट आहे. अनेक त्रासांवर अगदी मस्त उपाय आहे. तुळशीचा लेप तयार करुन काखेत लावा आणि इतरही अवयवांना लावा. त्यामुळे जावाणू निघून जातील तसेच त्वचेला पोषण मिळेल आणि वासही येणार नाही.  

६) कोरफड आणि टी ट्री ऑइल
कोरफड घ्या आणि त्यात दोन थेंब टी ट्री ऑइल मिसळा. हा लेप लावल्यास बॅक्टेरिया वाढत नाहीत, त्वचा मऊ राहते आणि खाज पटकन थांबते. टी ट्री तेल मिळाले नाही तर फक्त कोरफडही लावणे फायद्याचेच ठरेल. 

Web Title: Sweat smells so bad? 5 home remedies to get rid of bad smell and itching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.