Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थंडगार उसाचा रस की स्लो पॉयझन? 'या' ५ समस्या असतील तर स्त्रियांनी उसाचा रस पिणं फार धोक्याचं...

थंडगार उसाचा रस की स्लो पॉयझन? 'या' ५ समस्या असतील तर स्त्रियांनी उसाचा रस पिणं फार धोक्याचं...

sugarcane juice side effects for women : sugarcane juice disadvantages for females : who should not drink sugarcane juice : शरीराला थंडावा देणारा उसाचा रस तुमच्यासाठी 'स्लो पॉयझन' तर ठरत नाहीये ना? पाहा कुणी पिऊ नये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2026 18:59 IST2026-03-26T15:53:27+5:302026-03-26T18:59:01+5:30

sugarcane juice side effects for women : sugarcane juice disadvantages for females : who should not drink sugarcane juice : शरीराला थंडावा देणारा उसाचा रस तुमच्यासाठी 'स्लो पॉयझन' तर ठरत नाहीये ना? पाहा कुणी पिऊ नये...

sugarcane juice side effects for women sugarcane juice disadvantages for females who should not drink sugarcane juice | थंडगार उसाचा रस की स्लो पॉयझन? 'या' ५ समस्या असतील तर स्त्रियांनी उसाचा रस पिणं फार धोक्याचं...

थंडगार उसाचा रस की स्लो पॉयझन? 'या' ५ समस्या असतील तर स्त्रियांनी उसाचा रस पिणं फार धोक्याचं...

रखरखत्या उन्हाळयात घशाला कोरड पडली की, डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे - 'थंडगार उसाचा रस'...उन्हाळ्याच्या दिवसात घामामुळे हैराण झाल्यावर 'उसाचा रस' हे अगदी सगळ्यांनाच सर्वात जास्त (who should not drink sugarcane juice) आवडणारे आणि शरीराला थंडावा देणारे पेय आहे. हे नैसर्गिक पेय प्यायल्याने शरीराला झटपट ऊर्जा आणि ताजेतवाने वाटते. पण हा उसाचा रस प्रत्येकासाठीच फायदेशीर असतो असे नाही...आपल्यापैकी अनेकजणी उसाचा रस 'नॅचरल आणि हेल्दी' समजून विचार न करता तो पितात. परंतु उसाचा रस अतिप्रमाणात प्यायल्याने किंवा चुकीच्या वेळी तो पिणे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते(sugarcane juice side effects for women).

विशेषतः काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या महिलांसाठी (sugarcane juice disadvantages for females) उसाचा रस पिणं आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरु शकत. मग उन्हाळ्यात उसाचा रस पिणं नक्की कोणी टाळावं ? शरीराला थंडावा देणारं हे पेय तुमच्यासाठी 'स्लो पॉयझन' तर ठरत नाहीये ना? या सगळ्याविषयी गुडगाव येथील (गेट फिट विथ लीमा) प्रसिद्ध वेट लॉस आणि हार्मोनल हेल्थ एक्सपर्ट लीमा महाजन यांनी इंस्ट्राग्रामवर व्हिडिओ शेअर करत अधिक माहिती दिली आहे. 

उसाचा रस पिणं कुणी टाळावं ? 

१. डायबिटीस (Diabetes) :- जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल, तर उसाचा रस पिणे पूर्णपणे टाळायला हवे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तो मुळीच पिऊ नये. कारण एका ग्लास उसाच्या रसात साधारणपणे ४० ते ५० ग्रॅम साखर असते. याशिवाय, उसाच्या रसाचा 'ग्लायसेमिक लोड' (Glycemic Load) अतिशय जास्त (२० ते २५) असतो. याचा अर्थ असा की, हा रस प्यायल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) अतिशय वेगाने वाढू शकते, जी डायबिटीस असणाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

तूप फक्त चवीसाठी नाही, तर स्त्रियांच्या 'या' ६ समस्यांवर गुणकारी! चमचाभर तूप 'असं' खाणं ठरेल अमृत... 
 

२. वजन वाढणे किंवा लठ्ठपणा (Weight Loss) :- जर तुम्ही वाढत्या वजनामुळे हैराण असाल आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर उसाचा रस पिणे टाळले पाहिजे. एक ग्लास उसाच्या रसात साधारणपणे १५० ते १८० कॅलरीज असतात. हा रस म्हणजे 'लिक्विड शुगर' असल्याने तो प्यायल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटत नाही. परिणामी, तुम्हाला पुन्हा पुन्हा भूक लागते आणि तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते.

डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसाला किती पावलं चाललंच पाहिजे? डॉक्टर सांगतात परफेक्ट फॉर्म्युला...

३. फॅटी लिव्हर (Fatty Liver) :- उसाच्या रसात असलेले सुक्रोज (Sucrose) शरीरात गेल्यावर त्याचे ग्लुकोज आणि फ्रक्टोजमध्ये रूपांतर होते. जेव्हा आपण जास्त प्रमाणात फ्रक्टोज घेतो, तेव्हा ते लिव्हरमध्ये (यकृत) चरबीच्या रूपात जमा होऊ लागते. यामुळे फॅटी लिव्हरची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. म्हणूनच, ज्या महिलांना आधीच फॅटी लिव्हरचा त्रास आहे, त्यांनी नियमितपणे उसाचा रस पिणे टाळले पाहिजे.

४. किडनीशी संबंधित समस्या (Kidney Problems) :- जर आपल्याला किडनीशी संबंधित काही समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उसाचा रस मुळीच पिऊ नये. याचे मुख्य कारण म्हणजे एका ग्लास उसाच्या रसात साधारणपणे २५० ते ३०० मिलीग्रॅम (mg) पोटॅशियम असते. जेव्हा किडनी नीट कार्य करत नसते, तेव्हा हे पोटॅशियम शरीराबाहेर फेकले न जाता रक्तात जमा होऊ लागते. शरीरातील पोटॅशियमची ही वाढलेली पातळी तुमच्या हृदयाच्या कार्यावर आणि स्नायूंवर गंभीर परिणाम करू शकते. त्यामुळे किडनीचा त्रास असलेल्यांनी उसाचा रस पिणं शक्यतो टाळावं. 

पोटाची ढेरी गायब, सिक्स पॅक ॲब्सही मिळतील, रोज करा १० मिनिटांचा १ उपाय ...

५. इरिटेबल बॉवल सिंड्रोम (IBS - पचनसंस्थेचा विकार) :- IBS हा पचनसंस्थेशी संबंधित एक अतिशय त्रासदायक आजार आहे. ज्या महिलांना हा त्रास आहे, त्यांच्यासाठी उसाचा रस पिणे अडचणीचे ठरू शकते. यामध्ये प्रामुख्याने पोटदुखी, पोटात पेटके येणे, पोट फुगणे, गॅस आणि वारंवार होणारे जुलाब किंवा बद्धकोष्ठता (किंवा दोन्ही) यांसारखी लक्षणे जाणवतात. उसाच्या रसात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे आतड्यांमध्ये 'ऑस्मोटिक इफेक्ट' (Osmotic Effect) निर्माण होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, ही साखर आतड्यांतील पाणी खेचून घेते, ज्यामुळे अचानक पोट फुगणे, गॅस होणे किंवा जुलाब लागण्याची भीती असते. ज्यांचे पोट वारंवार बिघडते किंवा जे 'सेन्सेटिव्ह स्टमक' चा त्रास आहे त्यांनी उसाचा रस पिणं टाळलेलेच बरे.

उसाचा रस आरोग्यासाठी चांगला असला, तरी तो पिताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाच्या शरीराला उसाचा रस पिणं मानवेलच असे नाही... तुमच्या शरीराची गरज आणि मर्यादा ओळखूनच मग उसाचा रस प्यावा. तुम्ही किती प्रमाणात रस पिता आणि तुमची सध्याची आरोग्य स्थिती काय आहे, या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी उसाचा रस कधीतरी आणि मर्यादित प्रमाणात (उदा. अर्धा किंवा एक छोटा ग्लास) पिणे केव्हाही चांगले. अतिप्रमाणात पिणं आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरु शकत.


Web Title : गन्ने का रस: स्वास्थ्यवर्धक या हानिकारक? इन समस्याओं में करें परहेज

Web Summary : गन्ने का रस ताजगी देने वाला होता है, लेकिन मधुमेह, वजन की समस्या, फैटी लिवर, किडनी की समस्या या आईबीएस से पीड़ित महिलाओं के लिए हानिकारक हो सकता है। अधिक चीनी इन स्थितियों को बढ़ा सकती है। अपनी स्वास्थ्य स्थिति को ध्यान में रखते हुए संयम से सेवन करें।

Web Title : Sugarcane Juice: Healthy or Harmful? Avoid if You Have These Problems

Web Summary : Sugarcane juice, though refreshing, can be detrimental for women with diabetes, weight issues, fatty liver, kidney problems or IBS. Excess sugar can worsen these conditions. Consume in moderation, considering your health status.