तरुणपिढीमध्ये गुडघे दुखी, कंबरदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे.(Knee pain issue) वयाची चाळीशी ओल्याडल्यानंतर पूर्वी गुडघेदुखीचा त्रास व्हायचा पण आता २० व्या वर्षातच गुडघ्याचे दुखणे उद्भवते.(ayurvedic oil for knee pain) जर आपण सतत पायाची हालताल करत नसू तर आपल्याला गुडघेदुखी किंवा कंबरदुखीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.(natural remedy for back pain)
अनेकदा चालताना किंवा उठताना गुडघ्यातून आवाज येतो.(young age knee pain treatment) कंबरदुखीमुळे आपल्या पाठीच्या मणक्यावर अधिक दाब येतो.(ayurvedic massage for backache) त्यामुळे उठताना आणि बसताना देखील त्रास होतो.(joint pain relief ayurveda) कमी वयात गुडघेदुखीचा त्रास वाढल्याने आपण अनेक औषधे खातो परंतु, त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो.(ayurvedic treatment for muscle pain) पण घरगुती आयुर्वेदिक तेलाने मालिश केल्यास नक्की आराम मिळेल.
अनेकदा चुकीचा आहारा, चुकीचा व्यायाम आणि लठ्ठपणा या समस्यांमुळे देखील गुडघेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. चालताना-फिरताना त्रास होतो. व्हिटॅमिन्स आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कमी वयात आपल्याला या त्रासाला सामोरे जावे लागते. अनेकदा हा त्रास इतका वाढतो की गुडघ्यांमधून कटकट आवाज येतो. आपल्याला व्यवस्थितपणे हालचाल देखील करता येत नाही. अशावेळी आपण आयुर्वेदिक तेलाने मालिश केल्यास गुडघेदुखीचा त्रास कमी होईल. हे तेल कसे बनवायचे पाहूया.
साहित्य
राईचे तेल - १ वाटी
ओवा - १ चमचा
लवंग - ७ ते ८
कापूर - ५ ते ६
कच्ची हळद - १ इंच
मेथीचे दाणे - १ चमचा
सगळ्यात आधी तेल चांगले गरम करुन त्यात ओवा, लवंग, कापूर, हळदी आणि मेथीचे दाणे घालून व्यवस्थित शिजवून घ्या. थंड झाल्यानंतर या तेलाचे मालिश करा. हे तेल गुडघेदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखीवर रामबाण आहे. राईच्या तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहे. ज्यामुळे गुडघेदुखी आणि सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर गुडघ्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी आणि त्यांची लवचिकता सुधारण्यासाठी मदत करते.