Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अचानक कान दुखतो-ठणक लागतो? पाहा कान दुखण्याची कारणं आणि ३ उपाय

अचानक कान दुखतो-ठणक लागतो? पाहा कान दुखण्याची कारणं आणि ३ उपाय

Sudden ear pain? See the causes of sudden ear pain and 3 remedies : कान दुखण्याची कारणे आणि त्यावरील उपाय जाणून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2026 16:49 IST2026-02-24T15:38:55+5:302026-02-24T16:49:27+5:30

Sudden ear pain? See the causes of sudden ear pain and 3 remedies : कान दुखण्याची कारणे आणि त्यावरील उपाय जाणून घ्या.

Sudden ear pain? See the causes of sudden ear pain and 3 remedies | अचानक कान दुखतो-ठणक लागतो? पाहा कान दुखण्याची कारणं आणि ३ उपाय

अचानक कान दुखतो-ठणक लागतो? पाहा कान दुखण्याची कारणं आणि ३ उपाय

कान दुखणे ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना कधी ना कधी जाणवणारी वेदना आहे. अनेकदा हा त्रास अचानक सुरू होतो आणि सुरुवातीला साधा वाटला तरी काही वेळा तो तीव्र होऊ शकतो. त्यामुळे कान दुखण्यामागची सामान्य कारणे आणि त्यावरचे योग्य उपाय समजून घेणे गरजेचे आहे. कानदुखी विविध प्रसंगी बरेचदा उद्भवते. त्याची कारणे कायम वेगवेगळी असू शकतात.   

कान दुखण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे संसर्ग. सर्दी, खोकला किंवा घशातील इन्फेक्शनमुळे कानात सूज येऊ शकते. नाक, घसा आणि कान हे एकमेकांशी जोडलेले असल्यामुळे सर्दी झाल्यावर कानात दाब जाणवतो आणि कान ठणकायला लागतो. असह्य वेदना सुरु होते. लहान मुलांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो. काही वेळा कानात मळ जास्त प्रमाणात साचल्यामुळेही कान बंद झाल्यासारखे वाटते, ऐकू कमी येते आणि वेदना होतात. कान साफ करताना काडी, पिन किंवा कॉटन बड्सचा अति वापर केल्यास मळ आत ढकलला जातो आणि उलट त्रास वाढतो.

अंघोळ करताना किंवा पोहताना कानात पाणी गेल्यास आणि ते पूर्णपणे बाहेर न पडल्यास संसर्ग होऊ शकतो. यामुळे आतून खाज आणि वेदना जाणवू शकतात. काही वेळा दातदुखी किंवा जबड्याच्या सांध्यातील त्रासामुळेही कानात वेदना जाणवतात. दुखणे जरी दाताचे असले तरी ते कानापर्यंत पटकन पोहचते. तसेच हेडफोनचा जास्त वापर, मोठ्या आवाजात संगीत ऐकणे किंवा सतत आवाजाच्या संपर्कात राहणे यामुळेही कान दुखू शकतो.

कान दुखत असल्यास काही सोपे उपाय करून आराम मिळू शकतो. कानाजवळ हलक्या हाताने कोमट पाण्याची पट्टी ठेवल्यास वेदना कमी होण्यास मदत होते. सर्दीमुळे दाब जाणवत असल्यास वाफ घेतल्याने आराम मिळतो. कान नेहमी कोरडे ठेवणे महत्त्वाचे आहे. अंघोळीनंतर कान हलक्या हाताने पुसावेत, पण आत काहीही घालू नये. स्वतःहून औषधांचे ड्रॉप्स वापरणे टाळावे. जर तीव्र वेदना, ताप, कानातून पू किंवा रक्त येणे, किंवा ऐकू कमी येणे अशी लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कान दुखणे ही किरकोळ समस्या वाटली तरी दुर्लक्ष केल्यास ती गंभीर होऊ शकते. योग्य स्वच्छता, सर्दी-खोकल्यावर वेळेवर उपचार आणि कानांची काळजी घेतल्यास हा त्रास टाळता येऊ शकतो. वेळेवर लक्ष दिल्यास कान निरोगी आणि सुरक्षित राहू शकतात.

Web Title : अचानक कान दर्द: कारण और आसान उपाय

Web Summary : कान का दर्द आम है, अक्सर संक्रमण या मैल जमा होने से होता है। कान को सूखा रखें और अत्यधिक सफाई से बचें। गर्म सेंक और भाप से मदद मिल सकती है। गंभीर दर्द, बुखार या स्राव के लिए डॉक्टर की सलाह लें।

Web Title : Sudden Ear Pain: Causes and Simple Remedies Explained

Web Summary : Ear pain is common, often from infections or wax buildup. Keep ears dry and avoid excessive cleaning. Warm compresses and steam can help. Seek medical advice for severe pain, fever, or discharge.