Join us
Daily Top 2 Weekly Top 5

रोज फक्त सकाळी ब्रश करता, रात्री करत नाही? पाहा रात्री ब्रश न करण्याची सवय कशी ठरू शकते जीवघेणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 10:14 IST

Benefit Of Brushing Before Bed : अनेक संशोधनातून समोर आलंय की, रात्री ब्रश न करण्याची सवय केवळ दातांचं नाही तर हळूहळू आपल्या पूर्ण आरोग्य प्रभावित करते.

Benefit Of Brushing Before Bed : रोज सकाळी झोपेतून उठल्यावर दात आणि तोंड स्वच्छ करण्यासाठी ब्रश करण्याची सवय सगळ्यांनाच असते. बरेच लोक तर दिवसातून दोनदा म्हणजे सकाळी आणि रात्री देखील ब्रश करतात. पण जास्तीत जास्त लोक एकवेळ म्हणजे सकाळीच ब्रश करतात. त्यांना वाटतं की, रात्री ब्रश करणं काही गरजेचं नाही. जर आपणही असाच विचार करत असाल वेळीच सावध होण्याची गरज आहे. अनेक संशोधनातून समोर आलंय की, रात्री ब्रश न करण्याची सवय केवळ दातांचं नाही तर हळूहळू आपल्या पूर्ण आरोग्य प्रभावित करते. खासकरून हृदयाच्या आरोग्यावर याचा गंभीर प्रभाव पडतो.  

काय सांगतं संशोधन?

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूय ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार, दिवसभर खाल्ल्या-प्यायल्यावर दात आण हिरड्यांमध्ये अन्नाचे सूक्ष्म कण अडकतात. जर रात्री झोपण्याआधी ब्रश केला नाही तर तोंडातील बॅक्टेरिया या कणांवर वाढू लागतात आणि प्लाक तयार करतात. हा प्लाक हळूहळू टार्टरमध्ये बदलतो, जो दात आणि हिरड्यांसाठी नुकसानकारक ठरतो. यामुळे हिरड्यांमध्ये सूज, रक्त येणे आणि इंन्फेक्शनसारख्या समस्या निर्माण होतात. संशोधनातून समोर आलंय की, हिरड्यांचा आजार हा केवळ तोंडापुरता मर्यादित नाही. जेव्हा हिरड्यांमध्ये सूज येते, तेव्हा बॅक्टेरिया आणि सूज निर्माण करणारे तत्व रक्ताद्वारे शरीरातील इतर भागांमध्ये पोहोचतात. याने शरीरात सूज वाढते, जी अनेक गंभीर आजारांशी संबंधित असते. 

हृदयावर कसा पडतो प्रभाव? 

बऱ्याच संशोधनातून समोर आलं आहे की, हिरड्यांच्या समस्यांचा हृदयाच्या आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. जास्त दिवस राहणारी सूज रक्तवाहिन्यांच्या आतल्या थराचं नुकसान करू शकते. यामुळे धमण्यांमध्ये फॅट वेगाने जमा होऊ लागतं. या प्रोसेसला एथेरोस्क्लेरोसिस म्हटलं जातं. हीच स्थिती पुढे जाऊन हार्ट अॅटॅक किंवा इतर हृदयरोगांचा धोका वाढवू शकते. जर आपण आपल्या तोंडाच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली नाही तर हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. याच कारणाने हेल्थ एक्सपर्ट रोज दोन वेळा ब्रश करण्याचा सल्ला देतात. 

नियमित चेकअप फायदेशीर 

हेल्थ एक्सपर्टनुसार, जे लोक नियमितपणे रात्री ब्रश करतात आणि वेळोवेळी डेंटिस्टना भेटून आपल्या दातांची स्वच्छता किंवा स्केलिंग करतात, त्यांना हिरड्यांच्या आजारांचा धोका कमी असतो. जेव्हा हिरड्या निरोगी राहतात, तेव्हा शरीरात सूजही कमी राहते. ज्यामुळे हृदयाला नकळत फायदा मिळतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण नक्कीच रात्री ब्रश करण्याची छोटीशी सवय लावून घेऊ शकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Skipping night brushing? It could be deadly for your health!

Web Summary : Research reveals neglecting nightly brushing harms oral and heart health. Bacteria buildup leads to gum disease, increasing inflammation and heart disease risk. Regular dental checkups and nightly brushing protect your heart.
टॅग्स : हृदयरोगहृदयविकाराचा झटकाहेल्थ टिप्स