Join us

हृदयरोग टाळण्यासाठी रोज करा फक्त हे एक काम, Heart Attack ची कधीच राहणार नाही चिंता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 09:49 IST

Heart Heal Tips : खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, सुस्त लाइफस्टाईलमुळे हृदयरोगांचा धोका जास्त वाढतो. या कारणांमुळे जगभरात हृदयरोग होऊन मृत्यूचं प्रमाण अधिक आहे.

Heart Health Tips : हृदय आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. जर काही कारणानं हृदय बंद पडलं तर शरीर बंद पडतं. जोपर्यंत हृदयाचे ठोके सुरू राहतात, तोपर्यंतच आपण जिवंत राहू शकतो. त्यामुळे आपल्याला हृदय निरोगी ठेवण्यासाठी जास्त काळजी घ्यावी लागते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला लाइफस्टाईलमध्ये बदल करावे लागतात.

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, सुस्त लाइफस्टाईलमुळे हृदयरोगांचा धोका जास्त वाढतो. या कारणांमुळे जगभरात हृदयरोग होऊन मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायझेशन (WHO) नुसार, जगभरात दरवर्षी अंदाजे 17.9 मिनियन लोकांचा जीव जातो.

तुम्ही जर हृदरोगांचा धोका टाळला तर जास्त आणि चांगलं जीवन जगू शकता. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, केवळ एक काम करून तुम्ही वेगवेगळया हृदयरोगांचा धोका कमी करू शकता. अशात हे एक काम कोणतं आहे ते जाणून घेऊया.

हृदयासाठी फायदेशीर काय?

हृदय निरोगी ठेवण्यासाठी घाम गाळणं म्हणजेच फिजिकली अॅक्टिव राहणं खूप फायदेशीर ठरतं. शरीर अॅक्टिव ठेवल्यास हृदयाला अनेक फायदे मिळतात. व्यायाम केल्यानं हृदय निरोगी राहतं आणि सुरळीत काम करतं. अनेक शोधांमधूनही हे सिद्ध झालं आहे. 

जास्त जीवन जगण्याचा फंडा

एका शोधामध्ये सहभागी ज्या लोकांना दर आठवड्यात 150 ते 300 मिनिटं मध्यम फिजिकल अॅक्टिविटी आणि दर आठवड्यात 75 ते 150 मिनिटं जास्त फिजिकल अॅक्टिविटी केली, त्यांचं आयुष्य वाढण्याची शक्यता असं न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत अधिक होती.

मृत्यूचा धोका कमी होतो

नियमितपणे एक्सरसाईज केल्यानं ब्लड प्रेशर कमी करून इन्सुलिन सेंसिटिविटी वाढवून आणि एक अनुकूल प्लाज्मा लिपोप्रोटीन प्रोफाइल बनवून हृदय मजबूत आणि निरोगी ठेवता येतं. तर इतर काही शोधातून समोर आलं आहे की, जे लोक नियमितपणे व्यायाम करतात त्यांना हार्ट अॅटॅक आणि इतर हृदयरोगांचा धोका कमी राहतो.

कोणत्या एक्सरसाईज अधिक फायदेशीर

जॉन हॉपकिंस मेडिसिननुसार(ref), ब्रिस्क वॉकिंग, धावणं, स्वीमिंग, सायकलिंग, टेनिस खेळणं आणि दोरीच्या उड्या तसेच एरोबिक एक्सरसाईज, रेसिस्टेंस ट्रेनिंग, स्ट्रेचिंग, फ्लेक्सिबिलिटी आणि बॅलन्ससारख्या एक्सरसाईजनं हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते.

टॅग्स : हृदयरोगहृदयविकाराचा झटकाहेल्थ टिप्स