Join us

रोज ‘हे’ फळ खा, बॅड कोलेस्टेरॉलला दूर ठेवा, उपाय अगदी सोपा पण हार्ट ॲटॅकचा टळतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 14:53 IST

Apple For Reduce Cholesterol: रिसर्चमधून हे समोर आलं आहे की हाय कोलेस्ट्रॉल आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी हे फळं अधिक फायदेशीर ठरतं.

Apple For Reduce Cholesterol: चुकीची लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी या कारणांमुळे आजकाल भरपूर लोकांना हाय कोलेस्टेरॉलची समस्या होत आहे. कोलेस्टेरॉल वाढलं की, आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्या होतात. ज्यात हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा सगळ्यात जास्त धोका असतो. अशात एक्सपर्ट नेहमीच कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगत असतात. याबाबत काही रिसर्चही समोर आले आहेत. ज्यात नॅचरल उपाय सांगण्यात आले आहेत. असाच एक उपाय म्हणजे सफरचंद.

सफरचंद आरोग्यासाठी सगळ्यात फायदेशीर फळांपैकी एक मानलं जातं. यात बरेच पोषक तत्व असतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात आणि शरीर निरोगी ठेवतात. रोज सकाळी 1 किंवा दोन सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. तसेच रिसर्चमधून हे समोर आलं आहे की हाय कोलेस्टेरॉल आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी हे फळं अधिक फायदेशीर ठरतं.

2019 मध्ये समोर आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं की, रोज 2 सफरचंद खाल्ल्याने शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्टेरॉल बरंच कमी होतं. सफरचंदमुळे कोलेस्टेरॉलची समस्या दूर होऊन हृदय चांगलं ठेवतं. नियमितपणे सफरचंद खाल्ल्याने लोकांचा हृदयरोगांचा धोका कमी होतो. 

सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पॉलिफेनॉल्स आढळतात, जे शरीरात जाऊन आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. हे पोषक तत्व आपल्या रक्तवाहिन्या रिलॅक्स करण्यास मदत करतात आणि यात जमा झालेलं कोलेस्टेरॉल बाहेर काढतात.

हा रिसर्च ब्रिटनची यूनिवर्सिटी ऑफ रीडिंगच्या वैज्ञानिकांनी इटलीच्या वैज्ञानिकांसोबत मिळून केला होता. हा रिसर्च अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झाला होता. ही पहिली वेळ नाही की, ज्यात सफरचंद आणि कोलेस्टेरॉलमध्ये संबंध आढळून आला. 

याआधीही 2011 मध्ये यूएसच्या फ्लोरिडा स्टेट यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी रिसर्च केला होता. यातून समोर आलं होतं की, रोज 2 सफरचं खाल्ल्याने बॅड कोलेस्टेरॉल म्हणजे लो डेंसिटी लिपोप्रोटीन (LDL) लेव्हल 40 टक्के कमी होऊ शकते.

महत्वाची बाब म्हणजे रोज सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. कारण यात भरपूर फायबर असतं. हे एक असं तत्व आहे जे आपलं पचन तंत्र सुधारण्यास मदत करतं आणि पोट साफ ठेवण्यास मदत करतं. बद्धकोष्ठतेच्या रूग्णांना नेहमीच सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच सफरचंद इम्यूनिटी मजबूत करण्यासाठीही फायदेशीर मानलं जातं. 

टॅग्स : हृदयविकाराचा झटकाहृदयरोगहेल्थ टिप्स