आपण पाहतो वृद्ध माणसे चालताना जरा पाठीत वाकून चालतात. त्यांच्या पाठीला पोक आलेले असते. मानेचा भाग जरा सुजलेला असतो आणि पाठ कमानीप्रमाणे जरा अर्धवर्तुळाकार झालेली असते. वृद्धपणात पाठीला पोक येणे नैसर्गिक आहे. (struggling with Kyphosis ? If you don't take care of it in time, it can get worst )मात्र आजकाल तरुण मुलांनाही पोक असते. तरुणच काही तर लहान मुलांनाही पोक असते. पोक आल्यामुळे पाठ दुखते. तसेच कंबरदुखीचा त्रास सुरु होतो. पाठीला पोक येण्याला वैद्यकीय भाषेत कायफोसिस असे म्हणतात. या स्थितीत पाठीचा कणा पुढच्या दिशेने वाकतो. त्यामुळे पाठ वाकलेली दिसते. पोक येण्याची काही मुख्य कारणे जाणून घ्या.
१. बसताना चुकीची स्थिती अवलंबणे
सतत वाकून बसल्यामुळे पाठीला पोक येते. खुर्चीत बसताना वाकडे तिकडे बसण्याची अनेकांना सवय असते. पाठ वाकवून बसल्यावर अनेकांना बरे वाटते म्हणून ते तसेच बसतात. मात्र ताठ बसणे फार गरजेचे असते. पाठीत वाकून बसल्यामुळे पाठ त्याच आकारात राहते.
२. जड वजन उचलणे
पाठीवर रोज बॅग असते. ती बॅग प्रचंड जड असते. मग शरीर पुढच्या दिशेने वाकून बॅगेचा भार घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे रोज तसेच चालायची सवय लागते. ताठ राहून चालता येत नाही. असे केल्याने पाठ दुखायला लागते. असे वजन वाहणार्यांच्या पाठीला पोक येते. जास्त वेळ पाठीवर सामान राहिल्यामुळे स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे कणा पुढच्या दिशेला झुकतो. शाळकरी मुलांमध्ये ही समस्या उद्भवते. त्यामुळे त्यांच्या पाठीवर अति वजन देऊ नका. तसेच कॅल्शियमयुक्त पदार्थ त्यांना खायला द्या.
३. पाठीच्या कण्याचा विकार
एक वैद्यकीय स्थिती असते, ज्यात मणक्यांचे हाडे त्रिकोणी आकाराचे होत जाते. ज्यामुळे कणा पुढे वाकतो. ही समस्या किशोरवयीन मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. तसेच ही स्थिती केवळ पोश्चरमुळे नाही, तर हाडांच्या विकासातील त्रुटीमुळे होते. हाडांचा विकास होण्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळे पाठीला पोक येते.
पाठीला आलेले पोक घालवण्यासाठी काही सोपे उपाय असतात. आपल्या चुकीच्या सवयींमुळे आलेले पोक या उपायांमुळे घालवता येते. योगासनांमुळे पाठीचा कणा ताठ करता येतो. त्यासाठी खास योग आहेत. गोमुखासन, उत्तान शिशोसन, पर्वतासन या सारखे योग प्रकार रोज केल्याने आराम मिळेल. बसताना ताट बसायचा प्रयत्न करा. बॅगेत किती सामान घ्यायचे याचे नियोजन करा. तसेच पोक वाढतच चालले असेल तर योग्य वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पाठीला पोक येण्याची अनेक कारणे असू शकतात.