Join us

महिलांमध्ये छळतोय ब्रेन फॉग! 'ही' आहेत लक्षण, पाहा कोणत्या वयात होतो हा त्रास आणि उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2025 13:20 IST

stress and brain fog in middle age : causes of brain fog in middle age : how to reduce brain fog naturally : ब्रेन फॉग म्हणजे नेमकं काय आणि ही समस्या कमी करण्यासाठी नेमकं काय करता येऊ शकतं ते पाहूयात.

वयाच्या चाळीशीचा टप्पा ओलांडल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल घडू लागतात. या सगळ्या बदलांमध्ये महिलांना प्रामुख्याने मेंदूशी संबंधित काही बदल देखील दिसून येतात. या समस्यांपैकी एक समस्या म्हणजेच ब्रेन फॉग. यामध्ये महिलांना अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टी विसरण्याचा, कामावर लक्ष केंद्रित न होण्याचा आणि सतत (stress and brain fog in middle age) थकल्यासारखे वाटण्याचा त्रास होतो. हा काही गंभीर आजार नसला तरी, तुमच्या रोजच्या जीवनावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो(causes of brain fog in middle age).

हार्मोनल बदल, वाढलेला ताण, झोपेची कमतरता आणि लाईफस्टाईलमधील काही सवयी यामागे मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरतात. योग्य काळजी घेतली तर या समस्येवर मात करणे सहज शक्य होते. हा कोणताही आजार नाही, परंतु याकडे दुर्लक्ष केल्यास मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. ब्रेन फॉगची समस्या असली तरीही घाबरून जाण्याची गरज नाही. काही सोपे उपाय आणि चांगल्या सवयी स्वतःला लावून आपण या समस्येवर नियंत्रण मिळवू शकता आणि मेंदू पुन्हा सक्रिय ठेवू शकता. ब्रेन फॉग म्हणजे नेमकं काय आणि ही समस्या कमी करण्यासाठी नेमकं काय करता येऊ शकत ते पाहूयात. 

ब्रेन फॉग म्हणजे काय?

ब्रेन फॉग (Brain Fog) ही एक अशी स्थिती आहे, ज्यात मेंदू अगदी गोंधळलेला आणि सुस्त होतो. यामध्ये व्यक्तीला गोष्टी लक्षात ठेवण्यात, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते आणि मेंदू थकून गेल्यासारखे वाटते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पार्थ नागदा यांच्या मते, अनियमित झोपेचे वेळापत्रक, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, स्ट्रेस, जास्त स्क्रीन टाइम, सोशल मीडियाचा अतिवापर आणि गोड पदार्थ जास्त खाल्ल्याने ब्रेन फॉगची लक्षणे वाढू शकतात.

बहुतेकांना न आवडणारी भाजी करीना कपूर मात्र खाते आवडीने! म्हणून अजूनही आहे मेंटेन्ड...

चाळीशीनंतरच ब्रेन फॉग का वाढतो?

चाळीशीनंतर एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरोन आणि टेस्टोस्टेरोन यांसारख्या हार्मोन्सची पातळी बदलू लागते. हे हार्मोन्स मेंदूच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची पातळी कमी झाल्याने स्मृती आणि एकाग्रतेवर परिणाम होतो. याशिवाय, रोजचा स्ट्रेस एकाच वेळी अनेक कामे करणे, पाण्याची कमतरता आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळेही ब्रेन फॉगची समस्या वाढू शकते. 

ब्रेन फॉगची लक्षणे... 

१. एखाद्या खोलीत गेल्यावर तिथे का आलो हे विसरणे.

२. रोजची कामे करताना वारंवार लक्ष विचलित होणे.

३. चिडचिड, अस्वस्थता आणि डोके जड वाटणे.

जर तुम्हाला अशा समस्या जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. 

प्रत्येक गोष्टीत मुलं आळस करतात ? ५ सवयी - मुलं होतील चपळ- कामं करतील स्वत:हून...

ब्रेन फॉगची समस्या कमी करण्याचे सोपे उपाय... 

१. पुरेशी झोप घ्या :- दररोज ७ ते ८ तास झोपण्याची सवय लावा आणि झोपण्याची व उठण्याची वेळ निश्चित करा.

२. आरोग्यदायी आहार घ्या :- तुमच्या आहारात भरपूर फळे, हिरव्या भाज्या, धान्ये आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिडचा समावेश करा. गोड पदार्थ, अल्कोहोल आणि जंक फूड खाणे संपूर्णपणे टाळा. 

३. शरीराला हायड्रेटेड ठेवा :- दिवसभर पुरेसे पाणी प्या, कारण शरीरात पाण्याची कमतरता मेंदूची कार्यक्षमता कमी करते.

४. शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा :- रोज कमीत कमी ३० मिनिटे चाला किंवा एक्सरसाइज करा, ज्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाह वाढेल आणि विचार करण्याची क्षमता सुधारेल.

५. स्क्रीन टाइम कमी करा :- अभ्यास किंवा कामाच्या दरम्यान छोटे-छोटे ब्रेक घ्या आणि डिजिटल उपकरणांपासून थोडा वेळ दूर रहा.

६. तणाव नियंत्रित करा :- मेडिटेशन (ध्यान), माइंडफुलनेस किंवा तुमच्या आवडत्या छंदातून स्वतःल थोडा विरंगुळा करण्यासाठी वेळ द्या. 

डॉक्टरांकडे कधी जावे ?

जर ही लक्षणे बराच काळ टिकून राहिली किंवा ती वाढत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. काहीवेळा थायरॉइड, व्हिटॅमिनची कमतरता किंवा इतर आरोग्य समस्यांमुळेही ब्रेन फॉग होऊ शकतो.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समहिलास्त्रियांचे आरोग्य