काही सवयींचा आपण कधी विचारही करत नाही. त्यांचे परिणाम दुष्परिणाम यांचा विचार करायची कधी वेलच येत नाही. (Stop doing these 5 things immediately after meals, this is what can permanently damage your health)जेवणानंतर आपण निवांत बसून राहतो किंवा लगेच कामाला लागतो. काही गोष्टी जेवणानंतर आपण सहज करून जातो त्याचा काही वाईट परिणाम असू शकतो हा विचारही डोक्यात येत नाही. मात्र काही सवयी असतात ज्यांच्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत होत नाही. मुख्य म्हणजे या ५ सवयी अगदीच कॉमन आहेत. पाहा तुम्ही तर असे वागत नाही ना?
१. काही जणांना जेवल्यानंतर लगेच काही तरी गरम प्यायची सवय असते. जसे की चहा पितात किंवा मग कॉफी. (Stop doing these 5 things immediately after meals, this is what can permanently damage your health)जेवणानंतर असे कोणतेच पेय पिऊ नये. तसेच जेवणा आधी चहा कॉफी घेऊ नये. आयसीएमआर च्या साईटवरही हे नमूद केलेले आहे की जेवणानंतर काही गरम पेय प्यायल्याने अन्नातील पोषण शरीराला मिळत नाही. खास करुन अन्नातील आयर्न वाया जाते. त्यामुळे जेवण नंतर चहा किंवा कॉफी पिण्यामध्ये किमान एक ते दोन तासाचा कालावधी जावा.
२. जेवणानंतर लगेच फळे खाणे शरीराला फायद्याचे ठरत नाही. फळे फार पौष्टिक असतात. मात्र कोणत्याही वेळी खाऊ नयेत. जेवणानंतर लगेच फळे खाल्याने फळांचे फर्मेंटेशन होते. त्यामुळे पोटात गॅस तयार होतो. पचनही व्यवस्थित होत नाही.
३. आपल्याला घरातील अनुभवी लोक कायम सांगतात जेवल्यानंतर लगेच आडवे पडू नये. फेरफटका मारावा झोपण्याची वेळ आणि जेवणाची वेळ याती किमान एका तासाचे अंतर असावे. जेवल्यानंतर लगेच आडवे पडलात तर पचन व्यवस्थित होत नाही तसेच पित्ताचे प्रमाण वाढते. पोट दुखायला लागते. अपचन होते. त्यामुळे जेवल्यावर कधीच लगेच झोपायचे नाही.
४. गुंजनशाऊट्स या चॅनलवर सांगितल्यानुसार जेवणानंतर लगेच अंघोळीला जाऊ नये. जेवणानंतर लगेच अंघोळ केल्याने पचनाची क्रिया मंदावते. अंघोळ करताना पोटाभोवतीचे रक्ताभिसरण इतर अवयवांच्या दिशेने होते आणि पोटाला गरजेच्या असणाऱ्या क्रिया हळू होतात.
५. जेवल्यानंतर लगेच दात घासल्याने दातांचा सगळ्यात वरचा इनॅमलचा थर कमी होतो. त्याची झीज होते. दातासाठी ही लेअर फार गरजेची असते. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच दाताला ब्रश लावायचा नाही. कोलंबिया युनिवर्सिटीच्या साईटवर सांगितल्यानुसार, जेवणाच्या तासभरानंतरच दात घासा, जेवल्या-जेवल्या दात घासू नका.