Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोटाच्या 'या' ५ तक्रारींवर पुदिन्याची पाने म्हणजे वरदान! कोणत्या समस्येसाठी पुदिना कसा फायदेशीर ते पाहा...

पोटाच्या 'या' ५ तक्रारींवर पुदिन्याची पाने म्हणजे वरदान! कोणत्या समस्येसाठी पुदिना कसा फायदेशीर ते पाहा...

Stomach Problems Treatment With Mint Know How & When To Use : 5 Health Benefits of Mint : 5 home remedies for an upset stomach : Mint Leaves Powerful benefits for stomach you must know : पोटाच्या कोणत्या ५ समस्यांमध्ये पुदिना उपयुक्त, आणि त्याचा योग्य वापर कधी आणि कसा करायचा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2025 08:32 IST2025-05-28T08:16:39+5:302025-05-28T08:32:46+5:30

Stomach Problems Treatment With Mint Know How & When To Use : 5 Health Benefits of Mint : 5 home remedies for an upset stomach : Mint Leaves Powerful benefits for stomach you must know : पोटाच्या कोणत्या ५ समस्यांमध्ये पुदिना उपयुक्त, आणि त्याचा योग्य वापर कधी आणि कसा करायचा ?

Stomach Problems Treatment With Mint Know How & When To Use 5 Health Benefits of Mint 5 home remedies for an upset stomach Mint Leaves Powerful benefits for stomach you must know | पोटाच्या 'या' ५ तक्रारींवर पुदिन्याची पाने म्हणजे वरदान! कोणत्या समस्येसाठी पुदिना कसा फायदेशीर ते पाहा...

पोटाच्या 'या' ५ तक्रारींवर पुदिन्याची पाने म्हणजे वरदान! कोणत्या समस्येसाठी पुदिना कसा फायदेशीर ते पाहा...

सध्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना पोटाशी संबंधित अनेक समस्या त्रास देतात. आपल्यापैकी बऱ्याचजणांना अपचन, गॅस, मळमळ, पोटदुखी (5 Health Benefits of Mint) आणि भूक न लागणे अशा पोटाच्या वेगवेगळ्या समस्या सतावतात. सतत वरचेवर पोटाशी संबंधित अशा अनेक समस्या छळू लागल्या की, आपण त्यावर उपाय म्हणून (Stomach Problems Treatment With Mint Know How & When To Use) औषध घेतो. पोटाशी संबंधित अगदी लहान - सहान वाटणाऱ्या या समस्यांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. काहीवेळा अगदी किरकोळ वाटणाऱ्या या समस्या पुढे मोठ्या गंभीर आजाराचे कारण बनू शकतात(Mint Leaves Powerful benefits for stomach you must know).

पोटाशी संबंधित या अनेक तक्रारी कमी करण्यासाठी आपण औषधोपचारासोबतच काही घरगुती उपाय देखील नक्की करून पाहू शकतो. पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर पुदिन्याची पाने रामबाण औषध मानलं जातं. यामध्ये असलेले थंडावा देणारे गुणधर्म, अँटी-बॅक्टेरियल आणि पचन सुधारणारे घटक हे पोटाच्या विविध तक्रारींवर प्रभावीपणे (5 home remedies for an upset stomach) काम करतात. पुदिन्याची पाने ही पोटांच्या समस्येवर एक नैसर्गिक व परिणामकारक औषध ठरू शकतं. पोटाच्या अनेक तक्रारी दूर करण्यासाठी पुदिन्याची पाने योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेणे आवश्यक असते. पोटाच्या कोणत्या ५ समस्यांमध्ये पुदिना उपयुक्त आहे आणि त्याचा योग्य वापर कधी आणि कसा करायचा ते पाहूयात. 

पोटाच्या कोणत्या ५ तक्रारीसाठी पुदिना उपयुक्त आहे... 

१. पोटातील गॅस आणि सूज कमी करण्यासाठी :- पुदिना पोटात तयार होणाऱ्या गॅसवर नियंत्रण ठेवतो. त्यामध्ये असणारे ‘मेन्थॉल’ नावाचे तत्त्व पोटातील गॅस बाहेर टाकण्यास मदत करते आणि आतड्यांच्या स्नायूंना सैल करते, ज्यामुळे पोट हलकं वाटतं. जेवणानंतर एक कप पुदिन्याची चहा प्यायल्याने मोठा आराम मिळतो. यासाठी, ४ ते ५ ताज्या पुदिन्याच्या पानांना उकळत्या पाण्यात टाका. ५ मिनिटं चांगलं उकळा. त्यानंतर थोडंसा लिंबाचा रस त्यात घाला आणि हळूहळू प्या. हा उपाय पचन सुधारतो, गॅस कमी करतो आणि पोट शांत ठेवतो.

म्हणून दुपारच्या जेवणासोबत ताक पिणे आहे फायदेशीर! ताक पिण्याचे ७ आरोग्यदायी फायदे...

२. अपचन कमी करण्यासाठी :- पुदिना अपचनाच्या वेगवेगळ्या लक्षणांवर जसे की पोट जड वाटणं, सतत ढेकरं येणं आणि मळमळ होणे अशा समस्यांवर प्रभावीपणे काम करते. त्यामध्ये असलेले एन्झाइम्स पचनक्रिया वेगवान करतात आणि अन्नपदार्थ व्यवस्थित पचण्यास मदत करतात. १ चमचा पुदिन्याच्या रसात १ चिमूट काळं मीठ मिसळा आणि ते साधारणपणे जेवणापूर्वी १० ते १५ मिनिटं आधी प्यावे. हा उपाय पचनक्रिया सक्रिय करतो आणि जेवणानंतर होणाऱ्या अपचनाच्या त्रासापासून सहज आराम मिळवून देतो.

सकाळी रिकाम्या पोटी शिल्पा शेट्टी पिते 'हे' खास ड्रिंक, म्हणून चाळिशी उलटली तरी आहे फिट!

३. अ‍ॅसिडिटीच्या समस्येवर फायदेशीर :- पुदिना पोटातील अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवतो आणि त्यामुळे छातीत होणाऱ्या जळजळीपासून आराम मिळतो. पुदिन्याचा थंड गुणधर्म पोटातील उष्णता शांत करते आणि पचनसंस्थेला आराम देते. ग्लासभर थंड दूध किंवा पाणी घ्या. त्यात १ चमचा ताजा पुदिन्याचा रस मिसळा आणि हळूहळू प्या. हा उपाय तात्काळ पोटाला थंडावा देतो आणि छातीत होणारी जळजळ किंवा अ‍ॅसिडिटी दूर करतो.

अचानक ब्लड प्रेशर वाढलं तर घाबरू नका! WHO ने सांगितलेले 'हे' उपाय, उच्च रक्तदाब नियंत्रणात...

४. पोटदुखीसाठी फायदेशीर :- पुदिना आतड्यांतील क्रॅम्प्स कमी करतो आणि पोटदुखी सारख्या समस्येवर आराम मिळवून देतो. विशेषतः महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या पोटदुखीसाठी पुदिना फायदेशीर ठरतो. १ कप कोमट पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे २ ते ३ थेंब टाका आणि ते हळूहळू प्या हा उपाय पोट हलकं करण्यास, वेदना कमी करण्यास आणि आतड्यांना आराम देण्यास मदत करतो.

५. भूक न लागणे, मळमळ होणे :- जर भूक लागत नसेल किंवा सतत मळमळ वाटत असेल, तर या समस्येवर पुदिन्याची पाने फायदेशीर ठरतात. पुदिन्याचा सुगंध मेंदूला ताजेपणा देते आणि पचनासाठी आवश्यक एन्झाइम्सना सक्रिय करतो, ज्यामुळे भूक सुधारते आणि पोट हलकं वाटतं. पुदिन्याचा रस, आलं आणि लिंबाचा रस यांचा एकत्रित रस करुन सकाळी रिकाम्या पोटी प्यावा. या उपायाने नैसर्गिकरित्या भूक वाढते, तसेच मळमळ यांसारख्या लक्षणांपासूनही आराम मिळतो.

Web Title: Stomach Problems Treatment With Mint Know How & When To Use 5 Health Benefits of Mint 5 home remedies for an upset stomach Mint Leaves Powerful benefits for stomach you must know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.