Join us
Daily Top 2 Weekly Top 5

पोट साफ होत नाही? रोज सकाळी ५ मिनिटे करा या ६ कृती - पोट होईल साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2026 16:11 IST

Stomach not clearing? Do these 6 steps for 5 minutes every morningyou will get relief : पोट साफ करण्यासाठी काही कृती ठरतात उपयुक्त.

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत, अनियमित आहार आणि कमी हालचाल यामुळे पोट साफ न होण्याची समस्या अनेकांना जाणवते. बद्धकोष्ठतेमुळे पोट फुगणे, जडपणा, आळस आणि चिडचिडही वाढते. अशावेळी औषधांवर अवलंबून न राहता काही सोपे व्यायाम नियमित केले तर पोट नैसर्गिकरीत्या साफ होण्यास मदत होते. हे व्यायाम अगदी सर्व वयोगटातील लोकांना करता येतील असे सोपे आहेत.

सकाळी उठल्यावर हलका चालण्याचा व्यायाम हा सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. १५ ते २० मिनिटे वेगात चालल्याने आतड्यांची हालचाल सुधारते आणि शौचाची क्रिया सुलभ होते. नियमित चालणे पचनसंस्थेला सक्रिय ठेवते.

पवनमुक्तासन हा योगप्रकार पोट साफ होण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. पाठ टेकून झोपून एकेक गुडघा छातीकडे आणून धरावा आणि काही सेकंद तसेच राहावे. नंतर दोन्ही गुडघे छातीकडे घेऊन हलकेच दाब द्यावा. यामुळे पोटातील वायू कमी होतो आणि आतड्यांवर हलका दाब येऊन मलप्रवृत्ती सुधारते.

भुजंगासनही पचनासाठी फायदेशीर आहे. पोटावर झोपून हातांच्या आधाराने शरीराचा वरचा भाग उचलावा. या आसनामुळे पोटातील अवयवांवर ताण येतो आणि पचनक्रिया सुधारते. सुरुवातीला काही सेकंद शरीर स्थिर ठेवावे आणि हळूहळू वेळ वाढवावी.

मलासन हा आणखी एक सोपा व्यायाम आहे. पाय थोडे अंतरावर ठेवून खाली बसावे, जसे पूर्वी भारतीय पद्धतीने शौचास बसायचे अगदी तसेच. ही स्थिती आतड्यांना नैसर्गिकरीत्या सक्रिय होण्यासाठी मदत करते. काही मिनिटे या स्थितीत राहिल्यास पोट साफ होण्यास मदत होते.

याशिवाय कंबर गोलाकार फिरवणे, पोटावर सौम्य मसाज करणे आणि खोल श्वसनाचे व्यायाम करणे यामुळेही पचन सुधारते. दीर्घ श्वास घेऊन पोट फुगवणे आणि हळूहळू श्वास सोडणे या क्रियेमुळे आतड्यांची हालचाल सक्रिय होते.

व्यायामाबरोबरच काही सवयी महत्त्वाच्या आहेत. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे, आहारात तंतुमय पदार्थ जसे की फळे, भाज्या आणि सॅलड वाढवणे, तसेच दिवसभरात पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. व्यायाम नियमित केला तर परिणाम अधिक चांगले दिसतात.  

English
हिंदी सारांश
Web Title : Relief from Constipation: Do these 6 exercises for 5 minutes!

Web Summary : Struggling with constipation? Simple exercises like walking, Pawanmuktasana, Bhujangasana, and Malasana can aid digestion. Combine these with fiber-rich foods, adequate hydration, and warm water in the morning for better results.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यहोम रेमेडीव्यायाम