Join us

सकाळी पोट साफ होत नाही? रोज रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर दह्यात कालवून ‘हा’ पदार्थ खा, त्रास कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2025 18:04 IST

Stomach Cleaning Home Remedy : surprising benefits of eating curd with triphala powder clean stomach dirt quickly boost digestion : बद्धकोष्ठतेमुळे पोट साफ होत नसेल तर करायला हवा असा अस्सल घरगुती उपाय...

सकाळी उठल्यावर पोट साफ होणं ही सगळ्यात महत्वाची आणि आवश्यक गोष्ट असतेच. सकाळी झोपेतून उठल्यावर पोट साफ व्हायलाच हवं. तर दिवसभर आपल्या शरीराचे सर्व कार्य सुरळीतपणे चालू शकते. मात्र वेळच्या वेळी (Stomach Cleaning Home Remedy) पोट साफ झाले नाही तर आपलं सगळं रुटीन बिघडून जाते. पोट व्यवस्थित साफ झाले नाही तर आपल्याला अस्वस्थ वाटते. इतकेच नाही तर पोटात जळजळ होणे, गुडगुड होणे, पोट जड झाल्यासारखे वाटणे, अॅसिडीटी यांसारख्या तक्रारी निर्माण होतात. याचा आपल्या एकूण पचनशक्ती आणि आरोग्यावर परीणाम होतो(surprising benefits of eating curd with triphala powder clean stomach dirt quickly).

अनेकांना हा त्रास सतावत असून त्यावर वेळीच योग्य ते उपाय न केल्यास भविष्यात गंभीर दुखणी डोके वर काढण्याची शक्यता असते. बद्धकोष्ठतेसाठी डॉक्टर काहीवेळा आपल्याला लॅक्झिटीव्ह औषधे लिहून देतात. याशिवाय सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे, रात्री झोपताना तूप आणि कोमट पाणी घेणे, केळं खाणे असे काही ना काही उपाय आपण करतो. पण तरीही पोट साफ होण्यास अडचणी येत असतील तर मात्र यावर कायमचा उपाय करायला हवा. आयुर्वेदानुसार, पोट साफ होण्यासाठी त्रिफळा अतिशय फायदेशीर मानला जातो. यासाठीच, जर सकाळी उठल्यावर आपले पोट साफ होत नसेल तर त्रिफळा आणि दही यांचा आयुर्वेदातील एक खास उपाय नक्की करून पाहा.

पोट व्यवस्थित साफ होतच नाही, मग करा हा सोपा उपाय... 

आयुर्वेदानुसार, त्रिफळा हे तीन मुख्य औषधी फळे हरडा, बेहडा आणि आवळा यांच्या मिश्रणापासून तयार केले जाते. हे शरीराच्या अंतर्गत स्वच्छतेसाठी उपयुक्त मानले जाते आणि पचनसंस्था निरोगी ठेवते. याचबरोबर, दही हे एक नैसर्गिक प्रोबायोटिक आहे, ज्यामध्ये आतड्यांसाठी फायदेशीर बॅक्टेरिया असतात. त्रिफळा आणि दही एकत्र खाल्ले तर बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर होतातच सोबतच आतडे देखील सक्रिय होतात. रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा आणि दही खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. हे मिश्रण आतड्यांमध्ये साचलेली घाण काढून टाकते, ज्यामुळे पोट हलके वाटते. त्रिफळा शरीरातील विषारी  पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. यासोबतच, दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. 

गॅसेस आणि ॲसिडिटीला कंटाळलात? स्वयंपाकघरातील ‘हे’ ६ पदार्थ करतात त्रास कमी, पाहा घरगुती उपाय...

कधी आणि कसे खावे ? 

दह्यामध्ये त्रिफळा मिसळून खाल्ल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. यासोबतच, आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट केल्याने त्वचेची चमक वाढण्यास आणि शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते. या मिश्रणाचा सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी, रात्री झोपण्यापूर्वी सुमारे ३० मिनिटे आधी एक वाटी ताज्या दह्यात एक चमचा त्रिफळा पावडर मिसळून ते खावे. हे मिश्रण हळूहळू चावून खा आणि त्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. जर एखाद्या व्यक्तीला आम्लपित्त किंवा जास्त गॅसची समस्या असेल तर त्रिफळा खाण्याचे प्रमाण कमी ठेवावे. गर्भवती महिला आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांनी हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बारीक होणं महत्वाचं नाही, आरोग्य जपणं-फिट असणं महत्वाचं! साेनाली कुलकर्णी सांगते, ट्रेंडच्या नादी लागून...

पोट पूर्णपणे नीट साफ न होण्याची अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये अन्नात फायबरची कमतरता, कमी पाणी पिणे, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यांचा समावेश आहे. सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये प्रक्रिया केलेले आणि तळलेले पदार्थ खाणे अगदी कॉमन झाले आहे, ज्याचा आतड्यांवर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सकाळी पोट साफ न होण्याची समस्या सतावत असेल तर, पचनसंस्थेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे लक्षण असू शकते.

चालाल तर जगाल! डॉक्टर सांगतात, शुगर आणि वेटलॉससाठी किती वेळ चालावं? चालण्याचे मिळतील दुप्पट फायदे...

त्रिफळा आणि दही यांचे एकत्रित मिश्रण पोट साफ करण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. जर तुम्हाला दररोज सकाळी तुमचे पोट पूर्णपणे स्वच्छ हवे असेल आणि तुमची पचनसंस्था मजबूत राहावी असे वाटत असेल, तर त्रिफळा आणि दह्याचा हा सोपा उपाय तुमच्या डेली रुटीन मध्ये घेणे फायदेशीर राहील.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीलाइफस्टाइल