Join us

आंबट-करपट ढेकर आणि छातीत सतत जळजळ, पोटाच्या कॅन्सरचीही असू शकतात लक्षणं-वेळीच तपासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 13:37 IST

Stomach Cancer Cause and Sign : छातीत जळजळ, आंबट ढेकर आणि लठ्ठपणाला सामान्य समजलं जातं. पण जर या समस्या सतत होत असतील तर हा पोटाच्या कॅन्सरचा संकेत असू शकतो.

Stomach Cancer Cause and Sign : आता लाइफस्टाईल अशी झाली आहे ना की, लोक कामानिमित्ताने जास्त वेळ बाहेर राहतात. लोकांची रोज धावपळही जास्त होते. त्यामुळे घरच्या जेवणाऐवजी लोक बाहेरचे अल्‍ट्रा प्रोसेस्‍ड फूड्स अधिक खातात. तसेच लोकांची लाइफस्टाईलही खूपच अनहेल्दी झाली आहे. ज्यामुळे ते वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. बाहेरचे तेलकट पदार्थ खाल्ल्यानं पोटासंबंधी अनेक समस्या होऊ लागल्या आहेत. अशात अनेकांना अ‍ॅसिडिटीची समस्या होते. पण याकडे लोक दुर्लक्ष करतात.

तसेच छातीत जळजळ, आंबट ढेकर आणि लठ्ठपणाला सामान्य समजलं जातं. पण जर या समस्या सतत होत असतील तर हा पोटाच्या कॅन्सरचा संकेत असू शकतो. वेळीच याकडे लक्ष देऊन उपचार केले पाहिजे, जेणेकरून जीव वाचवता यावा. आज आपण या लेखात पोटाच्या कॅन्सरबाबत समजून घेणार आहोत.

गॅस्ट्रिक कॅन्सर काय असतो?

क्‍लीवलॅंड क्‍लीनिकनुसार, पोटाच्या कॅन्सरला गॅस्ट्रिक कॅन्सरही म्हणतात. ही स्थिती तेव्हा होते, जेव्हा पोटाच्या लायनिंगच्या कोशिका असामान्यपणे वाढू लागतात. या कोशिका हळूहळू पोटाच्या आत पसरतात. तेव्हा कॅन्सर पोटाच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. साधारण 95 टक्के केसेसमध्ये पोटाचा कॅन्सर पोटाच्या आतील थरांमधून सुरू होतो. जर वेळीच उपचार केले नाही तर आत गाठी तयार होतात आणि आजूबाजूचे अवयव जसे की लिव्हर, पॅनक्रियाजपर्यंत कॅन्सर वाढतो.

कुणाला असतो धोका?

पोटाचा कॅन्सर हा कुणालाही होऊ शकतो. पण 65 वर्षे आणि त्यापेक्षा वयाच्या लोकांना याचा धोका अधिक असतो. तसेच महिलांच्या तुलनेत या कॅन्सरचा धोका पुरूषांमध्ये अधिक असतो.

पोटाच्या कॅन्सरची लक्षणं

भूक कमी लागणं

अन्न गिळण्यात अडचण

थकवा किंवा कमजोरी

मळमळ आणि उलटी

अचानक वजन कमी होणं

हार्टबर्न किंवा अपचन

विष्ठेचा रंग काळा होणे

रक्ताची उलटी येणे

जेवण केल्यावर पोट जड वाटणे

पोटाच्या कॅन्सरची कारणं?

पोटाचा कॅन्सर तेव्हा होतो जेव्हा पोटाच्या सेल्सच्या डीएनएमध्ये बदल होतो. डीएनएच सेल्सना सांगतो की, कधी वाढायचं आहे आणि कधी मृत व्हायचं आहे. जेव्हा हा बदल होतो, तेव्हा सेल्स सतत वाढत राहतात आणि मृत होतात. यांमध्ये ट्यूमर बनतो आणि कॅन्सर पसरतो.

टॅग्स : कॅन्सर जनजागृतीकर्करोगहेल्थ टिप्स