Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आजपासूनच ६ पदार्थांना म्हणा कायमचं गुडबाय! डॉक्टर सांगतात, तरुण दिसायचं असेल तर सोपा उपाय

आजपासूनच ६ पदार्थांना म्हणा कायमचं गुडबाय! डॉक्टर सांगतात, तरुण दिसायचं असेल तर सोपा उपाय

Best habits for bone and muscle strength: Daily routine for seniors: Energy boosting habits for 50+: वाढत्या वयात आहारात काही प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सचा समावेश करुन आपण निरोगी राहू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2025 18:05 IST2025-07-11T18:00:00+5:302025-07-11T18:05:01+5:30

Best habits for bone and muscle strength: Daily routine for seniors: Energy boosting habits for 50+: वाढत्या वयात आहारात काही प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सचा समावेश करुन आपण निरोगी राहू शकतो.

Stay strong even in your 50s 6 daily habits to keep your bones and muscles strong | आजपासूनच ६ पदार्थांना म्हणा कायमचं गुडबाय! डॉक्टर सांगतात, तरुण दिसायचं असेल तर सोपा उपाय

आजपासूनच ६ पदार्थांना म्हणा कायमचं गुडबाय! डॉक्टर सांगतात, तरुण दिसायचं असेल तर सोपा उपाय

वय वाढू लागले की, त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो.(Health tips in 50s) जसं जसं वय वाढते तसं तशी आपली हाडे अधिक कमकुवत होतात. स्नायूचे दुखणे देखील वाढते.(Best habits for bone) इतकेच नाही तर शरीरातील स्टॅमिना कमी होऊन आपल्याला व्यायाम देखील करता येत नाही. या काळात आपल्याला जास्त वेगाने चालता किंवा धावताही येत नाही.(Daily routine for seniors)
वयाची पन्नाशी ओलांडली की आपल्याला स्नायू बळकट करण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात.(Natural energy for aging body) पण यासाठी व्यायाम करणं पुरेसे नाही. काही पौष्टिक आहार आणि रोजच्या जीवनशैलीत बदल करायला हवा.(Over 50 health routine) आपण ऐन तारुण्यात आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवून जंक फूडचे सेवन कमी केल्यास काही प्रमाणात स्नायू मजबूत करण्यास मदत होते. आपल्यापैकी अनेकजणांनी तारुण्यात प्रोसेस्ड फूड, साखरेचे पदार्थ आणि लाल मांस अतिप्रमाणात खाल्ले असेल, ज्याचा परिणाम आपल्याला आरोग्यावर विपरीत झालेला पाहायला मिळत आहे.(Strength building foods) पण वाढत्या वयात आहारात काही प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सचा समावेश करुन आपण निरोगी राहू शकतो. 

व्हायरल इन्फेक्शनमुळे थकवा आला? इम्युनिटी बूस्टसाठी खा ' ही ' खास चिक्की, शरीर होईल तंदुरुस्त

हार्वर्ड अभ्यासानुसार ३९ ते ६९ वर्ष वयोगटातील १ लाख ५ हजार लोकांच्या आहाराचा आणि आरोग्याचा सुमारे ३० वर्षे मागोवा घेण्यात आला. वयाच्या ७० व्या वर्षी देखील काही लोक आहारात बदल करुन हृदयविकारासारख्या गंभीर आजारांपासून दूर राहिले आहेत. इतकेच नाही तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील सुधारले. ज्या लोकांचा आहार पौष्टिक आणि संतुलित होता ते मधुमेह, बीपीसारख्या आजारांपासून देखील मुक्त होते. 

तज्ज्ञांच्या मते वाढत्या वयात संतुलित आणि योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी कडधान्य, फळे, भाज्या, ओट्स, डाळी आणि शेंगा, बदाम किंवा अक्रोड सारखे पदार्थ खा. आहारात ऑलिव्ह ऑइलसारखे निरोगी आणि कमी चरबीयुक्त तेलाचा, कमी चरबीयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खा. 

ऐन तारुण्यात चेहरा म्हातारा दिसतो? लिंबू पाण्यात ३ गोष्टी मिसळून प्या, त्वचेवर येईल काचेसारखा ग्लो..

आपल्या आहारात गोडाचे पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स किंवा पॅक केलेल ज्यूस, प्रक्रिया केलेले मांस, सॉस, ट्रान्स फॅट्स आणि जास्त मीठ असणारे पदार्थ खाऊ नका. वयाची ४० शी ओलांडल्यानंतर आपण आहारात बदल करायला हवा. ज्यामुळे वाढत्या वयात आपण अनेक आजारांपासून दूर राहून निरोगी राहू शकतो. 
 

Web Title: Stay strong even in your 50s 6 daily habits to keep your bones and muscles strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.