Screen Time : आजकाल मोबाइल फोनचा वापर खूप जास्त वाढला आहे. थोडा वेळ जरी मोबाइल जवळ नसला की, लोकांना अस्वस्थ वाटू लागतं. दर किती मिनिटांनी फोन करणं ही लोकांची एक सवय झाली आहे. दिवसभरातून कित्येक तास लोक डिजिटल स्क्रीनच्या संपर्कात राहतात. पण ही सवय फार घातक आहे. एका रिचर्चनुसार, टॅबलेट किंवा स्मार्टफोनवर रोज १ तास घालवल्यानं मायोपिया किंवा जवळ व्यवस्थित न दिसण्याचा धोका खूप वाढतो.
जेएएमए नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, व्यवस्थित समीक्षा आणि डोज-रिस्पॉन्स मेटा-विश्लेषणमध्ये डिजिटल स्क्रीनवर रोज १ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ घालवल्यानं जवळ कमी दिसण्याची समस्या होते. डोज-रिस्पाॉन्स पॅटर्ननं सिग्मोएडल शेपबाबत स्पष्ट केलं की, रोज १ तासांपेक्षा कमी वेळ फोन किंवा डिजिटल स्क्रीनच्या संपर्कात राहिल्यानं कोणताही धोका नाही. पण ४ तासांपर्यत यांचा वापर केल्यास धोका वाढतो.
अभ्यासकांना आढळून आलं की, "डिजिटल स्क्रीनच्या वाढत्या वापरामुळे जवळ न दिसण्याची समस्या वाढू शकते. टीमनं ४५ रिसर्चमधून मिळवलेल्या आकडेवारीची समीक्षा केली. ज्यात लहान मुलांसोबतच ३३५,००० पेक्षा जास्त वयस्क सहभागी लोकांच्या स्क्रीन टाइम आणि जवळ न दिसणं यात संबंध आढळून आला.
अभ्यासकांनी सांगितलं की, १ ते ४ तास स्क्रीनवर घालवल्यानं धोका वाढतो आणि हळूहळू वाढत जातो. तर १ तासांपेक्षा कमी स्क्रीनवर वेळ घालवत असाल तर धोका नसल्याचं आढळून आलं. ज्यामुळे लोकांना स्क्रीन टाइम १ तासांपेक्षा कमी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तेच भारतीय एक्सपर्टनं सांगितलं की, टेक्नॉलॉजी आणि मोबाइलसारखे गॅजेट्स विद्यार्थी, आई-वडील आणि शिक्षकांसाठी परीक्षेच्या काळात एक समस्या बनले आहेत. जास्त वेळ स्क्रीन पाहिल्यानं मेंदुच्या विचार करण्याच्या आणि समजण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडतो. असं होतं कारण लोकांचं कॉन्स्ट्रेशन कमी होतं आणि जास्त वेळ स्क्रीन पाहत असताना अनेकदा लोक चुकीच्या पद्धतीनं बेड किंवा सोफ्यावर बसतात. ज्यामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. जसे की, लठ्ठपणा, स्नायूंमध्ये वेदना, पाठीत वेदना इत्यादी.