भारतीय संस्कृतीत आवळा हे फक्त फळ नसून, त्याला 'अमृतफळ' म्हणून ओळखले जाते. व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा खजिना असलेले हे छोटेसे गोलाकार फळं महिलांचेआरोग्य व सौंदर्यासाठी वरदानच ठरते. आजच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये, महिलांना घर, करिअर आणि स्वतःचे आरोग्य अशा अनेक भूमिका एकाच वेळी पार पाडाव्या लागतात, अशावेळी महिलांच्या शरीराला विशिष्ट पोषण आणि संरक्षणाची गरज असते. आवळ्यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात, जे महिलांच्या मासिक पाळीपासून त्वचा आणि केसांच्या आरोग्यापर्यंतच्या विविध समस्यांवर उपयोगी ठरतात. महिलांसाठी आवळा म्हणजे आरोग्याचा खजिना! हे छोटे फळ महिलांच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते(dietitian approved way to eat amla).
पचनक्रियेचे कार्य सुधारायचे असो, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करायची असेल, केस आणि त्वचा चांगली ठेवण्यासाठी किंवा इम्युनिटी मजबूत करून शरीराला रोगांपासून वाचवायचे असेल तर दररोज आवळा खाण्याची सवय निरोगी राहण्यास मदत करते. जर आपण एका विशिष्ट पद्धतीने दररोज आवळा खाल्ला तर यामुळे फक्त आजारच दूर राहणार नाहीत, तर आवळ्यातील पौष्टिक गुणधर्म दुपटीने वाढतील. डायटिशियन नंदिनी यांनी आवळ्याचे फायदे अनेक पटीने वाढवण्यासाठी ते खाण्याच्या काही (amla eating methods for maximum nutrition) विशिष्ट पद्धती आणि महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत.
आवळा खाण्याची योग्य पद्धत...
आवळा खाण्याची योग्य पद्धत सांगताना डाएटिशियन म्हणतात, ४ ते ५ आवळे, १ टेबलस्पून काळीमिरी पावडर, ३ ते ४ मोठे चमचे मध इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. सर्वप्रथम ४ ते ५ आवळे घ्या. त्यांना स्वच्छ धुऊन त्याचे छोटे-छोटे तुकडे करा. आता या तुकड्यांमध्ये १ चमचा काळीमिरी पावडर आणि ३ ते ४ मोठे चमचे मध मिसळा. हे मिश्रण एका एअर-टाइट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करुन ठेवा. तुम्ही दररोज या मिश्रणाचा फक्त १ चमचा खायचा आहे. हे मिश्रण रोगप्रतिकारशक्ती, पचन आणि सर्दी-खोकल्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
फॅटी लिव्ह न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ उपाय. लिव्हरचं काम सुधारेल - वेटलॉसही होईल झरझर...
रोज आवळा - काळीमिरी पूड - मधाचे एकत्रित मिश्रण खाण्याचे फायदे...
१. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. हे व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि अनेक प्रकारच्या संसर्गापासून आपला बचाव करते.
२. काळीमिरी पावडर शरीरामध्ये व्हिटॅमिन-सीचे शोषण योग्य पद्धतीने करण्याचे प्रमाण वाढवते. त्यामुळे आवळ्याचे फायदे शरीर अधिक प्रभावीपणे घेऊ शकते.
३. मधात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे आपल्याला अनेक प्रकारचे संसर्ग आणि सिझनल होणाऱ्या आजारांपासून आपला बचाव करतात.
४. आवळा हे व्हिटॅमिन-सीचा सर्वात उत्तम स्रोत आहे. व्हिटॅमिन-सी पांढऱ्या रक्तपेशी तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि महिलांना वारंवार होणाऱ्या संसर्गापासून बचाव करण्यास मदत होते.
५. आवळ्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-सी 'कोलेजन' चे प्रमाण वाढवतात. यामुळे त्वचा तरुण, तजेलदार राहते. तसेच चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स ( आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.
६. आवळा केस गळणे थांबवतो आणि केसांना अकाली पांढरे होण्यापासून वाचवतो. यातील पोषक तत्वे केसांच्या मुळांना मजबूत करतात, ज्यामुळे केस घनदाट, चमकदार आणि लांब होतात.
७. दररोज आवळा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होतात.
८. आवळा लोहाचे शोषण वाढवण्यास मदत करतो आणि शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवतो. मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्राव आणि ॲनिमियाची समस्या कमी करण्यासाठी महिलांना याचा मोठा फायदा होतो.
९. आवळा चयापचय क्रियेचा वेग सुधारतो, ज्यामुळे अतिरिक्त चरबी लवकर जळण्यास मदत होते. रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्यास पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे भूक कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.
१०. आवळ्यामध्ये असलेले क्रोमियम नावाचे तत्व इन्सुलिनच्या कार्याला उत्तेजित करते, ज्यामुळे महिलांमध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
आवळा हे महिलांसाठी सुपरफूड आहे. फक्त रोज १ चमचा आवळा, मध आणि काळीमिरीचे मिश्रण खाल्ल्याने महिलांना आरोग्य आणि सौंदर्याच्या अनेक समस्यांचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते.
