Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सामंथा रुथ प्रभु सांगते, शुगर नियंत्रणाचा एक खास फंडा, तिने स्वत:ची शुगर ‘अशीच’ केली कंट्रोल काही दिवसात

सामंथा रुथ प्रभु सांगते, शुगर नियंत्रणाचा एक खास फंडा, तिने स्वत:ची शुगर ‘अशीच’ केली कंट्रोल काही दिवसात

Samantha Ruth Prabhu Diabetes Tips : अलिकडेच प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभुने एका मुलाखतीत तिच्या डाएटबाबत एक गोष्ट सांगितली आहे. ज्याचा संबंध शुगर लेव्हल कंट्रोलशी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 15:58 IST2025-08-28T15:10:21+5:302025-08-28T15:58:46+5:30

Samantha Ruth Prabhu Diabetes Tips : अलिकडेच प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभुने एका मुलाखतीत तिच्या डाएटबाबत एक गोष्ट सांगितली आहे. ज्याचा संबंध शुगर लेव्हल कंट्रोलशी आहे.

Smantha Ruth Prabhu tells her unique way of controlling blood sugar | सामंथा रुथ प्रभु सांगते, शुगर नियंत्रणाचा एक खास फंडा, तिने स्वत:ची शुगर ‘अशीच’ केली कंट्रोल काही दिवसात

सामंथा रुथ प्रभु सांगते, शुगर नियंत्रणाचा एक खास फंडा, तिने स्वत:ची शुगर ‘अशीच’ केली कंट्रोल काही दिवसात

Samantha Ruth Prabhu Diabetes Tips : डायबिटीस हा एक जगभरात गंभीर आजार झाला आहे. ज्यात ब्लड शुगर कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं. समजा जर ब्लड शुगर कंट्रोल केली गेली नाही तर यामुळे हृदरोग, नर्व डॅमेज, किडनी फेलिअर आणि डोळ्यांसंबंधी समस्या होतात. इतकंच नाही तर शरीरातील जवळपास सगळ्याच अवयवांवरही प्रभाव पडतो. त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. शुगर  जर वाढलेली असेल तर संतुलित आणि योग्य आहार खूप महत्वाचा ठरतो. 

अलिकडेच प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभुने (Samantha Ruth Prabhu) एका मुलाखतीत तिच्या डाएटबाबत एक गोष्ट सांगितली आहे. ज्याचा संबंध शुगर लेव्हल कंट्रोलशी (Sugar Level) आहे. ती ही डाएट शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करते. सामंथा म्हणाली की, "मी ब्लड ग्लूकोज मॉनिटर लावलं होतं आणि त्यात दिसलं की, हेल्दी खाणं-पिणं करूनही शुगर लेव्हल वाढत आहे. तेव्हा मी खाण्याचा क्रम म्हणजेच मील सीक्वेंसिंगवर (Meal Sequencing) अधिक लक्ष दिलं.

'मील सीक्वेंसिंग' म्हणजे काय?

आपण जे खातो त्याचा आपल्या शरीरावर प्रभाव पडतो, पण सोबतच हेही महत्वाचं आहे की, आपण कसं खातो. मील सीक्वेंसिंग यासाठीच महत्वाचं आहे. म्हणजे यात अशा पद्धतीनं खाल्लं जातं की, शुगर लेव्हल अचानक न वाढता हळूहळू वाढते.

कसं करावं प्लॅनिंग?

- हिरव्या पालेभाज्या जसे की, पालक, भेंडी, ब्रोकली इत्यादी भाज्यांनी आपल्या जेवणाची सुरूवात करा. कारण यातून आपल्याला फायबर भरपूर मिळतं आणि शुगर लेव्हल मेन्टेन राहते.

- भाज्यांनंतर अंडी, डाळी किंवा सोयासारख्या गोष्टी खाव्यात, ज्यातून आपल्याला प्रोटीन मिळेल. यानं कार्ब्सवर हळूहळू प्रभाव पडतो.

- आहाराच्या नियमात सगळ्यात शेवटी कार्ब्स घ्या. चपाती, भात, बटाटे अशा गोष्टी शेवटी खाव्यात. यामुळे ब्लड शुगर अचानक वाढणार नाही.

फायबर आणि प्रोटीन आधी खाल्ल्यानं पोट लवकर भरतं, ज्यामुळे ओव्हरईटिंग टाळलं जातं. खाण्याचा क्रम जर योग्य ठेवला तर शरीराला पोषक तत्वही अधिक मिळतात. कॅलरी कमी असलेले पदार्थ खाल्ले तर वजन कमी करण्यास मदत मिळते. ज्यामुळे डायबिटीसचा धोकाही टळतो.

Web Title: Smantha Ruth Prabhu tells her unique way of controlling blood sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.