रात्रीची झोप शांत, गाढ आणि व्यवस्थित पूर्ण होणं हे आपल्या एकूणच आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असते. झोपताना छान, व्यवस्थित झोप लागावी म्हणून प्रत्येकजण आपल्याला अगदी कम्फर्टेबल असणाऱ्या पोझिशनमध्ये झोपणेच पसंत करतात. प्रत्येकाच्या झोपेशी संबंधित वेगवेगळ्या सवयी आणि पोझिशन असतात. परंतु आपल्यापैकी अनेकांना एक अनोखी सवय असते, ती म्हणजे, थंडी असो किंवा नसो, पांघरूण पूर्ण अंगावर न घेता, एक पाय नेहमी पांघरूणाबाहेर ठेवणे! जगभरातील लाखो लोक झोपताना असे करतात(sleeping with one leg outside blanket meaning).
तुम्ही कधी विचार केला आहे का, असे का होते? ही फक्त एक सवय आहे की यामागे काही वैज्ञानिक कारण दडलेले आहे? अनेकांना ही गोष्ट खूप छोटी वाटते, पण आपली झोप आरामदायक करण्यात या एका छोट्या सवयीचा खूप मोठा वाटा असतो. डॉक्टर शीतल गोयल (सल्लागार न्यूरोलॉजिस्ट, वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल) सांगतात की, ही एक नॉर्मल झोपण्याची पद्धत आणि एक उत्कृष्ट असा स्लीप हॅक आहे, ज्यामुळे कोणत्याही प्रयत्नाशिवाय आपल्याला शांत व गाढ झोप लागते. रात्री झोपताना आपला पाय पांघरूणाबाहेर का जातो, या मागचं नेमकं खरं कारण काय आहे ते पाहूयात.
रात्री पांघरुणाबाहेर एक पाय ठेवून झोपता मग...
१. शरीराचे तापमान राहते नियंत्रित :- आपल्या पायांमध्ये खास प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात, ज्या शरीरातील अतिरिक्त उष्णता त्वरीत बाहेर काढतात. जेव्हा शरीर पांघरूणाखाली गरम होते, तेव्हा ह्या रक्तवाहिन्या अॅक्टिव्ह होतात आणि शरीराचे तापमान संतुलित करण्यास मदत करतात.
२. कुलिंग इफेक्ट :- एक पाय बाहेर काढताच, पायाची त्वचा थंड हवेच्या संपर्कात येते आणि ती शरीरातील उष्णता वेगाने बाहेर काढते. यामुळे शरीराचे तापमान लगेच कमी होते. हे ते तापमान असते, ज्यावर शरीराला झोप लागणे सोपे जाते. आपल्या मेंदूला झोप लागण्यासाठी शरीराचं तापमान विशिष्ट पातळीपर्यंत कमी होणं आवश्यक असतं आणि ते कमी करण्यासाठी शरीर एक पाय बाहेर काढून तापमान नियंत्रित करतं.
३. झोपेचा थेट मेंदूपर्यंत संकेत :- शरीरातील तापमान थोडे कमी होताच, मेंदूला लगेच ही झोपेची वेळ असल्याचा संकेत मिळतो आणि तो शांत झोपेच्या स्तिथीत जातो. हेच कारण आहे की, पाय बाहेर काढताच झोप लवकर आणि गाढ लागते.
४. मेलाटोनिन हार्मोन्सचे वाढते प्रमाण :- कूलिंग इफेक्टमुळे आपल्या शरीरात मेलाटोनिन हार्मोन तयार होण्यास मदत मिळते. हा तोच हार्मोन आहे, जो आपल्या शरीराचे बॉडी क्लॉक व्यवस्थित सेट करतो आणि रात्रीच्या वेळी शरीराला आराम देतो.
५. उष्णता आणि आरामाचा परिपूर्ण समतोल :- संपूर्ण शरीर पांघरूणात असल्यास गुदमरल्यासारखे किंवा जास्त गरम वाटते, परंतु एक पाय बाहेर ठेवल्याने शरीर उष्णता आणि शीतलता यांच्यात एक परिपूर्ण संतुलन साधते, यालाच 'थर्मल बॅलन्स' म्हणतात. हा समतोलच चांगल्या झोपेसाठी सर्वात आवश्यक घटक आहे. ही केवळ एक सवय नसून, शरीराची नैसर्गिक स्लीप - सिस्टम आहे.
डॉक्टर गोयल सांगतात की, पांघरूणातून एक पाय बाहेर काढणे ही एक अगदी नैसर्गिक पद्धत आहे, ज्याद्वारे शरीर तापमान नियंत्रित करून चांगली झोप घेते. विशेषत: ज्या महिलांना रात्री जास्त गरम होते, वारंवार झोप तुटते, अस्वस्थता किंवा रेस्टलेसनेस जाणवतो आणि झोपायला जास्त वेळ लागतो, त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एक पाय पांघरुणा बाहेर काढाल, तेव्हा समजून घ्या की तुमचे शरीर स्वतःला निरोगी आणि गाढ झोपेसाठी स्मार्ट पद्धतीने तयार करत आहे.
Web Summary : Sleeping with a leg out regulates body temperature for better sleep. Blood vessels in feet release heat, cooling the body and signaling the brain for sleep. This also boosts melatonin, promoting restful sleep by balancing body heat.
Web Summary : एक पैर बाहर रखकर सोने से शरीर का तापमान नियंत्रित होता है, जिससे बेहतर नींद आती है। पैरों की रक्त वाहिकाएं गर्मी छोड़ती हैं, जिससे शरीर ठंडा होता है और मस्तिष्क को नींद का संकेत मिलता है। इससे मेलाटोनिन भी बढ़ता है, जिससे शरीर को आराम मिलता है।