आजच्या वेगवान युगात आपण कामाच्या व्यापात किंवा स्क्रीनच्या मोहात अनेकदा एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, ती म्हणजे 'झोप'. रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी लवकर उठणे ही जणू लाइफस्टाईलची एक सवयच बनली आहे. आजच्या धावपळीच्या आणि सततच्या बदलत्या लाईफस्टाईलमधील कामाचा ताण, मोबाईलचा अतिवापर आणि अनियमित दिनचर्या यामुळे अनेकांना पुरेशी झोप मिळत नाही. पण झोपेची कमतरता ही केवळ थकवा किंवा आळसापुरती मर्यादित राहत नाही, तर ती हृदयविकारासारख्या गंभीर समस्यांना आमंत्रण देऊ शकते(effects of sleep deprivation on heart).
संशोधनानुसार, झोप पूर्ण न झाल्यास रक्तदाब वाढणे, हार्मोन्सचे संतुलन बिघडणे, वजन वाढ, मधुमेहाचा धोका आणि हार्ट अॅटॅकचा धोका देखील वाढू शकतो. ज्या लोकांची झोप पूर्ण होत नाही, त्यांच्यामध्ये हार्ट अटॅक (Heart Attack) आणि हृदयविकाराचा धोका इतरांच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त असतो. अपुरी झोप केवळ थकवा किंवा चिडचिड निर्माण करत नाही, तर ती उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देते. झोपेच्या कमतरतेमुळे आपल्या (lack of sleep heart attack) शरीरात असे नेमके काय बदल होतात की ज्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो? ते पाहूयात...
सकाळी उठल्यावर जाणवणारा थकवा आपण कॉफी पिऊन किंवा दुर्लक्ष करून झटकून टाकतो, पण ही साधी वाटणारी सवय तुमच्या आयुष्यावर बेतू शकते. सततची अपुरी झोप (sleep deprivation and heart attack risk) तुमच्या शरीराला आतून पोखरीत असते आणि याचा सर्वाधिक फटका तुमच्या हृदयाला बसतो.
झोपेची कमतरता आणि हृदयाचे आरोग्य यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी 'आकाश हेल्थकेअर'च्या कार्डियोलॉजी विभागाच्या सीनियर कंसल्टेंट आणि युनिट हेडच्या डॉ. सुकृती भल्ला (Dr. Sukriti Bhalla) यांनी अधिक माहिती एका संकेतस्थळाला दिली आहे. डॉ. भल्ला यांच्या मते, "जर तुमची झोप सातत्याने अपुरी राहत असेल, तर तुमच्या हृदयाच्या आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळे कमी झोप येण्याच्या समस्येकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका."
डॉ. सुकृती भल्ला यांच्या मते, “आपण जेव्हा झोपतो, तेव्हा आपले शरीर स्वतःची दुरुस्ती (Repair) करत असते आणि विशेषतः हृदयाची दुरुस्ती याच काळात होते. म्हणूनच प्रत्येकाने दररोज ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. झोपेच्या दरम्यान आपल्या हृदयाचे ठोके मंदावतात आणि रक्तदाब (Blood Pressure) कमी झाल्यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो.”
अपुरी झोप म्हणजे 'स्ट्रेस हार्मोन्स' वाढीला निमंत्रण...
डॉ. सुकृती भल्ला यांच्या मते, आपण जेव्हा झोपतो, तेव्हा आपले शरीर स्वतःची दुरुस्ती करत असते आणि विशेषतः हृदयाची दुरुस्ती याच काळात होते. म्हणूनच प्रत्येकाने दररोज ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. झोपेच्या दरम्यान आपल्या हृदयाचे ठोके मंदावतात आणि रक्तदाब कमी झाल्यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. पुढे त्या सांगतात की, “जर एखाद्या व्यक्तीची झोप केवळ ५ ते ६ तासांचीच होत असेल, तर शरीर या परिस्थितीचा स्ट्रेस घेते. यामुळे शरीरातील 'कोर्टिसोल' आणि 'ॲड्रेनालिन' यांसारख्या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी सतत वाढू लागते. या वाढलेल्या पातळीमुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि हृदयावर सतत ताण निर्माण होतो. सातत्याने झोप पूर्ण न झाल्यामुळे कालांतराने हार्ट अटॅकचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो.
अपुऱ्या झोपेमुळे वाढतो रक्तदाबाचा धोका...
डॉ. सुकृती यांच्या मते, सामान्यतः झोपेत असताना आपला रक्तदाब कमी होतो, ज्याला वैद्यकीय भाषेत 'नाईट-टाइम डिप' (Night-time Dip) असे म्हणतात. हा काळ हृदयासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो कारण याच वेळी हृदयाला थोडा ब्रेक किंवा आराम मिळतो. जर तुमची झोप पूर्ण झाली नाही, तर रक्तदाब सतत वाढलेला राहतो. यामुळे रक्तवाहिन्यांचे हळूहळू नुकसान होऊ लागते आणि याच नुकसानामुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळे किंवा प्लाक जमा होण्यास सुरुवात होते.
झोपेच्या कमतरतेमुळे मधुमेहाचा धोका...
डॉ. सुकृती पुढे सांगतात की, झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीरात 'इन्सुलिन रेझिस्टन्स' वाढतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत नाही आणि टाईप-२ मधुमेहाचा धोका वाढतो. सहसा लोक मधुमेहाचा हृदयाशी थेट संबंध जोडत नाहीत, पण खरं हे आहे की मधुमेह हा हार्ट अटॅकचा सर्वात मोठा 'रिस्क फॅक्टर' आहे. कारण मधुमेहामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे सर्वाधिक नुकसान होते.
अपुऱ्या झोपेमुळे शरीरात सूज येण्याचा आणि ब्लॉकेजचा धोका...
डॉ. सुकृती यांच्या मते, झोप कमी मिळाल्यामुळे शरीरात दीर्घकालीन सूज वाढते. ही सूज वरून दिसत नसली तरी ती शरीराच्या आतल्या भागात असते. अशा प्रकारे सूज आल्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतील नाजूक पदराला गंभीर इजा पोहोचते. अनेकदा अशाप्रकारे सूज आपल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याची प्रक्रिया अत्यंत वेगवान होते.
शांत व निरोगी झोपेसाठी नेमकं काय करावं ?
१. दररोज रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची एक निश्चित वेळ ठरवा. यामुळे शरीराचे नैसर्गिक चक्र सुरळीत राहते.
२. झोपण्यापूर्वी लॅपटॉप किंवा मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळा. झोपण्याच्या किमान ३० मिनिटे आधी सर्व डिजिटल उपकरणांपासून दूर राहा.
३. रात्री उशिरा चहा किंवा कॉफी पिणे टाळा. कॅफिनमुळे मेंदू उत्तेजित होतो आणि शांत झोप लागत नाही.
४. मनावरचा ताण कमी करण्यासाठी दररोज योगासने किंवा ध्यान करा. यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.
Web Summary : Lack of sleep raises stress hormones, blood pressure, and insulin resistance, increasing the risks of heart attack, diabetes, and stroke. Prioritize 7-8 hours sleep for heart health.
Web Summary : नींद की कमी से तनाव हार्मोन, रक्तचाप और इंसुलिन प्रतिरोध बढ़ता है, जिससे दिल का दौरा, मधुमेह और स्ट्रोक का खतरा बढ़ जाता है। हृदय स्वास्थ्य के लिए 7-8 घंटे की नींद को प्राथमिकता दें।