Join us   

रोज सकाळी पोट साफ होत नाही, अस्वस्थ वाटतं? तज्ज्ञ सांगतात, कॉन्स्टिपेशन टाळण्यासाठी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 12:52 PM

Simple Remedies To Relieve Constipation : घरातल्या सगळ्यांचं पोट साफ होतं, तुमचं नाही? सकाळीच नाही तर दिवसातून कधीही एकदा गेलात तरी चालतं का...

सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत नाही अशी तक्रार अनेकांची असते. खाण्यात बदल झाला किंवा गॅसचा त्रास होत असेल तर सकाळी पोटाचे त्रास होतात. (Constipation Home Remedies) तर काहीजणांना दिवसभरात कधीही शौचास जाण्याची सवय असते. आपलं पोट सकाळच्यावेळी साफ का होत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. आयुर्वेदीक डॉक्टर रेखा राधामनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Simple Remedies To Relieve Constipation)

सकाळी पोट साफ होणं गरजेचं आहे का?

डॉक्टर रेखा राधामनी यांच्यामते जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत शौचायलात जात असाल तर  ही सवय शरीराची चांगली आहे. कारण यामुळे कोलन स्वच्छ आणि रिकामे होते. पण जर तुमचं सकाळच्यावेळी पोट साफ होत नसेल हे अत्यंत सामान्य आहे. कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. घरातील इतर व्यक्ती सकाळी शौचास जात असतील आणि तुम्ही सकाळच्यावेळी जात नसाल तर स्वत:ची तुलना इतरांबरोबर करू नका. यात टेंशन घेण्यासारखं काहीच नाही.

पोट साफ होण्यासाठी उपाय

१) भरपूर पाणी प्या

भरपूर पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर निघतात आणि शरीर हायड्रेट राहते. पचनक्रिया देखील चांगली राहते. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यानं मल बाहेर पडण्यास मदत होते. याशिवाय शरीर डिटॉक्स होतं.

२) मिठाचं पाणी

एक ग्लास कोमट पाण्यात 2-3 चिमूट गुलाबी मीठ किंवा समुद्री मीठ मिसळा आणि ते रिकाम्या पोटी प्या. यामुळे पोट साफ होण्यास  मदत होईल.

३) मध आणि लिंबू पाणी

पोट साफ होण्यासाठी सकाळी एक  चमचा मधासह लिंबू पाणी प्या. हे एक नैसर्गिक ड्रिंक आहे. यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते. वजन कमी होण्यासही मदत होते. लिंबाची औषधी गुणधर्म पोटातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात.

पोट, कंबरेच्या टायर्समुळे शरीर जाडजूड दिसतंय? घरी हे १ योगासनं करा-चरबी भराभर होईल कमी

५) आलं

पोट साफ होण्यासाठी आलं एक असरदार उपाय आहे. यात एंटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे कोलनची सूज कमी होते. आणि कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका टळतो.

६) पुदिना

पुदिन्याचे सेवन केल्याने पोटाची सूज आणि पोटदुखी कमी होते. याचे रोज सेवन केल्याने पोट साफ होण्यास मदत होते.

तब्येतीसाठी वरदान आहेत ५ साधेसोपे फूड कॉम्बिनेशन्स, रोज खा, पोट कमी होईल- राहा नेहमी निरोगी

७) हिंग

हिंग प्रत्येकाच्याच घरी असते. पोट साफ होण्यासाठी एक ग्लास गरम पाण्याच एक चमचा हिंग पावडर घालून याचे सेवन करा किंवा वरणाला, भाजीला फोडणी देताना तुम्ही हिंग वापरू शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य