lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गोरं होण्याच्या वेडापायी किडनी खराब होऊ शकते, बघा फेअरनेस क्रीम लावण्याचे धोके

गोरं होण्याच्या वेडापायी किडनी खराब होऊ शकते, बघा फेअरनेस क्रीम लावण्याचे धोके

Side Effects Of Using Fairness Cream: गोरं होण्यासाठी फेअरनेस क्रीमचा मोह करणं सोडा. कारण ते तुमच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतं, असं नुकत्याच एका अभ्यासात सिद्ध झालं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2024 07:42 PM2024-04-18T19:42:37+5:302024-04-18T19:43:30+5:30

Side Effects Of Using Fairness Cream: गोरं होण्यासाठी फेअरनेस क्रीमचा मोह करणं सोडा. कारण ते तुमच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतं, असं नुकत्याच एका अभ्यासात सिद्ध झालं आहे.

Side effects of using fairness cream, study says fairness cream affects on kidney functioning | गोरं होण्याच्या वेडापायी किडनी खराब होऊ शकते, बघा फेअरनेस क्रीम लावण्याचे धोके

गोरं होण्याच्या वेडापायी किडनी खराब होऊ शकते, बघा फेअरनेस क्रीम लावण्याचे धोके

Highlightsकोणतंही फेअरनेस क्रिम लावण्यापुर्वी १० वेळा विचार करा. गोरं होण्यापेक्षा आरोग्य महत्त्वाचं हे मुलींना समजलंच पाहिजे.

गोरी मुलगी जन्माला आली की तिच्या आईबाबांनाही कसं तिला जन्म दिल्याचं सार्थक वाटतं. लग्नासाठी मुली बघतानाही अजूनही बऱ्याच मुलांच्या अपेक्षांमध्ये 'मुलीचा रंग गोरा पाहिजे' असं लिहिलेलं असतं. गोरं होण्याचा सगळ्या समाजानेच घेतलेला ध्यास मुलींच्या मनावर बालपणापासूनच खूप खोलवर परिणाम करत जातो. आणि म्हणूनच तर त्यांना त्यांच्या सावळ्या, गव्हाळ रंगाचा तिटकारा वाटून गोरं व्हावं वाटतं. या नादात फेअरनेस क्रिमचा मारा चेहऱ्यावर केला जातो. पण आता नुकत्याच एका संशोधनात अशा पद्धतीचं क्रीम वापरणं मुलींच्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतं, हे समोर आलं आहे. (fairness cream affects on kidney functioning)

 

मेडिकल जर्नल किडनी इंटरनॅशनल या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार फेअरनेस क्रीममध्ये पारा मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे किडनी खराब होण्याचा धोका आहे.

कॉपर टी बसवायची भीती वाटते? डॉक्टर सांगतात, कॉपर टी बसवा- गैरसमज विसरा कारण..

एवढेच नाही तर फेअरनेस क्रीमच्या वाढत्या वापरामुळे मेम्ब्रेन्स नेफ्रोपॅथी या आजाराचे रुग्णही वाढले आहेत. या आजारामध्ये मेंदूमध्ये रक्ताची गुठळी होते आणि मेंदूमधून रक्त वाहून जाण्यास अडथळा येतो. यामुळे रक्तपेशी तुटल्या जाण्याची आणि रक्तस्त्राव होण्याची भीती असते.

 

संशोधकांच्या मते फेअरनेस क्रिममधील पारा त्वचेतून किडनीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे किडनीची फिल्टरिंग क्षमता खराब होते आणि लघवीमधून अधिक प्रमाणात प्रथिने बाहेर पडून जातात.

एका लग्नाची महागडी गोष्ट- बायकोच्या मैत्रिणीच्या लग्नात झाला ४ लाखांचा खर्च, वैतागलेला नवरा म्हणतोय...

फेरनेसक्रीम बाबत तात्काळ परिणामांचा दावा केला जातो. पण त्याची किती मोठी किंमत मोजा मोजावी लागू शकते हे त्याचा वापर करणाऱ्यांना माहितीच नाही अशी प्रतिक्रिया संशोधक सजिश शिवदास देतात. त्यामुळे कोणतंही फेअरनेस क्रिम लावण्यापुर्वी १० वेळा विचार करा. गोरं होण्यापेक्षा आरोग्य महत्त्वाचं हे मुलींना समजलंच पाहिजे. 

 

Web Title: Side effects of using fairness cream, study says fairness cream affects on kidney functioning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.