मोबाईल, लॅपटॉप सोबतच इअरफोन, हेडफोन देखील आपल्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनले आहे. आजकाल बहुतेक सगळ्यांच्याच्या गळ्यात आणि कानांत इअरफोन अडकवलेले दिसतात. दिवसांतील बरेच (side effects of heavy uses of earphone know 60-60 formula of to save ear) तास आपण या इअरफोनचा सतत वापर करतो. आपल्यापैकी बहुतेकजण गाणी ऐकण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी हेडफोन किंवा इअरफोन वापरतात, जे खरंतर खूप धोकादायक आहे. याचा दीर्घकाळ वापर केल्याने कानांना इजा होण्याबरोबरच ऐकण्याची क्षमताही कमी होते(Harmful Effects Of Listening Music With Earphones).
बदलत्या जीवनशैलीमुळे आपण सगळेच हेडफोन, इअरफोन आणि इअरबडवर खूप अवलंबून आहोत. गाडी चालवताना असो किंवा घरात काम करत असताना, लोक जास्त वेळ कानात इअरफोन लावून ठेवतात, ज्याचा थेट परिणाम आरोग्यासोबतच, कान आणि ऐकण्याच्या क्षमतेवर देखील होतो. इअरफोनच्या वापरामुळे काय नुकसान (Long use of earbuds may lead to hearing loss, warn doctors) होते व त्यापासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय आहेत, ते जाणून घेऊयात.
१. इअरफोन वापरण्याचा खास ६० - ६० फॉर्म्युला कोणता ?
इअरफोन वापरताना त्याचा थेट परिणाम आरोग्यासोबतच, कान आणि ऐकण्याच्या क्षमतेवर देखील होतो. यासाठीच इअरफोन वापरताना ६० - ६० फॉर्म्युला कायम फॉलो करावा. या नियमानुसार, इअरफोन/हेडफोन वापरताना, त्याचा आवाज जास्तीत जास्त ६० % इतकाच ठेवावा. याशिवाय, तुम्ही सलग फक्त ६० मिनिटेच इअरफोन कानांवर लावून ठेवू शकता. ६० मिनिटांपेक्षा दीर्घकाळ इअरफोन कानांवर लावून ठेवणे धोकादायक ठरु शकते.
ऑफिसमधून दमून आल्यावर, सायंकाळी अंगात त्राण नसतात? थकवा फार? 'हा' उपाय करा, ५ मिनिटांत रिफ्रेश...
'छावा' साठी विकी कौशलने केलं प्रोटीन रिच डाएट, पाहा त्यानं नेमकं काय काय खाल्लं...
मोठ्या आवाजात ईअरफोन लावून ऐकण्याचे तोटे...
१. गरजेपेक्षा जास्त वेळ हेडफोन किंवा इअरफोनचा वापर केल्यास आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. बराच काळ हेडफोन्स लावून गाणी ऐकल्यास व्यक्तीचे कान सुन्न अथवा बधीर होऊ शकतात.
२. हेडफोन किंवा इअरफोन यांचा अतिवापर हा आपल्या कानांसाठी हानिकारक ठरतोच, पण त्याचा आपल्या हृदयावरही परिणाम होतो. मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने हृदयावर वाईट परिणाम होतो. यामुळे कर्करोगाचा धोका देखील वाढतो. जास्त वेळ इअरफोन वापरल्याने तुमच्या कानाच्या पडद्यावर परिणाम होतो. ज्यामुळे तुम्हाला कानात वेदना देखील होऊ शकतात. कारण खूप मोठ्या आवाजात इअरफोन कानात लावून ऐकल्याने कानावर दबाव पडतो.
३. डॉक्टरांच्या मते, इअरफोनच्या अतिवापरामुळे कानात वेगवेगळे आवाज येणे, चक्कर येणे, झोप न येणे अशी अनेक लक्षणे दिसू लागतात. आपल्या कानांची श्रवण क्षमता केवळ ९० डेसिबल असते, जी हळूहळू ४० ते ५० डेसिबलपर्यंत कमी होत जाते.
४. ऑफिसमध्ये किंवा घरी गाणी ऐकताना तुम्ही तुमचे इअरफोन्स एकमेकांशी शेअर करत असाल तर तसे करणे टाळावे. इअरफोन शेअरिंग केल्याने आपल्या कानात संसर्ग होण्याचा धोका खूप वाढतो.
५. तासंतास हेडफोन वापरल्याने कानात घाण जमा होते. एक तास हेडफोन वापरल्याने कानात ७०० पटीने बॅक्टेरिया जमा होते. जे कान आणि मेंदूच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे कानात इन्फेक्शन, ऐकण्यात अडचण अशी समस्या छळू शकते.