Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > केसांना हेअर डाय लावून विकत घेताय कॅन्सरचं दुखणं! १ चूक पडेल महागात - वेळीच व्हा सावध...

केसांना हेअर डाय लावून विकत घेताय कॅन्सरचं दुखणं! १ चूक पडेल महागात - वेळीच व्हा सावध...

side effects of hair color : does hair dye cause cancer : hair dye side effects on health : hair color and cancer risk : हेअर डाय मधील विषारी केमिकल्समुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका खरच वाढतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2025 14:58 IST2025-10-16T14:47:46+5:302025-10-16T14:58:29+5:30

side effects of hair color : does hair dye cause cancer : hair dye side effects on health : hair color and cancer risk : हेअर डाय मधील विषारी केमिकल्समुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका खरच वाढतो का?

side effects of hair color does hair dye cause cancer hair dye side effects on health hair color and cancer risk | केसांना हेअर डाय लावून विकत घेताय कॅन्सरचं दुखणं! १ चूक पडेल महागात - वेळीच व्हा सावध...

केसांना हेअर डाय लावून विकत घेताय कॅन्सरचं दुखणं! १ चूक पडेल महागात - वेळीच व्हा सावध...

आजकाल वयाच्या आधीच केस पांढरे होण्याची समस्या खूपच वाढली आहे. ऑफिस, पार्टी किंवा सोशल फंक्शनमध्ये केस पांढरे दिसू नयेत म्हणून अनेकजण दर महिन्याला किंवा अमुक आठवड्यांनी केसांना हेअर डाय लावतात. सुरुवातीला यामुळे केस आकर्षक आणि खूपच सुंदर दिसतात, पण या रंगांच्या वारंवार वापरामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. बाजारात अनेक प्रकारचे हेअर डाय उपलब्ध असले तरी, त्यांच्यातील रासायनिक घटक त्वचा आणि आरोग्यासाठी हानिकारक असतात(hair color and cancer risk).

बाजारात मिळणाऱ्या बहुतांश हेअर डायमध्ये अमोनिया, पीपीडी, हायड्रोजन पेरॉक्साइड यांसारखी रसायने असतात. ही रसायने सतत टाळूवर आणि त्वचेवर संपर्कात आल्यास त्वचारोग, ॲलर्जी, हार्मोनल असंतुलन यासोबतच कॅन्सरचा धोका वाढवतात, असे संशोधन सांगते. केसांना वारंवार रंग लावल्याने केस आणि स्काल्पचे आरोग्य तर बिघडतेच, पण त्यातील काही विषारी केमिकल्समुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका खरच वाढतो का? हे कितपत खरं की खोट ते पाहूयात... 

वारंवार केसांसाठी रंग आणि हेअर डाय वापरल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका... 

"अमेरिकन कॅन्सर सोसायटीने (American Cancer Society) 'Hair Dyes and Cancer Risk' या संशोधनात हेअर डाय आणि विशेषतः रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिया, लिम्फोमा), मूत्राशयाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग इत्यादींमध्ये संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

याव्यतिरिक्त, हार्वर्ड हेल्थ ब्लॉगने (Harvard Health Blog: Do hair dyes increase cancer risk?) मध्ये हे सांगितले आहे की, अनेक अभ्यासातून हे सांगितले आहे की, सतत केसांवर हेअर डाय वापरल्याने सर्व प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो, परंतु बेसल सेल कार्सिनोमा (Basal Cell Carcinoma) सारख्या काही त्वचेच्या कर्करोगांमध्ये (स्किन कॅन्सरमध्ये) किरकोळ वाढ होण्याची शक्यता दिसून आली. याव्यतिरिक्त, इतर अनेक संशोधनांमध्ये (Research) असा उल्लेख आहे की, ज्या महिला परमनंट हेअर डाय (Permanent Hair Dye) वापरतात, त्यांच्यात स्तनांच्या कर्करोगाचा धोका जवळपास ९० टक्क्यांनी अधिक होता.

तूप खाऊन पोटाची ढेरी होईल कमी! दिसेल परफेक्ट फिगर - चुकवू नका तूप खाण्याची 'ही' पद्धत... 

हेअर डाय आणि केसांच्या कलरमध्ये पॅराफेनिलिन डायमाइन (Paraphenylenediamine), अमोनिया (Ammonia), हायड्रोजन पेरोक्साइड (Hydrogen Peroxide) आणि अनेक प्रकारचे ॲरोमॅटिक अमाइड्स (Aromatic Amides) यांसारखी रसायने (Chemicals) भरपूर प्रमाणात असतात, जी आपल्या स्काल्पमधून थेट रक्तप्रवाहात पोहोचू शकतात. यामुळे केसांचे इतर अनेक प्रकारे नुकसान होते, जसे की केस गळणे आणि तुटणे, स्काल्पची जळजळ होणे आणि ॲलर्जीचा धोका, केस पातळ होणे, केसांची घनता कमी होणे आणि केसांच्या रचनेत बदल होणे अशा समस्या उद्भवतात. 

पोट साफ न होण्याची चिंता सोडा! 'हे' जादुई पान रात्री चावून खा - आजीबाईच्या बटव्यातील खास उपाय... 

या समस्येपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे ? 

जर तुम्हाला या समस्येपासून स्वतःचा बचाव करायचा असेल, तर यासाठी केसांवर वारंवार रंग वापरणे टाळा. जेव्हा खरच खूप गरज असेल तेव्हाच याचा उपयोग करा. शक्य असल्यास, दर महिन्यांला केसांना कलर करू नका. अमोनिया फ्री आणि हर्बल कलरचा वापर करा. कलर करतेवेळी चांगले ग्लोव्ह्ज आणि ब्रशचा वापर करा, जेणेकरून हे रासायनिक मिश्रण आपली त्वचेवर लागणार नाही. केसांना कलर केल्यानंतर ते चांगले धुवा आणि मॉइश्चरायझरचा वापर करा.

Web Title : हेयर डाई से कैंसर का खतरा: इस गलती से रहें सावधान!

Web Summary : अमोनिया जैसे रसायनों वाली हेयर डाई के बार-बार इस्तेमाल से कैंसर का खतरा बढ़ता है, शोध कहता है। उपयोग सीमित करें, अमोनिया-मुक्त डाई चुनें और संभावित नुकसान को कम करने के लिए लगाते समय त्वचा की रक्षा करें।

Web Title : Hair dye linked to cancer risk: Be cautious of this mistake!

Web Summary : Frequent hair dyeing, with chemicals like ammonia, raises cancer risks, says research. Limit use, opt for ammonia-free dyes, and protect skin during application to minimize potential harm.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.