Join us   

उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा उभं राहून पाणी पिता? ४ दुष्परिणाम; सांधेदुखी ते किडनीला त्रास; आरोग्य बिघडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2024 1:10 PM

Side effects of drinking water while standing : उभं राहून पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक? नक्की खरं काय?

आपल्या शरीरासाठी पाणी आवश्यक (Summer Health Tips). शरीरातील निम्मे आजार पुरेसे पाणी प्यायल्याने कमी होतात. पाणी पिणं जरी महत्त्वाचं असलं तरी हे पाणी तुम्ही कसे पिता यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे (Drinking Water). अनेकांना बसून पाणी पिण्याची सवय असते (Health Tips). तर काहींना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. पण ही सवय शरीराला आतून नुकसान पोहचवते.

बऱ्याचदा आपल्याला प्रचंड तहान लागते. तेव्हा आपण उभं राहूनच पाणी पितो. पण उभं राहून पाणी पिण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. आपण वडीलधाऱ्यांकडून ऐकलं असेल की, उभं राहून पाणी पिऊ नये, पण खरंच उभं राहून पाणी पिण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत का? उन्हाळ्यात उभं राहून प्यावं की नाही?(Side effects of drinking water while standing).

उन्हाळ्यात उभं राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम

किडनीच्या निगडीत समस्या

द हेल्थसाईट.कॉम या वेबसाईटनुसार, आपल्याला किडनीच्या निगडीत समस्या असेल तर, उभं राहून पाणी पिणे टाळा. उभे राहून पाणी पिणे तुमच्या मूत्रपिंडाला हानी पोहोचवू शकते आणि म्हणून आरामात हळू हळू बसून पाणी प्या.

वडिलांचे निधन, आई सोडून गेली, १० वर्षाचे लेकरू विकतेय रोट्या..काय यावे वाट्याला त्याच्या..

सांध्याचे नुकसान

जर एखाद्याला गुडघे, नितंब किंवा कंबरदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यांनी उभे राहून पाणी पिऊ नये. उभे असताना पाणी प्यायल्याने सांध्यांवर अतिरिक्त दबाव पडतो, ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सांध्याचे आजार असलेल्यांनी आरामात बसून पाणी प्यावे.

फुफ्फुसांचे नुकसान

जर आपल्याला फुफ्फुसांच्या संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर, उभं राहून पाणी पिणे टाळा. उभे राहून पाणी प्यायल्यास ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो, ज्यामुळे फुफ्फुसांवर आणि हृदयाच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होतो.

खराब पचन

उभे राहून पाणी प्यायल्याने पोटात गॅस तयार होतो, पचनसंस्थेवर दबाव येतो आणि शरीरात पाण्याचे असंतुलन होते. त्यामुळे बसून हळू हळू पाणी प्यावे. पण जर आपण उभं राहून पाणी पीत असाल तर, पाणी पोटाच्या खालच्या भागात पोहोचते, ज्यामुळे पचनसंस्थेला हानी पोहोचते. त्यामुळे नेहमी बसून पाणी प्यावे.

उपाशीपोटी ३० मिनिटं रोज करा मॉर्निंग वॉक, ४ बदल - आयुष्यभरासाठी तब्येतीची तक्रारच संपेल

तहान पुन्हा - पुन्हा लागते

उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. उभे राहून पाणी प्यायल्याने तहान भागत नाही. त्यामुळे पुन्हा-पुन्हा तहान लागल्यास, उभं न राहता बसून आरामात पाणी प्या.

टॅग्स : पाणीसमर स्पेशलहेल्थ टिप्सआरोग्य