'लवकर निजे, लवकर उठे त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे' असं आपल्याकडे म्हटलं जातं. पण हल्ली त्याच्या अगदी उलट होत आहे. हा नियम अनेकांनी पुरता टोलवून लावला असून लवकर झोपणाऱ्यांकडे कुत्सित, तुच्छ नजरेने पाहिले जाते.. 'काय म्हातारा झालास का एवढ्या लवकर झोपायला' असं म्हणत लवकर झोपणाऱ्यांची मजा उडवली जाते. बरं रात्री जागरण करण्यासाठी या लोकांकडे काही खास कारण असतं असंही नाही.. उगाच सर्फिंग करत बसणे, सिनेमे पाहणे, सोशल मीडियावर टाईमपास करणे अशा वायफळ गोष्टींसाठी बहुसंख्य लोक जागरण करत बसतात आणि मग पुढच्या काही महिन्यांतच याचे गंभीर परिणाम शरीरावर दिसून यायला सुरुवात होते. याविषयीच खास माहिती सांगणारी पोस्ट डाॅ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अपुऱ्या झोपेमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम
१. अपचन, ॲसिडीटी वारंवार होणे, पोट साफ न होणे असे पचनाचे त्रास सुरू होतात.
२. रात्री जास्त जागरण करणाऱ्या लोकांच्या मेंदूला गरजेपुरता आराम मिळत नाही. त्यामुळे त्यांना विस्मरणाचा त्रास खूप लवकर सुरू होऊ शकतो.
उन्हाळ्यात जास्त घामामुळे मान- गळा काळवंडला? २ उपाय- टॅनिंग जाऊन त्वचा होईल स्वच्छ
३. जागरणाचा परिणाम पचन क्रियेसोबतच मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रियेवरही होतो. यामुळे मग वजन झपाट्याने वाढत जाते.
४. अपुऱ्या झोपेचा परिणाम तुमच्या हृदयावर होऊन कमी वयातच हृदय विकाराचा त्रासही होऊ शकतो.
या आजारांवर काय उपाय करता येईल?
डॉ. नेने सांगतात की तुम्हालाही अशीच जागरण करायची सवय असेल तर ही सवय लगेच सोडा. वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे एवढे एकच काम केल्याने तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात.
आल्याचा वापर फक्त चहासाठीच नको, 'असं' चेहऱ्याला लावा, ॲक्ने- पिंपल्स जाऊन त्वचा चमकेल
झोपेच्या वेळांमध्ये कुठेही तडजोड न करता वेळेवर झोपा. झोपण्याच्या आधी अजिबात स्क्रिन पाहू नका. कारण याचा वाईट परिणाम झोपेवर होतो. शांत झोप येत नाही. शांत, स्वच्छ ठिकाणी झोपा. कारण झोप चांगली होण्यासाठी या गोष्टीही अतिशय गरजेच्या आहेत.