उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देण्यासाठी 'दही' हे आपल्या प्रत्येकाच्या ताटातील अविभाज्य भाग आहे. बाहेर सूर्याचा पारा चढला की, मनाला आणि शरीराला फक्त एकाच गोष्टीची ओढ लागते, ती म्हणजे - 'थंडगार दह्याची वाटी'...उन्हाळ्यात दह्यासारखं दुसरं सुख नाही! दुपारच्या कडक उन्हातून घरी आल्यावर समोर थंडगार दह्याची वाटी दिसली की जीव भांड्यात पडतो(should you eat curd with sugar or salt in summer).
दही हे उन्हाळ्यातील 'सुपरफूड' आहे यात शंकाच नाही. दह्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते, पचन सुधारतं आणि उष्णतेमुळे होणारा त्रास कमी होतो. पण दही खाताना आपल्याला एक मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे दह्यात मीठ घालावं की साखर? अनेकजण चवीसाठी दह्यात मीठ घालून खाणं पसंत करतात, तर काहीजण ( best way to eat curd in summer) गोड दह्याचे चाहते असतात. पण उन्हाळ्याच्या सिझनमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी मीठ की साखर, नेमकं काय फायदेशीर आहे? कुणी म्हणतात मीठ पचनाला चांगलं, तर कुणी म्हणतात साखर थंडावा देते...परंतु उन्हाळ्यात दही (curd with salt or sugar in summer) खातांना त्यात चवीसाठी मीठ घालावं का साखर नेमकं काय फायदेशीर ते पाहूयात...
उन्हाळ्याच्या दिवसात 'दही' खाण्याचे ५ फायदे...
१. दही हे केवळ चविष्ट नसून ते पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी१२ मुबलक प्रमाणात असते. हे सर्व घटक हाडांच्या मजबुतीसाठी आणि शरीराच्या एकूण पोषणासाठी अत्यंत आवश्यक असतात.
२. कडक उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढते. अशावेळी दही खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो. दह्यामुळे पोटातील उष्णता कमी होते आणि दिवसभर शरीर फ्रेश राहण्यास मदत होते.
३. दह्यामध्ये 'प्रोबायोटिक्स' (Probiotics) म्हणजेच आरोग्यासाठी फायदेशीर असणारे 'गुड बॅक्टेरिया' असतात. हे बॅक्टेरिया आपली पचनसंस्था सुधारण्यास मदत करतात.
४. उन्हाळ्यात अनेकदा जड अन्नपदार्थ खाल्ल्यावर पचायला त्रास होतो. अशावेळी दही हा एक उत्तम पर्याय आहे. दही पचायला हलके असते आणि यामुळे अपचन किंवा ॲसिडिटीसारख्या समस्या वारंवार त्रास देत नाहीत.
५. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी कमी होते. दह्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे शरीरातील ओलावा टिकून राहतो आणि डिहायड्रेशनचा धोका कमी होतो.
दह्यात मीठ घालून खाण्याचे फायदे...
उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला मोठ्या प्रमाणात घाम येतो. या घामावाटे आपल्या शरीरातील मीठ (Sodium) आणि इलेक्ट्रोलाईट्स शरीराबाहेर टाकले जातात. यामुळे शरीरात थकवा जाणवणे किंवा डिहायड्रेशन होण्याचा धोका असतो. अशा वेळी दह्यात थोडे मीठ घालून खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. घामावाटे गेलेले नैसर्गिक क्षार आणि मीठ दह्यातील मिठामुळे पुन्हा शरीराला मिळतात. शरीरातील मिठाचे प्रमाण संतुलित राहिल्यामुळे उन्हाळ्यातील थकवा कमी होतो आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो. मिठासोबत दही खाल्ल्याने पाचक रस (Digestive Juices) ऍक्टिव्ह होतात, ज्यामुळे जड अन्नपदार्थही सहज पचतात. मीठ घातलेल दही शरीरातील इलेक्ट्रोलाईट बॅलन्स (Electrolyte Balance) राखण्यास मदत करते. यामुळे कमजोरी आणि थकवा कमी जाणवतो. तसेच, मीठ घातलेलं दही पचनासाठी देखील उत्तम मानले जाते आणि ते गॅस किंवा ॲसिडिटीसारख्या समस्या कमी करण्यास मदत करू शकते.
मुलं बटाट्यासारखी गोलमटोल झाली म्हणून टेंशन आलं, ‘एवढं’ करा-डाएटची शिस्त न पाळूनही होतील फिट...
दह्यात साखर मिसळून खाण्याचे फायदे...
दह्यामध्ये साखर मिसळून खाल्ल्याने शरीराला लगेचच इन्स्टंट एनर्जी मिळते. ज्या लोकांना खूप जास्त थकवा किंवा कमजोरी जाणवते, त्यांच्यासाठी गोड दही हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. गोड दही शरीराला थंडावा देते आणि उष्णतेपासून आराम मिळवून देण्यास मदत करते. अनेकजण सकाळी उपाशीपोटी दही - साखर खाणं आरोग्यासाठी चांगलं मानतात. मात्र, ज्यांना डायबिटीस किंवा वजन वाढण्याची समस्या आहे, त्यांनी जास्त प्रमाणात साखर खाण टाळावं.
उन्हाळ्यात कोणता पर्याय जास्त चांगला?
आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर उन्हाळ्यात दह्यात थोडं मीठ मिसळून खाणे जास्त फायदेशीर मानले जाते. हे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे संतुलन राखण्यास मदत करते आणि पचनशक्ती देखील सुधारते. दुसरीकडे, जर तुम्हाला इन्स्टंट एनर्जीची (Instant Energy) गरज असेल किंवा तुम्हाला गोड आवडत असेल, तर मर्यादित प्रमाणात दही आणि साखर देखील खाल्ली जाऊ शकते. मात्र, दररोज जास्त प्रमाणात साखर खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
दही खाताना 'या' गोष्टींची काळजी घ्या...
१. उन्हाळ्याच्या दिवसात ताजे आणि घरी बनवलेले दही खाणे जास्त फायदेशीर असते. खूप जास्त आंबट दही खाणे टाळावे, कारण त्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते.
२. दही खाण्यासाठी दुपारची वेळ सर्वात उत्तम मानली जाते.
३. रात्री दही खाल्ल्याने काही लोकांना सर्दी, खोकला किंवा पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हवामान आणि शरीराच्या गरजेनुसारच दही खावं.
Web Summary : Yogurt is a summer superfood. Salt replenishes electrolytes lost through sweat, aiding digestion. Sugar offers quick energy, but excess is unhealthy. Fresh, homemade yogurt is best, eaten during the day. Consider individual health needs.
Web Summary : गर्मी में दही अमृत है। नमक पसीने से खोए इलेक्ट्रोलाइट्स की भरपाई करता है, पाचन में सहायक है। चीनी तुरंत ऊर्जा देती है, पर अधिक हानिकारक है। ताजा दही दिन में खाएं। अपनी सेहत का ध्यान रखें।