चहा हे फक्त पेय नाही तर अनेकांची भावना आहे. दिवसाची सुरुवात असो, कामातून मिळालेला छोटा ब्रेक असो किंवा संध्याकाळता आळस दूर करायचा असो.(Drinking water before tea) कपभर गरमागरम चहा आपल्याला नवीन ऊर्जा देतो. चहा हा आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे. आपल्या दिवसाची सुरुवात चहापासून होते.(Drinking water after tea) दिवसातून कितीतरी वेळा आपण सहज चहा पितो. पण अनेकदा चहा प्यायाल्यानंतर किंवा पिण्यापूर्वी अनेकजण पाणी पितात.(Tea and digestion) पण असं करणं आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे.(Tea drinking mistakes)
चहा कॉफी आपल्या शरीराला डिहायड्रेट करतात, ज्यामुळे आपल्याला पाण्याची तहान लागते. पण बऱ्याचदा काही चुकीच्या सवयींमुळे आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होतो.(Tea health tips) पाणी कधी प्यावं? चहा पिण्यापूर्वी की नंतर जाणून घेऊया डॉक्टरांकडून..
दंतवैद्य आणि इम्प्लांटोलॉजिस्ट डॉ. उपासना गोसालिया यांनी सांगितलं की, चहा किंवा कॉफीच्या आधी किंवा नंतर पाणी पिऊ शकता. परंतु, चहा किंवा कॉफीनंतर पाणी पिणे विशेष महत्त्वाचे आहे. असं केल्याने अनेक समस्या टाळता येतात.
चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे आपण डिहायड्रेशन होते. चहा किंवा कॉफीनंतर पाणी प्यायल्यानंतर द्रवपदार्थांचे संतुलन पुनर्संचयित होते. यामुळे आपल्याला दिवसभर सक्रिय आणि उत्साही राहण्यास मदत होते. चहा किंवा कॉफी पिण्यामुळे दातांवर पिवळा थर तयार होतो. यानंतर पाणी प्यायल्याने दातांवरील भाग स्वच्छ होतो.
चहा आणि कॉफीमध्ये साखर असते, जी आपल्या दातांना चिकटून राहते. आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होऊ शकते. पाणी प्यायाल्याने साखर धुऊन जाते आणि दात सुरक्षित राहतात. चहा प्यायल्यानंतर अनेकांना अॅसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळे रिकाम्या पोटी किंवा जास्त प्रमाणात सेवन केल्याने छातीत जळजळ किंवा अॅसिडिटी होऊ शकते. पाणी प्यायल्यानंतर जळजळीपासून आराम मिळतो.
