- प्रियांका निर्गुण.
बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा नेहमीच तिच्या बोल्ड लुक्स आणि बिनधास्त, बेधडक वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. सध्या शर्लिन तिच्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. दीर्घकाळापासून सुरु असलेल्या शारीरिक वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शर्लिनने आपले ब्रेस्ट इम्प्लांट्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या शस्त्रक्रियेपूर्वी शर्लिनने रुग्णालयातून एक व्हिडिओ शेअर करत तिच्या वेदना आणि या निर्णयामागील कारण स्पष्ट केले आहे(sherlyn chopra breast implant removal).
आपले सौंदर्य किंवा फिगर अधिक आकर्षक दिसण्यासाठी अनेक महिला ब्रेस्ट इम्प्लांट्ससारख्या सर्जरी करतात, मात्र काही काळानंतर 'ब्रेस्ट इम्प्लांट इलनेस' (BII) किंवा आरोग्याच्या इतर समस्यांमुळे(Breast Implant Side Effects) त्या इम्प्लांट्स काढण्याचा निर्णय घेतात. शर्लिन चोप्राचा हा निर्णय तिच्या चाहत्यांसाठी आणि फिटनेस फ्रिक लोकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. इम्प्लांट्स शरीरातून काढून टाकणे ही शस्त्रक्रिया जितकी महत्त्वाची असते, तितकीच इम्प्लांट काढल्यानंतर शरीरावर होणारे साइड इफेक्ट्स आणि शारीरिक बदल (Breast Implants Disadvantages) जाणून घेणे आवश्यक आहे. इम्प्लांट्स काढल्यानंतर त्वचेचा पोत, स्तनांचा आकार आणि भावनिक तसेच शारीरिक आरोग्यावर नेमके कोणते परिणाम होतात ते पाहूयात...
ब्रेस्ट इम्प्लांट्स काढल्यानंतर शरीरावर होणारे परिणाम...
ब्रेस्ट इम्प्लांट्स काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेला 'एक्सप्लांटेशन' (Explantation) म्हणतात. ही शस्त्रक्रिया सुरक्षित असली तरी, शरीरावर काही तात्काळ आणि दीर्घकाळ टिकणारे बदल आणि साइड इफेक्ट्स दिसू शकतात.
१. इम्प्लांट्समुळे स्तनांची त्वचा आणि ऊती ताणल्या जातात. इम्प्लांट काढल्यानंतर स्तनांचा आकार कमी होतो, पण ताणलेल्या त्वचेचे लगेच आकुंचन होत नाही, ज्यामुळे स्तन सैल किंवा ओघळलेले दिसू शकतात. स्तनाचा मूळ आकार इम्प्लांट्स बसवण्यापूर्वी होता त्यापेक्षा वेगळा दिसू शकतो, कारण स्तनाच्या नैसर्गिक ऊतींचा आकार कमी झालेला असतो. काहीवेळा त्वचा सुरकुतल्यासारखी देखील दिसू शकते.
२. स्तन इम्प्लांट्सच्या शस्त्रक्रियेप्रमाणेच, इम्प्लांट काढल्यानंतरही स्तनाग्रांची (Nipples) किंवा स्तनांच्या त्वचेची संवेदनशीलता तात्पुरती किंवा कायमस्वरूपी कमी/जास्त होऊ शकते.
३. शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही दिवस किंवा काही आठवड्यांपर्यंत वेदना आणि सूज जाणवते. शस्त्रक्रियेच्या जागी संसर्ग होण्याचा धोका असतो. सर्जरीनंतर काही दिवस छातीत वेदना, सूज आणि ताण जाणवू शकतो. हे सामान्य असले तरी काही वेळा दीर्घकाळ टिकू शकते.
पोटाची ढेरी, कंबरेचे टायर्स कमी करायचे? मग आहारात हवेच ५ पदार्थ - झरझर उतरेल चरबी, व्हाल फिट...
४. इम्प्लांट त्यांच्या मूळ ठिकाणाहून सरकू शकतात किंवा आहे त्या जागेवरून इतर भागात फिरू शकतात, ज्यामुळे दोन्ही स्तनांचा आकार वेगवेगळा दिसू शकतो.
५. काही महिलांमध्ये इम्प्लांट्स बसवल्यानंतर संधिवात, थकवा, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि विस्मरण यांसारखी लक्षणे दिसून येतात. याला BII म्हणतात. इम्प्लांट काढून टाकल्यानंतर ही लक्षणे कमी होऊ शकतात.
६. ब्रेस्ट इम्प्लांट काढल्यानंतर, स्तनांच्या नवीन आकाराशी जुळवून घेताना महिलांना त्यांच्या शरीराच्या आकाराची तसेच फिगरची चिंता किंवा दुःख वाटू शकते. अपेक्षित परिणाम न मिळाल्यास किंवा स्तनांचा आकार शिथिल झाल्यास निराशा येऊ शकते.
७. फक्त ब्रेस्ट इम्प्लांट काढणे पुरेसे नसते. स्तनांची लूज पडलेली त्वचा आणि स्तनांचा आकार सुधारण्यासाठी अनेकदा डॉक्टर्स ब्रेस्ट लिफ्ट (Breast Lift / Mastopexy) किंवा फॅट ग्राफ्टिंग (Fat Grafting) यांसारख्या शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात.
