शतपावली करणे म्हणजे जेवण झाल्यानंतर काही वेळ म्हणजेच साधारणपणे १०० पावलं चालणे... शतपावली करणारे कित्येक जण आपण रात्रीच्यावेळी पाहात असतो. काही जण अगदी रमत- गमत जात असतात तर काही जण वेगात असतात. पण असं शतपावली करणं खरंच फायदेशीर ठरतं का आणि विशेषत: मधुमेह असणाऱ्या रुग्णासांठी शतपावली खरोखरच फायद्याची असते का हे कित्येकदा समजत नाही. शतपावली केल्याने वजन आणि शुगर यांच्यावर परिणाम होतो का याविषयीही अनेकांच्या मनात गोंधळ असतोच. म्हणूनच मनातल्या अशा सगळ्या शंकांविषयी डाॅक्टरांनी दिलेली ही खास माहिती पाहा..(shatpavali or walk after meal is really helpful to control weight and sugar?)
शतपावली केल्याने खरंच वजन, शुगर कंट्रोलमध्ये राहाते का?
वजन आणि रक्तातील साखर या दोन गोष्टींवर शतपावली करण्याचा काय परिणाम होतो, याविषयी डॉक्टर सांगतात की डायबिटीस असणाऱ्या रुग्णांची शुगर जेवण झाल्यानंतरच पटकन वाढते. त्यामुळे जेवण झाल्यानंतर जर तुम्ही काही वेळ म्हणजेच साधारण अर्धा तास चालत असाल तर तुमच्या शरीरातल्या सगळ्या मसल्स ॲक्टीव्ह होतात.
ब्रेकआऊट्स, ॲक्ने वाढल्याने कमी वयातच वयस्कर दिसता? ३ सोपे घरगुती उपाय, ॲक्ने जाऊन सौंदर्य खुलेल...
त्या मसल्सवर ग्लूट ४ नावाचा एक रिसेप्टर तयार होतो जो इन्सुलिनशिवायही रक्तातली साखर स्नायूंमध्ये ओढून घेण्यास मदत करतो. त्यामुळे आपोआपच रक्तातील साखरेची पातळी कमी होते. म्हणूनच जेवण झाल्यानंतर होणारे शुगर स्पाईक टाळायचे असेल तर प्रत्येक जेवणानंतर शतपावली करणे मधुमेहींसाठी अतिशय फायदेशीर ठरते.
शिवाय मधुमेह नसणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठीही शतपावली करणे गरजेचे आहे. कारण भारतीय लोकांचं रात्रीचं जेवण हे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असणारं असतं. या अन्नाचं व्यवस्थित पचन होण्यासाठी शतपावली करणे फायद्याचे ठरते. शतपावली केल्यामुळे ब्लोटींग, गॅसेस असा त्रासही कमी होतो.
पाठ- कंबरेच्या दुखण्याने हैराण झालात? अंथरुणावर पडूनच करा ४ व्यायाम, कंबरेला मिळेल आराम
मेटाबॉलिझम चांगले होते. त्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी साचून राहण्याचे प्रमाणही कमी होते. याशिवाय कॉर्टिसाॅल हार्मोन्सची पातळी कमी होते. त्यामुळे झोपही चांगली होते. म्हणूनच एवढे सगळे फायदे देणारा शतपावलीचा उपाय प्रत्येकानेच करणे गरजेचे आहे.
