पाठदुखी हा आजच्या धावपळीच्या जीवनशैलीतील सर्वात सामान्य त्रास झाला आहे. आधी वयोमानानुसार होणारी ही समस्या आता लहान वयातच दिसू लागली आहे. चुकीची बसण्याची पद्धत, व्यायामाचा अभाव आणि तणावपूर्ण दिनचर्या यामुळे तरुण पिढीतही पाठदुखीचे प्रमाण वेगाने वाढत आहे. ( See what is causing the increase in back pain, the risk of serious illness, try these remedies )एकदा पाठदुखी सुरु झाली की काम, अभ्यास आणि झोप यावर त्याचा थेट परिणाम होतो, म्हणून वेळेवर कारण ओळखून त्यावर उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
पाठदुखी वाढण्याची सामान्य कारणे अनेक आहेत. दीर्घ वेळ चुकीच्या पोश्चरमध्ये बसणे हे सर्वात प्रमुख कारण मानले जाते. लॅपटॉप किंवा मोबाइल दीर्घकाळ वाकून वापरणे, ऑफिसमध्ये सतत एकाच स्थितीत बसून काम करणे, तसेच जड वस्तू उचलताना कंबर योग्यरीतीने न वाकवणे यामुळे पाठीवर अनावश्यक ताण येतो. पाठीभोवतीचे स्नायू कमकुवत असणे, हाडे व सांधे यांच्या कणखरतेचा अभाव, वाढलेले वजन आणि शारीरिक हालचालींचा अभावही पाठदुखी वाढवतात. काही वेळा ताणतणाव, झोपेची गुणवत्ता आणि शरीरात होणारे सूक्ष्म बदलही पाठदुखीला कारणीभूत ठरतात.
लहान वयातच पाठदुखी वाढण्याची मुख्य कारणे जीवनशैलीशी निगडित असतात. बसून तासंतास गेमिंग करणे, स्टडी टेबलऐवजी बिछान्यावर अभ्यास करणे, बॅगचे जास्त वजन, व्यायामाचा अभाव, तसेच चुकीची झोपण्याची पद्धत यामुळे किशोरवयीन आणि तरुणांमध्ये पाठदुखीचे प्रमाण अधिक वाढते. वाढत्या स्क्रिन टाइममुळे मान, खांदा आणि कंबर यांवर सतत ताण येत असल्याने पाठदुखी लवकर जाणवू लागते.
या त्रासावर घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. सर्वप्रथम गरम पाण्याने शेकल्यास स्नायू मोकळे होतात आणि दुखणे कमी जाणवते. दिवसभरात थोडेथोडे स्ट्रेचिंग केल्याने स्नायूंना आराम मिळतो. पाठीला आधार मिळेल अशा खुर्चीचा वापर करावा आणि बसताना कंबर सरळ ठेवावी. झोपताना अतिशय मऊ गादी टाळावी, मध्यम कडक गादी पाठीला योग्य आधार देते. तिळाच्या तेलाने मालीश करणे, तसेच ईप्सम सॉल्टच्या कोमट पाण्याने अंघोळ करणे हे उपायही दुखणे कमी करण्यात मदत करतात. दिवसातून काही मिनिटे चालणे, भुजंगासन तसेच मकरासन सारखे साधे योगासन करणे पाठीच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. पाठदुखीवर वेळीच उपाय केले नाही तर त्याची तीव्रता वाढते. रुपांतर गंभीर आजारात व्हायला लागते.
Web Summary : Back pain is increasingly common, affecting even the young due to poor posture, lack of exercise, and stress. Home remedies like stretching, warm compresses, and yoga can provide relief. Ignoring it can lead to serious health issues.
Web Summary : पीठ दर्द तेजी से बढ़ रहा है, खराब मुद्रा, व्यायाम की कमी और तनाव के कारण युवा भी प्रभावित हैं। स्ट्रेचिंग, गर्म सेक और योग जैसे घरेलू उपचार राहत प्रदान कर सकते हैं। इसे अनदेखा करने से गंभीर स्वास्थ्य समस्याएं हो सकती हैं।